टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेड या अग्रगण्य टू व थ्री व्हीलर टायर कंपनीने ब्रॅण्ड ‘टीव्हीएस युरोग्रिप’च्या अनावरणाची घोषणा केली. मिलेनियल ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा ब्रॅण्ड विकसित करण्यात आला आहे. विस्तृत ग्राहक संशोधन व जागतिक स्तरावर संशोधन-विकास, डिझाइन व तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्समध्ये लक्षणीय गुंतवणूक यांतून टीव्हीएस युरोग्रिप हा ब्रॅण्ड विकसित झाला आहे. या उत्क्रांतीचा भाग म्हणून तसेच तरुणाईशी जोडून घेण्यासाठी व उच्च कामगिरीसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य वापरून टीव्हीएस युरोग्रिप घडवण्यात आला आहे. भारतात तयार झालेल्या या ब्रॅण्डमधील उत्पादनांची विक्री जगभर केली जाणार आहे.
टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेडचे संचालक श्री. पी. विजयराघवन म्हणाले, “भारत ही यापुढेही दुचाकी वाहनांसाठी उत्तम बाजारपेठ राहणार आहे आणि आम्हाला वाढीची मोठी संधी दिसत आहे. भारतातील नवीन युगाच्या रायडर्सच्या सर्व गरजा व मागण्या पूर्ण करणारे टीव्हीएस युरोग्रिप टायर बाजारात आणणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हे पाऊल टाकून आम्ही धडाडीने वर्तमानकाळाच्या पुढे गेलो आहे.”
टीव्हीएस युरोग्रिप बाजारात आणल्यामुळे आपल्या वाढीच्या आकांक्षांना चालना मिळेल असा विश्वास कंपनीला वाटत आहे. त्याचबरोबर बाजारपेठेत एक खास स्थान मिळवण्यात व त्यायोगे वाहन उत्पादक कंपन्यांशी भागीदारी बळकट करून रिप्लेसमेंट बाजारपेठेत नवीन मापदंड स्थापन करण्यात मदत होईल असेही कंपनीला वाटत आहे.
टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेडचे अध्यक्ष श्री. पी. श्रीनिवासवर्धन नवीन ब्रॅण्डच्या अनावरणाबद्दल म्हणाले, “गेल्या 3 दशकांहून अधिक काळापासून आम्ही स्वत:ला टू-व्हीलर टायर विभागातील अग्रगण्य जागतिक ब्रॅण्ड म्हणून प्रस्थापित केले आहे. आम्ही कायम ग्राहकांच्या गरजा, त्यांच्या आकांक्षा व स्वप्ने समजून घेतली आणि त्यांचा रायडिंगचा अनुभव अधिक समृद्ध करणारी उत्पादने त्यांना दिली. नवीन युगातील रायडरला हवे असलेले सर्व घटक टीव्हीएस युरोग्रिपमध्ये आहेत. डिझाइन, श्रेष्ठ दर्जा, उच्च कामगिरी हे घटक तर या उत्पादनांत आहेतच, शिवाय, टीव्हीएसचा समृद्ध वारसा व विश्वासही यात आहे.”