आकाश एज्युकेशनल सर्विसेसच्या वतीने पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांचे मदत

Marathi

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) च्या वतीने महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधी (सीएमआरएफ) करिता 51 लाख रुपयांचे मदत करण्यात आली.

महाराष्ट्रात उद्‍भवलेल्या आपदेने दु:खी होऊन आपली वेदना आणि सहानुभूती व्यक्त करताना आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर जे. सी. चौधरी म्हणाले की, “पूरग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. मी पूरस्थिती पूर्ववत व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे, लवकरात लवकर जनजीवन सुरळीत व्हावे.” महाराष्ट्र सरकारला या मदत आणि बचाव कार्यात साह्य करण्याकरिता त्यांनी लोकांना तसेच संस्थांना आवाहन हि केले.

मुंबई शाखेचे टीम प्रमुख डॉ. एच आर राव, रिजनल डायरेक्टर (वेस्ट), एईएसएल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननिय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *