कार, बाईक हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा विषय. अशाच काही मोटारबाईक्स, सायकल, दुचाकी, चारचाकी, व्यवसायिक वाहने, इलेक्ट्रिक वाहने, विंटेज कार्स आणि ऑटो अॅक्सेसरीज पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे ‘प्राईम व्हॅल्यू मार्केटिंग सर्व्हिसेस’ तर्फे आयोजित जागतिक दर्जाच्या ‘पुणे मोटार शो २०१९’चे. आज पासून सुरु झालेले हे प्रदर्शन रविवार, दि. २२ सप्टेंबर २०१९ पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत येरवडा येथील डेक्कन कॉलेज ग्राउंड येथे होणार आहे. या तीन दिवसीय प्रदर्शनात गाड्यांशी संबंधित ५० पेक्षा अधिक स्टॉल्स व ब्रँडस् असणार आहेत. ‘प्राईम व्हॅल्यू मार्केटिंग सर्व्हिसेस’ तर्फे आयोजित जागतिक दर्जाच्या ‘पुणे मोटार शो २०१९’ मध्ये आज मोटर बाईक्सचा स्टंट शो पहायला मिळाला. आज पासून सुरु झालेले हे प्रदर्शन रविवार, दि. २२ सप्टेंबर २०१९ पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत येरवडा येथील डेक्कन कॉलेज ग्राउंड येथे होणार आहे. या तीन दिवसीय प्रदर्शनात गाड्यांशी संबंधित ५० पेक्षा अधिक स्टॉल्स व ब्रँडस् असणार आहेत.