‘न्यूट्रीनॉर्म वेलनेस’ द्वारे ब्युटी व स्किनकेअर उत्पादनांची नवी श्रेणी लाँच

Marathi

आयुर्वेदावर आधारित नैसर्गिक उत्पादनांचा उदयोन्मुख ब्रँड न्यूट्रीनॉर्म वेलनेसने एव्हरग्रीन, रिक्रिएट, रिकिंडल, कॅप्टिव्हेट, रेझिस्टन्स आणि अपलिफ्ट अशा पाच गटांअंतर्गत ब्युटी, स्किनकेअर आणि हेअरकेअर उत्पादनांची नवी श्रेणी बाजारात आणली आहे. नैसर्गिक घटकांचा वापर आणि विस्तृत संशोधन यांच्या आधारे तुम्हाला सतेज, निरोगी त्वचा आणि मऊमुलायम केशसंभार मिळवून देण्यासाठी ही उत्‍पादने तयार करण्यात आली आहेत. कोरड्या, तेलकट, संवेदनशील आणि सामान्य त्वचेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही उत्पादने बाजारात दाखल करण्यात आली आहेत. न्यूट्रीनॉर्मच्या या नव्या श्रेणीतील उत्पादनांची किंमती 199 रु. पासून सुरू होत असून अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ईकॉमर्स पोर्टल्सवर ती उपलब्ध आहेत. याखेरीज ही उत्पादने भारतातील महत्त्वाच्या महानगरांमधील तसेच द्वितीय श्रेणी शहरांतल्या 1000 रिटेल स्टोअर्समध्येही उपलब्ध आहेत. 

न्यूट्रीनॉर्म उत्पादनांमधील शुद्ध, नैसर्गिक घटक आणि चेह-याच्या त्वचेचे पोषण करून तिला नवा तजेला मिळवून देणा-या इसेन्शियल ऑइल्सच्या साथीने तुम्हाला परीपूर्ण सौंदर्याचा ओतप्रोत अनुभव घेता येईल. या ब्रँडकडून चेह-यासाठी तयार करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये अँटी-एजिंग फेस वॉशेस, ऑइल कंट्रोल, अ‍ॅक्ने अँड क्लिअर फेस, ब्लेमिश कंट्रोल, फेस स्क्रब, अंडर आय क्रीम, फेस मास्क आणि नाइट रिपेअर क्रीम यांचा समावेश आहे. केसांसाठीच्या उत्पादनांमध्ये डँड्रफ, रिव्हायटलायझिंग, हेअर व्हॉल्युमायझर आणि प्रोटीन अशा विविध प्रकारातील शाम्पूंचा समावेश आहे. त्वचेसाठीच्या ब्रँडने त्वचेला नवा तजेला देणा-या बॉडी लोशनची निर्मिती केली आहे.

या उत्पादनश्रेणीच्या बाजारपेठेतील लाँचविषयी बोलताना न्यूट्रीनॉर्म वेलनेसचे एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर श्री. डॉ. रवी शंकर म्हणाले, ”स्कीनकेअर आणि ब्युटी रिटेल हे वेगाने वाढत असलेले उद्योगक्षेत्र आहे. अनेक स्पर्धक बाजारपेठेमध्ये आपली वेगवेगळी उत्पादने आणि व्यापारी कल्पना घेऊन उतरत आहेत. आपली नवी उत्पादने बाजारात आणताना व उत्तम परिणाम साधून देणारी अनोखी उत्पादने आपल्या ग्राहकांच्या सेवेत दाखल करताना न्यूट्रीनॉर्म वेलनेसला खूप आनंद होत आहे. आमची उत्पादने 100 % वनौषधींपासून तयार केलेली आहेत व त्यांची निर्मिती वैज्ञानिक संशोधनांवर आधारलेली आहे. मजबूत टीम आणि वितरण यंत्रणांच्या साथीने आम्ही 2000 सालच्या अखेरपर्यंत 100 कोटींच्या एकूण महसुलापर्यंत पोहोचण्याचे तसेच 2020 वर्षापर्यंत भारतातील प्रमुख महानगरांतील आणि द्वितीय श्रेणी शहरांतील 1000 रिटेल स्टोअर्सपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आखले आहे.  ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *