डेअरी डे घेऊन येत आहे हळद आणि च्यवनप्राश आईस्क्रीम

Marathi

डेअरी डे प्लस – भारतात प्रथमच, रोगप्रतिकारशक्ती वाढविणा-या पदार्थांपासून बनवलेले आईस्क्रीम

भारतातील टॉप 10 आईस्क्रीम ब्रॅण्ड्समध्ये समावेश असलेल्या आणि कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि पॉण्डीचेरीमध्ये सर्वदूर उपलब्ध असलेल्या डेअरी डे कंपनीने आज रोगप्रतिकारकशक्ती वाढविणा-या पदार्थांपासून बनलेल्या आपल्या डेअरी डे प्लस या आईस्क्रीमच्या नव्या अनोख्या मालिकेच्या बाजारपेठेतील पदार्पणाची घोषणा केली. डेअरी डे प्लस या मालिकेतील  आईस्क्रीममध्ये डेअरी डे चे सर्व चांगले गुणधर्म जपले गेले आहेतच, पण त्याचबरोबर आजच्या घडीला अत्यंत गरजेची बनलेली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे गुणधर्म सिद्ध झालेल्या खास पदार्थांची जोडही त्यांना देण्यात आली आहे. डेअरी डे प्लस मालिकेत सुरुवातीला हल्दी आईस्क्रीम आणि च्यवनप्राश आईस्क्रीम असे दोन नवे फ्लेवर्स उपलब्ध झाले आहेत.  

आज अन्न उद्योगक्षेत्र अभूतपूर्व बदलांना सामोरे जात आहे, जिथे ग्राहक सकस आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणा-या उत्पादनांच्या शोधात आहेत. डेअरी डे प्लस आईस्क्रीमची उत्पादने ग्राहकांचा हा बदलता कल जाणून घेत आपली सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेली, अप्रतिम चवीची उत्पादने त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. डेअरी डे च्या सर्वच उत्पादनांमधील नवे प्रयोग, त्यांचा विकास आणि उत्पादन हे डेअरी डेच्या कर्नाटकातील अद्ययावत उत्पादन केंद्रामध्ये केले जाते.  

हल्दी आईस्क्रीममध्ये हळद, मिरी आणि मध या रोगप्रतिकारशक्ती वाढविणा-या घटकांचा समावेश करण्यात आला आहे, तर च्यवनप्राश आईस्क्रीममध्ये ग्राहकांना आवळा, खजूर आणि मध यांच्या समृद्ध गुणधर्मांचा आस्वाद घेता येणार आहे. दुधाच्या उपजत फायद्यांसह या अतिरिक्त घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. डेअरी डे च्या हल्दी आणि च्यवनप्राश या दोन्ही फ्लेवर्सच्या आईस्क्रीममध्ये कोणत्याही कृत्रिम फ्लेवर्स किंवा रंगांचा वापर करण्यात आलेला नाही. 

डेअरी डेचे संचालक श्री. एम एन जगन्नाथ म्हणाले, ”नाविन्यपूर्ण आणि अनोखे फ्लेवर्स तसेच अत्यंत उच्च दर्जाची अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेची जपणूक यांसाठी डेअरी डे प्रसिद्ध आहे.  या अभूतपूर्व काळामध्ये ग्राहक रोगप्रतिकारशक्ती घडविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी अधिकचे प्रयत्न करत आहेत. आपल्या उत्पादनांच्या संपूर्ण मालिकेद्वारे आमच्या ग्राहकांना सुरक्षित आणि सुदृढ ठेवण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. डेअरी डे प्लस ही नवी उत्पादनश्रेणी बाजारात आणून आम्ही आपल्या सध्या उपलब्ध उत्पादनमालिकेमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ओळखल्या जाणा-या दोन पदार्थांचा समावेश केला आहे. हजारो वर्षांपासून आपण हळद दूध पित आलो आहोत आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायची 

तर एक चमचा च्यवनप्राश खाऊन वर ग्लासभर दूध पिण्याचा सल्लाही अनेक वर्षांपासून दिला जात आहे. हे दोन पदार्थ वापरून आईस्क्रीमबनविणारी डेअरी डे ही पहिलीच कंपनी ठरली आहे. त्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे गुणधर्म असल्याचे सिद्ध झालेले हे दोन पदार्थ वापरून बनलेल्या चविष्ट आईस्क्रीममचा आस्वाद घेणे ग्राहकांना व त्यांच्या कुटुंबियांना सहज शक्य होणार आहे.” 

हल्दी आणि च्यवनप्राश आईस्क्रीममची किंमत 60 मिलीच्या कपसाठी रु. 20/-  इतकी असून 700 मिलीचा टेक होम पॅक 199/- रुपयांच्या खास शुभारंभाच्या सवलतीत मिळणार आहे. हे अनोखे नवे फ्लेवर्स कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पॉण्डीचेरीमधील 30,000 हून अधिक आउटलेट्समध्ये उपलब्ध असणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *