डेअरी डे या कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा व पाँडिचेरीमध्ये व्यापक उपस्थिती असलेल्या भारतातील टॉप १० आईस्क्रीम ब्रॅण्डने बाजारपेठेमध्ये ५०० मिली आईस्क्रीम केक्सची नवीन श्रेणी सादर केली. हे १०० टक्के व्हेजिटेरियन एगलेस आईस्क्रीम केक्स रेड वेल्वेट, चोको मोचा, चोको फॅन्टसी आणि हनी आल्मंड या ४ नवीन स्वादांमध्ये येत आहेत.
- रेड वेल्वेट आईस्क्रीम केक तुमच्या खास व्यक्तीसाठी अगदी योग्य आहे. या केकमध्ये रेड वेल्वेट केकच्या थरांदरम्यान आईस्क्रीम आहे, जो अगदी सँडविचप्रमाणे दिसतो.
- चोको मोचा आईस्क्रीम केक हा कॉफीप्रेमींसाठी असून यामध्ये आईस्क्रीम व केकसह कॉफीचा स्वाद आहे.
- चोको फॅन्टसी आईस्क्रीम केकमध्ये चॉकलेट केकसह चॉकलेट आईस्क्रीमचा स्वाद आहे, जो तोंडामध्ये सहजपणे विरघळत चॉकलेटप्रेमींना अस्सल चॉकलेटी स्वाद देतो.
- हनी आल्मंड आईस्क्रीम केक प्रत्येकाला अद्वितीय स्वादाचा अनुभव देतो. या केकमध्ये गोड मधासोबत वरील बाजूने बदामांची सजावट आहे.
डेअरी डे चे सह-संस्थापक श्री. एम एन जगन्नाथ म्हणाले, ”आईस्क्रीम केक हा, केक व आईस्क्रीम प्रेमींसाठी एक अनोखी ट्रीट आहे. डेअरी डे आईस्क्रीम केक ग्राहकांना दोन्ही मिष्टान्नांचा अनोखा स्वाद देतात, जे त्यांना खास अनुभव देतील. डेअरी डे ब्रॅण्ड आईस्क्रीम्सच्या अद्वितीय स्वादासाठी ओळखला जातो आणि ब्रॅण्ड बाजारपेठेमध्ये नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करण्यासाठी सतत प्रयत्न करतो. आम्ही यंदाच्या उन्हाळ्यामध्ये नवीन स्वाद व उत्पादनांची शृंखला सादर करणार आहोत.”
रेड वेल्वेट, चोको मोचा, चोको फॅन्टसी आणि हनी आल्मंड आईस्क्रीम केक्सची किंमत २९९ रूपयांपासून असून ते ५०० मिली आकारामध्ये उपलब्ध असतील. हे अद्वितीय नवीन फ्लेवर्स कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा व पाँडिचेरीमधील ३०,००० हून अधिक आऊटलेट्समध्ये उपलब्ध आहेत.