डेअरी डे च्या प्रीमियम टब्सच्या आनंददायी श्रेणीच्या मदतीने या दसऱ्याचा गोडवा द्विगुणित करा. दसऱ्याच्या निमित्ताने कुटुंबियांसोबत ज्यांचा आस्वाद घेता येईल, पाहुण्यांना वाढता येतील आणि जवळच्या प्रिय व्यक्तींना भेट देता येतील असे गोड पदार्थ घरात आणण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. भारतातील पहिल्या दहा आईस्क्रीम ब्रॅण्ड्समध्ये असणाऱ्या डेअरी डे या ब्रॅण्डने येत्या सणासुदीच्या काळासाठी पारंपारिक भारतीय मिठाई व आईस्क्रीम्सची सांगड घालणारे पदार्थ आणले आहेत. काळाच्या ओघातही लोकप्रियता कायम ठेवणाऱ्या गाजर हलवा, गुलाबजामुन आणि रोझ कुल्फी या फ्लेवर्सची मजा आईस्क्रीमच्या स्वरूपात घेता येईल. नवरात्रीचे नऊ दिवस या आईस्क्रीम्ससह साजरे करा व दसऱ्याला याचा कळस गाठा.
२५० मिलीचे मिनी प्रीमियम टब्ज कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्रातील ३०,००० हून अधिक आऊटलेट्समध्ये ८०/- रुपये किंमतीला उपलब्ध आहेत.
रोझ कुल्फी आईस्क्रीम: गुलाबाच्या पाकळ्या घातल्यामुळे दूध मलाईयुक्त रोझ कुल्फी आईस्क्रीमला मुलायम पोत आणि तोंडाला पाणी सुटेल असा स्वाद आला आहे.
गाजर हलवा आईस्क्रीम: सुंदर रंग आणि पोत असलेली ही दूधमलाईची मेजवानी म्हणजे अस्सल गाजर हलवा व आईस्क्रीमचे मिश्रण आहे.
गुलाबजामुन आईस्क्रीम: सणासुदीच्या काळात विशेष लोकप्रिय असलेले हे आईस्क्रीम खरेखुरे गुलाबजामुन श्रीमंती चव बहाल करते आणि सणासुदीच्या उत्साहासाठी हा फ्लेवर उत्तम ठरतो!
डेअरी डेचे संचालक श्री. एम एन जगन्नाथ म्हणाले, “दसरा हे वाईटावर चंगल्याने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. हा आनंदाचा व सुखाचा काळ आहे. भारतात गोड पदार्थ हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. आपल्या संस्कृतीचा तसेच साजरीकरणाचा तो भाग आहे. डेअरी डेचे गाजर हलवा, गुलाबजामुन आणि रोझ कुल्फी हे फ्लेवर्स आईस्क्रीम व मिठाईचा अनोखा संयोग आहेत. पारंपरिक पाककृती वापरून ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्पादनाचा खराखुरा स्वाद जपला गेला आहे.”
डेअरी डेच्या मिनी प्रीमियम टब मालिकेत लिची व हापूस आंबा या फ्लेवर्सचाही समावेश आहे.