अतिशय-आटोपशीर आणि अति-प्रशस्त, रेनो ट्रायबर’ला ग्लोबल एनसीएपी’कडून 4-स्टार सेफ्टी रेटींग फॉर एडल्ट ऑक्यूपंट सेफ्टी आणि 3 स्टार चाईल्ड ऑक्यूपंट सेफ्टी पुरस्काराने गौरविण्यात आल्याची घोषणा रेनो इंडियाने आज केली.ग्लोबल एनसीएपी हा प्रमुख वैश्विक गाडी मूल्यांकन कार्यक्रम आहे. ऑगस्ट 2019 दरम्यान लॉन्च करण्यात आलेली रेनो ट्रायबर ही एक लवचीक, आकर्षक आणि किफायतशीर वाहन पर्याय उपलब्ध करून देते. हे उत्पादन रेनो इंडियासाठी गेम चेंजर ठरले असून देशात याचे 75,000 हून अधिक आनंदी ग्राहक आहेत.
या कामगिरीबद्दल बोलताना रेनो इंडिया ऑपरेशन्स’चे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम मामील्लापल्ले म्हणाले की,“रेनो’च्या दृष्टीने सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय नियामक प्राधिकरणाने स्थापित केलेल्या सुरक्षा विषयक मानकांनुसार आमचे उत्पादन तयार करण्यात आले आहे. भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त प्रकल्पाचा परिणाम असलेल्या रेनो ट्रायबरने या अगोदरच चांगल्याप्रकारे देशभर नावलौकिक मिळवला आहे. कार खरेदी करणाऱ्या इच्छुकांमध्ये रेनो ट्रायबरला विशेष पसंती लाभली. भारतात रेनोकरिता ही अभिमानाची बाब आहे. भारतात ट्रायबरने यशस्वी प्रवेश केला असून या उत्पादनाचा विकास आणि निर्मिती प्रथमत: भारतातच भारतीयांकरिता करण्यात आली. त्यानंतर हे उत्पादन जगभर नेण्यात आले. आम्ही सुरक्षेबाबतची वचनबद्धता जपतो, हे ग्लोबल एनसीएपी’च्या वतीने प्राप्त 4-स्टार एडल्ट सेफ्टी रेटींग’ने अधोरेखित केले.”
“अलीकडे मिळालेले हे 4-स्टार एडल्ट सेफ्टी रेटींग म्हणजे रेनो’ने जगातील सर्वोत्तम सुरक्षित, भारतीय ग्राहकांना सहज उपलब्ध होणाऱ्या उत्पादनांची निर्मिती केल्याची पोचपावती आहे. रेनो ही एक ग्राहक-केंद्री कंपनी असून तंत्रज्ञान, आरेखनाच्या पटलावर आमची वाहने प्रगती, सुरक्षितदृष्ट्या निर्माण करण्यात आली असून ती भविष्यातील गरजांनुरूप आहेत आणि ट्रायबर ही साक्ष पटवून देते,” ते पुढे बोलताना म्हणाले.
डेव्हिड वॉर्ड हे टुवर्डस् झिरो फाऊंडेशनचे अध्यक्ष असून ते म्हणाले की, “ग्लोबल एनसीपीएच्या ट्रायबर क्रैश टेस्टमध्ये रेनो सुरक्षा सुधारणेत पात्र ठरली ही फारच समाधानकारक बाब आहे. आम्ही त्यांना अशा प्रगतीसाठी कायमच प्रेरीत करू. जेणेकरून ते भारतीय बाजारात पाच तारे मिळवण्यासाठी तसेच सेफर चॉईस (सुरक्षित पसंती) मूल्यांकनाचे आगामी लक्ष्य गाठतील.”
रेनो ट्रायबरचे डिझाईन आकर्षक आहे. हे वाहन मजबूत आणि अष्टपैलू आहे. त्यात 4 मीटरहून कमी जागेत 1 ते 7 व्यक्ती सहज बसू शकतात. रेनो ट्रायबरला ग्राहकांची पसंती लाभली आणि किंमतीसह हे उत्पादन अद्वितीय गुणवत्ता, आटोपशीर, आकर्षक आरेखन आणि आधुनिक वैशिष्ट्यांच्या कसोट्यांवर खरे उतरले असल्याने ते एक सुपिरिअर वॅल्यू पॅकेजिंग ठरले. भारतात रेनो’च्या विस्तार योजनेची भूमिका मुख्य आहे. रेनो’चा भारतामधील खप वाढतो आहे. शिवाय दक्षिण आफ्रिका आणि सार्क पट्ट्यातही ट्रायबरची निर्यात सुरू करण्यात आली. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट’मध्ये रेनो ट्रायबर’ची बांधणी रचना आणि एकंदर सुरक्षेचे मूल्यांकन झाले. गाडीच्या अतिरिक्त चाचण्या देखील घेण्यात आल्या. ग्लोबल एनसीएपी’कडून घेण्यात आलेल्या मूल्यांकनावरून हे प्रौढ प्रवासी व्यक्तिंकरिता 4 स्टार आणि लहान प्रवासी मुलांच्या सुरक्षेकरिता 3 स्टार पटकावणारे भारतातील पहिले सात आसनी वाहन ठरले आहे. रेनो ट्रायबर मानकांनुसार 7 हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी बांधण्यात आली असून दर्जेदार 4 एअरबॅग उपलब्ध असलेले सर्वोच्च वेरीयंट आहे.