जावा मोटारसायकल्सची घोषणा: 90वा वर्धापनदिन आवृत्तीची मोटारसायकल

Marathi

फ्रँटीजेक जानेसेक यांनी 1929 या वर्षी अगोदरच्या झेकोस्लोव्हाकियामध्ये जावा मोटारसायकल्सची स्थापना केली आणि जावा 500 ओएचव्ही या जावा ब्रँडच्या पहिल्या मोटारसायकलची संकल्पना प्रत्यक्षात आणली. या घटनेचा 90 वा वर्धापनदिन साजरा करण्याच्या निमित्ताने क्लासिक लीजेन्डस् प्रायव्हेट लिमिटेड यांनी भारतात जावाची ‘90वा वर्धापनदिन आवृत्ती’ आणली आहे.

जावा ड्युअल चॅनेल एबीएस प्रकारावर आधारित ही मोटारसायकल म्हणजे 1929 मधील या ब्रँडच्या तेजस्वी आरंभाला आदरांजली आहे. ही आवृत्ती केवळ 90 मोटारसायकलींची असेल आणि त्यात 90व्या वर्धापनदिन आवृत्तीसाठीची जावा 500 ओएचव्ही च्या प्रेरणेतून निर्मित खास रंगसंगती असेल. प्रत्येक मोटारसायकलच्या इंधन टाकीवर 90व्या वर्धापनदिनाचा संस्मरणीय लोगो आणि मोटारसायकलचा वैयक्तिक क्रमांक असेल.

नियमित जावा ड्युअल चॅनेल एबीएस मोटारसायकलच्या तुलनेत किमतीत काहीही बदल नसून ही नवी आवृत्ती नव्या लाल आणि हस्तिदंती रंगाच्या छ्टेमध्ये असून ती ताबडतोब वितरणासाठी उपलब्ध असेल.

मर्यादित आवृत्तीची आणि इतिहासाचा भाग असलेली ही मोटारसायकल जनतेला दिनांक 15 ऑक्टोबर 2019 पासून जावा विक्रेत्यांकडे बघायला मिळू शकेल. ज्या ग्राहकांनी या अगोदर जावा मॉडेलचे बुकिंग केले आहे आणि जे ग्राहक दिनांक 22 ऑक्टोबर 2019 च्या मध्यरात्रीपूर्वी बुकिंग करतील त्यांना ही मोटारसायकल आपल्या मालकीची करता येईल. फक्त त्यांनी आपल्या जवळच्या विक्रेत्याकडे या मोटारसायकल सोडतीमध्ये आणि त्यातील वाटपामध्ये सामील होण्याचा आपला हेतू स्पष्ट करायचा आहे. जे ग्राहक या सोडतीद्वारे निवडले जाणार नाहीत ते आपोआप आपल्या मूळ मॉडेल बुकिंग यादीत परततील. एकदा मोटारसायकल सोडत पार पडली की मोटारसायकली ताबडतोब ग्राहकांनी नेमून दिलेल्या जागी पाठविल्या जातील.

मोटारसायकलीच्या तांत्रिक विवरणात काहीही बदल नाहीत. ही 293सीसी शक्तीची असून, द्रव शीत, एक सिलेंडर, आणि ट्यून केलेल्या डबल क्रॅडल चेसीस सोबत डीओएचसी इंजिनमुळे मिळणाऱ्या सुंदर प्रचालन आणि स्थिरता असल्यामुळे ही नवी जावा आधुनिक आणि उत्कृष्ट आहे. जावा आणि जावा फॉर्टी टू यांची किंमत अनुक्रमे भारतीय रु. 1,64,000/- आणि भारतीय रु. 1,55,000/- (एक्स शोरूम, दिल्ली) आणि ड्युअल चॅनेल एबीएस प्रकार यांची किंमत अनुक्रमे भारतीय रु. 1,72,942/- आणि भारतीय रु. 1,63,942/- इतकी असेल.या मोटारसायकल्सचे उत्पादन कंपनीच्या मध्य प्रदेशातील पीथमपूर येथील कारखान्यात केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *