ऑटोरिक्षांना अचंबित करताना पाहा फक्‍त ‘OMG! Yeh Mera India’मध्‍ये

Don't Miss It Marathi

फॅशन व आधुनिक ट्रेण्‍ड्सनी भरलेल्‍या समाजामध्‍ये दरवर्षाला ‘फॅशन वीक्‍स’ सादर केले जातात. या फॅशन वीक्‍समध्‍ये आधुनिक व अग्रणी रेडी-टू-वेअर,  उच्च फशण, रिसॉर्ट व सीझन-थीम कलेक्‍शन्‍स जगासमोर सादर केले जातात. फॅशन शोज हे झपाट्याने कलाप्रकार बनत चालले आहेत आणि जगभरातील लाखो चाहते हे शोज पाहण्‍याचा आनंद घेत आहेत. पण भारतातील महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये एका अनोख्‍या फॅशन शोचे आयोजन केले जाते, जो दरवर्षाला अधिकाधिक लोकप्रिय बनत चालला आहे. महाराष्‍ट्रातील पुण्‍यामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेला अनोखा ऑटोरिक्षा फॅशन शो पाहण्‍यासाठी पाहा दर सोमवार व मंगळवार रात्री ८ वाजता HistoryTV18 वाहिनीवर प्रसारित होणारा शो ‘OMG! Yeh Mera India‘, सीझन ६चा आगामी एपिसोड. 

अत्‍यंत यशस्‍वी व दीर्घकाळापासून चाललेली सिरीज ‘OMG! Yeh Mera India’चा नवीन सीझन भारताच्‍या लक्षवेधक इतिाहासावर,तसेच देशातील आधुनिक नाविन्‍यतांवर प्रकाश टाकत आहे. बाबा शिंदे यांनी ५ ऑटोंच्‍या सहभागासह वर्ष २००९ मध्‍ये प्रसिद्ध ऑटोरिक्षा फॅशन शो सुरू केला. गेल्‍या वर्षी या शोमध्‍ये ५० जणांचा सहभाग दिसण्‍यात आला आणि प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्‍या विजेत्‍यांना अनुक्रमे २१,००० रूपये, १८,००० रूपये आणि १५,००० रूपयांचे बक्षीस देण्‍यात आले. सहभाग घेणा-या ऑटो सर्वोत्तम रॅम्‍प शो सादर करतात आणि ज्‍युरी व्हिज्‍युअल रुप, आतील आरामदायी सुविधा, इंजिनची कामगिरी आणि चालकाला माहित असलेले वाहतुकीचे नियम या निकषांच्‍या आधारावर ऑटोंचे मूल्‍यांकन करतात. 

आकर्षक ऑटोरिक्षा परीक्षकांना अचंबित करताना पाहण्‍यासाठी एपिसोड पाहा. २० व २१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता प्रसारित होणा-या या अर्धा-तासाच्‍या एपिसोडमध्‍ये देशभरातील इतर रोमांचक गोष्‍टी देखील पाहायला मिळणार आहेत. याहूनही खूप काही बघा ‘OMG! Yeh Mera Indiaमध्‍येसोमवार आणि मंगळवार रात्री  वाजताफक्त HistoryTV18वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *