आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळेस नरेंद्र छाजेड-संयोजक युवा राष्ट्र परिषद,२०२०,कांतीलाल ओसवाल- अध्यक्ष,जितो पुणे,राजेश साकला-झोन चेअरमन जितो,विजय भंडारी-उपाध्यक्ष जितो,धीरज छाजेड-उपाध्यक्ष जितो युथ हे मान्यवर उपस्थित होते.
परिषदेची वैशिष्ट्येः
1 देशाच्या विविध 50 शहरातून आलेल्या 3000 हून अधिक तरुणांसोबत चर्चा करण्याची संधी (तरुण आंत्रप्रिनर आणि प्रयोगशील युवा) 2 तरुणांसाठी 100 कोटींहून अधिकची व्यावसायिक संधी (शार्क टँक, प्रोफेशनल फोरम, बिझनेस नेटवर्क इ.) 3 20 हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यक्त्यांची सत्र 4 प्रतिष्ठित व्यक्तींकडून प्रमुख मार्गदर्शन (आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध प्रेरणादायी वक्त गौर गोपाल दास, बिडकोचे विमल शाह) 5 शाकाहारी खाद्यपदार्थांचा खास फूड फेस्टिवल (देशाच्या विविध भागातील चविष्ठ खाद्यपदार्थ) 6 सर्वोत्कृष्ट मनोरंजन (डीजे चेतस, बिस्व कल्याण रथ, सुमुखी सुरेश)
परिषदेत सहभागी होणारे वक्ते
1. विमल शहा- आफ्रिकेतील मोठे व्यावसायिक, चेअरमन (बिडको) 2. रजनीश जैन- सीएफओ (जिओ इन्फोकॉम लिमिटेड) 3. सुहास गोपीनाथ- जगातील सर्वात तरूण सीईओ, संस्थापक- ग्लोबल इन्क्स. 4. गौर गोपाल दास- आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ते 5. मोतीलाल ओसवाल- मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड 6. अनिल लांबा- लेख, वित्तीय तज्ञ 7. कनिका गोयल- फॅशनिस्ता, फोर्ब्स 30 अंडर 30 8. सिद्धांत मोरे- मॅड ओव्हर मार्केटिंग
यापूर्वी राजकारण आणि कार्पोरेट क्षेत्रातील माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, श्री नितीन गडकरी, श्री रतन टाटा, श्री कुमार मंगलम बिर्ला, श्री अनिल अगरवाल- वेदांता, श्री गोपिचंद हिंदुजा- हिंदुजा समूह, श्री लक्ष्मी मित्तल- आर्सेलर मित्तल इ. यासारख्या महत्त्वपूर्ण व्यक्तींनी या परिषदेला उपस्थिती लावली आहे.
तरुणपण हे स्वप्नांचे आणि संशोधनांचे वय आहे. योग्य मार्गदर्शन मिळाले तर देशामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात येते आहे.