गृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रालयातर्फे भारतामध्‍ये ‘नर्चरिंग नेबरहूड्स चॅलेंज’ सादर

Marathi

स्‍मार्ट सिटीज मिशन, गृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रालयाने नेदरलँड्समधील बर्नार्ड वॅन लीअर फाऊंडेशन (BvLF)सोबत सहयोगाने, तसेच डब्‍ल्‍यूआरआय इंडियाच्‍या तंत्रज्ञान सहयोगाने नर्चरिंग नेबरहूड्स चॅलेंजसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. ०-५ वर्षे वयोगटातील तान्‍ही व लहान मुले आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्‍यांच्‍या केअरगिव्‍हर्सच्‍या गरजांवर लक्ष केंद्रित करत उपक्रमाने भारतीय शहरांना स्थिर, सर्वसमावेशक व कुटुंबास अनुकूल बनवण्‍याप्रती महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हा उपक्रम भारतभरातील चॅलेंजला पाठिंबा देईल आणि ४ नोव्‍हेंबर २०२० पासून अर्ज स्‍वीकारण्‍यास सुरूवात होईल. सर्व स्‍मार्ट शहरे, राज्‍ये व केंद्रशासित प्रदेशांचे राजधानी शहर आणि ५ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्‍या असलेली इतर शहरे या चॅलेंजमध्‍ये सहभाग घेण्‍यास पात्र आहेत. 

सर्वसमावेशक विकासाच्या त्याच्या मुख्य उद्देशांतर्गत, भारत सरकार सर्व असुरक्षित नागरिकांसाठी, विशेषत: लहान मुलांसाठी शहरी भागात संधी वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे. लहान मुलांचे व त्यांच्या केअरगिव्‍हर्सचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्‍यासाठीनर्चरिंग नेबरहूड्स चॅलेंज हे भारतीय शहरांना सार्वजनिक ठिकाणी वातावरण-अनुकूल सुधारणा, गतीशीलता, सेवांची उपलब्‍धता व डेटा व्‍यवस्‍थापनामध्‍ये उद्देशीय कामगिरी करण्‍यासोबत अग्रणी राहण्‍याचे खुले आवाहन आहे.

संशोधन निदर्शनास आणते की, वयाच्‍या सुरूवातीच्‍या काळात विशेष लक्ष दिल्‍याने तान्‍ह्या व लहान मुलांना त्‍यांच्‍या पूर्ण क्षमता विकसित करण्‍यामध्‍ये मदत होते. कोविड-१९ संकटामुळे तान्‍ह्या मुलांचे आरोग्‍यदायी संगोपन व त्‍यांच्‍या केअरगिव्‍हर्सच्‍या आरोग्‍यासाठी नैसर्गिक हरित जागा उपलब्‍ध होण्‍यासोबत अनुकूल वातावरण, बालपणीच उत्तम संगोपन आणि खेळण्‍याची संधी यांचे महत्त्व प्रकर्षाने दिसून आले आहे. गरोदर महिला, तान्‍ही व लहान मुले आणि त्‍यांच्‍या कुटुंबांसाठी सार्वजनिक ठिकाणी सुधारणा करत शहरे प्रत्‍येकासाठी सक्षम समुदाय, आर्थिक विकास व आरोग्‍यदायी वातावरणाला चालना देऊ शकतात.

नर्चरिंग नेबरहूड्स चॅलेंजच्‍या माध्‍यमातून शहरांना खेळ व परस्‍परसंवादांसाठी पार्क्‍स, बाग व खुल्‍या जागांची पुनर्कल्‍पना करण्‍यासाठी; लहान मुलांसाठी रस्‍ते सुरक्षित करण्‍यासाठी; वयाच्‍या सुरूवातीच्‍या काळात उपलब्‍ध होणा-या अंगणवाडी व सार्वजनिक आरोग्‍य केंद्रे यांसारख्‍या सेवांमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी तान्‍ह्या बाळांसाठी सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी आमंत्रित करण्‍यात आले आहे. एकीकृत व पूरक हस्‍तक्षेप प्रशंसनीय आहेत. या चॅलेंजचा भाग म्‍हणून हाती घेण्‍यात आलेल्‍या सुधारणा मंत्रालयाच्‍या वॉकेबल व सायकल-फ्रेण्‍डली शहरांच्‍या उपक्रमांच्‍या लाभांमधून प्रेरित असतील.

३ वर्षाच्‍या उपक्रमादरम्‍यान प्रस्‍ताव, सुसज्‍जता व कटिबद्धतेच्‍या आधारावर निवडण्‍यात आलेल्‍या शहरांना तान्‍ह्या मुलांच्‍या जीवनाचा दर्जा सुधारणारे सोल्‍यूशन्‍स विकसित करण्‍यासोबत मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्‍यासाठी तंत्रज्ञान पाठिंबा व क्षमता-निर्माण साह्य मिळेल. काळासह हा उपक्रम शहरातील नेते, व्‍यवस्‍थापक, कर्मचारी, अभियंते, शहरी नियोजक व आर्किटेक्‍ट्सना भारतीय शहरांचे नियोजन व व्‍यवस्‍थापनामध्‍ये तान्‍ह्या मुलांच्‍या सर्वांगीण विकासावर लक्ष देण्‍यामध्‍ये सक्षम करेल.

राज्‍यमंत्री (स्‍वतंत्र कार्यभार) श्री. हरदीप सिंग पुरी म्‍हणाले, शहरी वातावरण लहान मुलांचे आरोग्‍य व विकासाला विशेषत: जीवनाच्‍या पहिल्‍या पाच महत्त्वपूर्ण व असुरक्षित वर्षांमध्‍ये आकार देण्‍यास मदत करते. मुलाच्‍या जीवनातील पहिल्‍या १,००० दिवसांदरम्‍यान दर सेकंदाला १ दशलक्षहून अधिक नवीन मज्‍जासंस्‍था निर्माण होतात. लहान मुले व त्‍यांच्‍या कुटुंबांचा सार्वजनिक सहवास सुरक्षित असण्‍यासोबत सुरूवातीच्‍या बालपणासाठी अनुकूल करत नर्चरिंग नेबरहूड्स चॅलेंज आगामी दशकांमध्‍ये भारतीय शहरांमध्‍ये अधिक प्रबळ सामाजिक व आर्थिक विकास निष्‍पत्तींसाठी पाया रचण्‍यामध्‍ये मदत करू शकते.  ते पुढे म्‍हणाले, कुटुंबांना अपुरे सार्वजनिक परिवहन, तसेच अन्‍न, आरोग्‍यसेवा व मुलांची योग्‍य काळजी घेण्‍यासंदर्भात आव्‍हाने आहेत. विचारपूर्वक केलेले शहरी नियोजन व रचना अशा आव्‍हानांवर मात करण्‍यामध्‍ये आणि मुलाला जीवनाच्‍या सुरूवातीच्‍या काळात उत्तम संगोपन व पोषण देण्‍यामध्‍ये प्रमुख भूमिका बजावू शकतात. यामध्‍ये १५ मिनिटांच्‍या पायी अंतरावर लहान मुलांच्‍या कुटुंबासाठी आवश्‍यक असलेल्‍या मूलभूत गोष्‍टींची पूर्तता करणारे मिक्‍स्‍ड-युज नेबरहूड्स वॉकेबल , केअरगिव्‍हर्सना सुविधा देण्‍यासोबत लहान मुलांना सुरक्षितपणे वावरण्‍याची सोयीस्करता देणा-या घराजवळच उत्‍साहपूर्ण, हरित सार्वजनिक जागा, कुटुंबांना लहान मुलांसोबत सुलभपणे, किफायतशीरपणे व आनंदाने प्रवास करण्‍याची सेवा देणारे सुरक्षित परिवहन मार्ग व परिवहन यंत्रणा, सुरक्षित हवेचा दर्जा व कमी ध्‍वनी प्रदूषणासह आरोग्‍यदायी वातावरण आणि कुटुंबाच्‍या आरोग्‍यासाठी हितकारक उत्‍साहपूर्ण सामाजिक जीवन या गोष्‍टींचा समावेश आहे.   

गृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रालयाचे (एमओएचयूए) सचिव श्री. दुर्गा शंकर मिश्रा म्‍हणाले, शहर सर्व लोकांच्‍या हिताचे असण्‍यासाठी सर्वात असुरक्षित समूहांच्‍या गरजांची काळजीपूर्वक पूर्तता करणे आवश्‍यक आहे. शहर नियोजनामध्‍ये लहान मुलांच्‍या संगोपनास अनुकूल सुविधांचा समावेश केल्‍याने अधिक सर्वांगीण, लोक-केंद्रित शहरी विकास होण्‍यास मदत होईल.    

बर्नार्ड वॅन लीअर फाऊंडेशनच्‍या भारतीय प्रतिनिधी ऋषदा मजीद म्‍हणाल्‍या,’आमचा विश्‍वास आहे की, तान्‍ही मुले, किशोरवयीन मुले आणि त्‍यांचे पालक व केअरगिव्‍हर्ससाठी अनुकूल वातावरण हा लहान निवासी व सर्व लोकांसाठी मूलभूत पायाभूत सुविधा व उत्तम जीवनाचा दर्जा देण्‍यावर फोकस देण्‍यासोबत शहरांबाबत विचार करण्‍याकरिता स्थिर व सर्वसमावेशक मार्ग आहे. सार्वजनिक ठिकाणे, गतीशीलता, लहान मुलांसाठी उपलब्‍ध होणा-या सेवा आणि इतर समान पैलूंवरील फोकस त्‍यांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍यासाठी फायदेशीर आहे. तान्‍ह्या व लहान मुलांसाठी काम करणारी शहरे सर्वांसाठी काम करतील असे मानले जाते. आम्‍ही हा महत्त्वपूर्ण उपक्रम सादर करण्‍यासाठी गृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रालयाचे आभार मानतो. आम्‍ही वर्ल्‍ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया व सहभाग घेणा-या शहरांसोबत सहयोग जोडण्‍यास उत्‍सुक आहोत.

डब्ल्यूआरआय इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. ओ. पी. अगरवाल म्‍हणाले,’भारतातील शहरी विकास चर्चेमध्‍ये लोक-केंद्रित दृष्टिकोनाला प्राधान्‍य दिले पाहिजे. लहान मुलांसाठी शहरे डिझाइन केल्‍याने ते सर्वांसाठी सुरक्षित व आरामदायी असल्‍याची खात्री मिळेल. आपण आपल्‍या शहरांची ठिकाणे म्‍हणून पुनर्कल्‍पना करणे गरजेचे आहे, जेथे लहान मुलांचे सुरक्षित, उत्तम व प्रेरणादायी वातावरणामध्‍ये संगोपन होऊ शकेल. यासाठी रस्‍ते, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक परिवहन, सुविधा व उपयुक्‍त सेवांची उपलब्‍धता व शहरी लवचिकतेची पुनर्निर्मिती करत पादचारी-केंद्रित शहरांच्‍या मूलभूत तत्त्वांचा अवलंब केला पाहिजे. आम्‍हाला एमओएचयूएचे नेतृत्‍व लाभलेल्‍या आणि बर्नार्ड वॅन लीअर फाऊंडेशनचा पाठिंबा असलेल्‍या या उपक्रमाचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही भारतीय शहरांसोबत सहयोगाने काम करत त्‍यांना या दृष्टिकोनाचा अलवंब करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यास उत्‍सुक आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *