राजा परांजपे प्रोडक्शनच्या वतीने पाचव्या ‘राजा परांजपे करंडक दीर्घांक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे २१, २२ व २६ डिसेंबर रोजी तर मुंबईतील यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे २७ व २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायं ९ या वेळेत करण्यात आले असल्याची माहिती राजा परांजपे प्रोडक्शनच्या संचालिका अर्चना राणे यांनी दिली.
स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून या स्पर्धेत एकून २८ संघ सहभागी होणार आहेत. सहभागी झालेल्या दीर्घांकापैकी सर्वोत्तम १० दीर्घांक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करतील. स्पर्धेची अंतिम फेरी १५ ते १८ जानेवारी २०२० रोजी भरत नाट्य मंदीर येथे रात्री ९ ते १२ यावेळेत व १९ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार असून १९ जानेवारीला सायं ५ वाजता बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.
कलाकारांना आपले कलागुण सादर करता यावे आणि त्यांना व्यासपीठ मिळावे, हा स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अर्चना राणे (८३०८३०८६८६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.