क्लासिक लेजंड्सच्या वतीने पहिला वर्धापनदिन साजरा; जावा पैराकच्या निर्मिती आवृत्तीचा शुभारंभ

Marathi

अगदी वर्षभरापूर्वी क्लासिक लेजंड्स प्रा. लिमिटेडच्या दिमाखदार मोटरसायकलचा झगमगत्या प्रवासाची सुरुवात केली होती. मुंबईतील एका चमचमत्या समारंभात जावा आणि जावा फोर्टी टू उत्साही चाहत्यांसमोर दाखल करण्यात आल्या. तर जावा पैराकचे सादरीकरण फॅक्टरी कस्टम म्हणून करण्यात आले होते.

आज क्लासिक लिजंड्सचा पहिला वर्धापनदिन असून दिमाखदार नवीन जावा पैराकचा शुभारंभ करून या वचनाची पूर्तता करण्यात आली. पैराकचे अनावरण करण्यापूर्वी क्लासिक लिजंड्सच्या वतीने वर्षभरापासून सुरू असलेल्या कामगिरीचा वेध घेतला. उत्पादनाची घोषणा केल्यानंतर काहीच दिवसांत जावा मोटरसायकल्सच्या बुकिंगला भरभरून प्रतिसाद लाभला, नऊ महिन्यांत तडाखेबंद विक्री झाली. यावरून या ब्रँडने विश्वासार्हता कमावली असल्यावर शिक्कामोर्तब झाले. शुभारंभानंतर 40 दिवसांच्या आतच ऑनलाईन बुकिंग बंद करावे लागले. 100 दिवसांहून कमी कालावधीत या ब्रँडने 100 नवीन विक्री दालने सुरू करून शिरोपेचात मानाचा तुरा लावून घेतला. देशातील वाहन ब्रँड असलेल्या कंपनीकरिता ही प्रभावी कामगिरी ठरली आहे.      

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा म्हणाले की, “चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या ब्रँडचे मागच्या वर्षी पुनुरुत्थान करण्याची दुर्मीळ संधी आम्हाला मिळाली. स्वातंत्र्य आणि साहसाकरिता आपल्या सर्वांमध्ये असलेली इच्छा आणि तळमळीचे प्रतिनिधित्व जावाने केले आहे. हे वर्ष अतिशय समाधानकारक राहिले. जावासोबत वयाने वाढलेल्या चाहत्यांच्या हजारो आठवणी जागृत झाल्या आणि आता नवीन आगामी ग्राहकही असंख्य कहाण्यांसह लहानाचे मोठे होत आहेत.”

क्लासिक लिजंड्स प्रा लिमिटेडचे सह-संस्थापक आणि निर्देशक अनुपम थारेजा म्हणाले की, “मागच्या वर्षी याच दिवशी मी आणि माझ्या टीमने जेव्हा जावाचा शुभारंभ केला होता; तो क्षण आमच्याकरिता अभिमानाचा होता. आम्ही काही आठवड्यांतच विक्रीचा जो आकडा गाठला, फॉरएव्हर हिरोज आणि जावा नोमॅड्स प्रोग्रामच्या शुभारंभानंतर आमच्या विक्रेता फळीचा झालेला विस्तार यामुळे हे वर्ष अविस्मरणीय ठरले. त्यामुळे आता आम्ही जिथे आहोत तिथून पुढे जाण्यासाठी वेग घेऊन नवीन उत्पादने आणि ऑफर्स दाखल करू. जावाच्या पुनुरुत्थान संधीसह तिच्यासमोर आव्हानांचा ढीग होता. मात्र आमची कम्युनिटी व ग्राहकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमची उत्पादने आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या कार्यक्रमासह सर्वोत्तम उंची गाठणे शक्य झाले.” 

या ब्रँडच्या वतीने एक अतिशय महत्त्वाचा #ForeverHeroes उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपल्या सशस्त्र दलाने बजावलेल्या कामगिरीला सलाम करणारा हा उपक्रम म्हणावा लागेल. या माध्यमातून सशस्त्र दलातील जवानांकरिता आर्म्ड फोर्सेस फ्लॅग डे फंड आणि हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी लडाख स्काऊट्स’मार्फत आजवरचे दोन महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *