ग्राहकोन्मुख सेवेसाठी सीआयआय कडून सिटी कॉर्पोरेशनचे कौतुक

Marathi

उत्कृष्ट ग्राहकोन्मुख सेवा आणि ग्राहक सेवा देत असताना डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यासाठी सीआयआय अर्थात कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या वतीने पुण्यातील सिटी कॉर्पोरेशनचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी सीआयआयच्या वतीने ‘सीआयआय अॅवॉर्ड फॉर कस्टमर ऑब्सेशन’ अंतर्गत ग्राहाकोन्मुख सेवेसाठी सिटी कॉर्पोरेशनचे कौतुक करीत त्यांना सन्मानित करण्यात आले. नुकतेच दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात नीती आयोगाचे माजी वरिष्ठ सल्लागार बी. एन. सत्पथी यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. सिटी कॉर्पोरेशनचे संचालक जे. के. भोसले, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख रवी कुलकर्णी, क्वालिटी सिटी कॉर्पोरेशन लि.चे सरव्यवस्थापक परेश वर्तक यांनीसिटी कॉर्पोरेशनच्या वतीने हा सन्मान स्वीकारला.

कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ही देशातील एक अग्रणी औद्योगिक संघटना आहे. २०१६ पासून ग्राहक सेवेसाठी काम करणा-या संस्थांचा संस्थेच्या वतीने पुरस्कार देत गौरव करण्यात येतो. सदर पुरस्कार देत असताना ग्राहकांच्या अनुभवांचे मूल्यांकन याबरोबरच सीआयआयच्या तत्त्वांनुसार उत्कृष्टता तपासली जाऊन त्या मुल्यांकनाच्या आधारावर पुरस्कार दिला जातो हे विशेष. यावर्षी वरील सन्मानासाठी उत्पादन व सेवा पुरविणा-या २५ संस्थांच्या वतीने तब्बल १५० अर्ज प्राप्त झाले होते. यांपैकी अमनोराचे निर्माते असलेल्या सिटी कॉर्पोरेशनला सदर पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले.          

अमनोरा मधील ग्राहकांशी संस्थेची असलेली बांधीलकी हे सदर पुरस्कार मिळण्यामागील मुख्य कारण आहे. अमनोराने आजपर्यंत नियोजन, आर्किटेक्चर्स, बांधकाम, विपणन व ब्रॅडिंग, स्मार्ट ग्रिड ऊर्जा आणि जलसंधारण, पर्यावरण व्यवस्थापन आणि सीएसआर इत्यादी विविध क्षेत्रात 300 पुरस्कार मिळाले आहेत हे विशेष. याशिवाय २०१३ मध्ये अमानोरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून सीआयआयच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *