टेबल्झ या आघाडीच्या संघटित रिटेल ग्रुप तर्फे आंतरराष्ट्रीय लाईफ स्टाईल ब्रॅन्ड असलेल्या योयोसो ची सुरूवात पुण्यातील सिझन्स मॉल मध्ये केली आहे. भारतातील योयोसोचे हे चौथे स्टोअर असून गेल्या हिन्यात मंगळूरू येथे त्यांनी यशस्वी रित्या स्टोअर सुरू केले.
यावेळी बोलतांना टेबल्झ चे व्यवस्थापकीय संचालक अदीब अहमद यांनी सांगितले “ पुण्यात तरूणाईसाठी असलेला आकर्षक ब्रॅन्ड आणतांना आंम्हाला आनंद होत आहे. या स्टोअर च्या सुरूवाती मुळे आम्ही आमच्या ग्राहकांना दिलेले संपूर्ण परिवारासाठी आवश्यक खरेदीचा अनुभव देऊ करत आहोत.”
ते पुढे म्हणाले “ योयोसो मध्ये एकाच ठिकाणी सोप्या,फॅशनेबल आणि ट्रेंडी वस्तू मिळतील ज्या रोजच्या गरजेच्या आहेत. आंम्हाला खात्री आहे की चिकित्सक अशा भारतीय ग्राहकांच्या गरजा ओळखून ही उत्पादने असून यामुळे देशभरांतील लोकांना अनेक आश्चर्यकारक गोष्टी मिळाल्याने आनंद होईल.”
योयोसो ची स्थापना २०१४ मध्ये मा हुआंन यांनी एक आंतराष्ट्रीय लाईफस्टाईल ब्रॅन्डची शृंखला म्हणून केली. चीनच्या यीवू येथे मुख्यालय असलेल्या कंपनीचे व्यवस्थापन यीवू थिंक टँक्स ट्रेडिंग कंपनी लिमिटेड द्वारे केले जाते. या ब्रॅन्ड अंतर्गत परवडणार्या दरात, फॅशनेबल आणि ट्रेन्डी अशी रोजच्या उपयोगातील उत्पादने ही कार्यक्षमता, गुणवत्ता, डिझाईन आणि मुल्य यांचा समतोल साधून उपलब्ध करून देत दीर्घकालीन विकासाचे तत्वज्ञान सांभाळले जाते. आजमितीस योयोसो ची १ हजार स्टोअर्स असून ती ३६ विविध देशांतील १ बिलियन हून अधिक ग्राहकांना सेवा देत आहेत.
टेबल्झ ने योयोसो बरोबर सहकार्य करून भारतात हा ब्रॅन्ड उपलब्ध केला आहे. कंपनी तर्फे योयोसो ची स्टोअर्स पुढील पाच वर्षांच्या कालावधीत वाढवण्याची योजना असून पहिल्या टप्प्यात ३० स्टोअर्स ची सुरूवात करण्यात येणार आहे. योयोसोची सोप्या, नैसर्गिक, उच्च गुणवत्तेची आणि उच्च मुल्याची उत्पादने भारतातील चिकित्सक ग्राहकांच्या मनाला भावतील आणि त्यामुळे त्यांना आणि पुढील पिढीतील ग्राहकांना अनेक आश्चर्ये आणि आनंद देतील.
योयोसो ची ५ हजारांहून अधिक उच्च गुणवत्तेची उत्पादने असून यांत विविध विभागंत चांगली किंमत आणि कार्यक्षमतेचे गुणोत्तर असलेली उत्पादने आहेत. असलेल्या विभागांमध्ये आरोग्य आणि सौंदर्य, कलात्मक घरगुती गरजेच्या वस्तू, सिझनल उत्पादने, डिजिटल ॲक्सेसरीज, स्टेशनरी आणि भेटवस्तू, फॅशन ॲक्सेसरीज यांचा समावेश आहे. सौंदर्या बरोबरच प्रत्येक योयोसो उत्पादन हे वापरण्यास योग्य, कार्यक्षम आणि टिकाऊ आहे. स्टाईल वर लक्ष केंद्रित करून सोपेपणा आणि खुल्या मनाने उपलब्ध केल्याने फॅशन ही आपल्याला मिळते. केवळ परंपरागत कला टिकवण्या बरोबरच सातत्याने नाविन्य आणल्याने योयोसोच्या उत्पादनांची गुणवत्ता टिकून आहे. दर महिन्याला ५०० नवीन उत्पादने यांत आणली जातात ज्यामुळे ग्राहकांना नवीन ट्रेनृड बरोबर गुणवत्तापूर्ण जीवनशैली मिळण्यास मदत होते.