फेमिना या भारताच्या आघाडीच्या वुमेन्स ब्रॅण्डने‘फेमिनाज मोस्ट पॉवरफुल २०१९-२०२०’ कार्यक्रमामध्ये सर्वात प्रभावशाली व्यक्तींचे यश व योगदानाला सन्मानित केले. पुण्यातील आयक्यू हयात रिजन्सी हॉटेल येथे या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या संध्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अर्जुन कपूर यांनी खासरित्या तयार करण्यात आलेल्या कॉफी-टेबल पुस्तिकेचे अनावरण केले. या पुस्तिकेमध्ये शहरातील ४७ प्रतिष्ठित व्यक्तींची नावे होती. पुस्तिका अनावरणानंतर फेमिनाने व्यवसाय, मनोरंजन, फॅशन अशा विविध क्षेत्रांमधील प्रेरक व प्रभावी व्यक्तींना सन्मानित केले.
याप्रसंगी बोलताना फेमिना येथील संपादक व मुख्य समुदाय अधिकारी तान्या चैतन्य म्हणाल्या, ”फेमिनामधील आमच्यासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. आम्ही आमच्या ६०व्या वर्धापन दिनाच्या उल्लेखनीय प्रसंगी पुणेज मोस्ट पॉवरफुलच्या तिस-या पर्वाचे आयोजन करत आहोत. आज पुणे हे प्रमुख केंद्र बनले आहे आणि येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, व्यवसाय गुंतवणूक होताना दिसत आहे. तसेच हे शहर राजकीयदृष्ट्याही महत्त्वपूर्ण ठरत आहे. शहरातील प्रतिभावान व यशस्वी व्यक्तींचा सन्मान करत फेमिना अशा प्रकारचे उद्योजक आयपीजचे आयोजन करण्याचे कार्य सुरूच ठेवेल. ज्यामुळे पुणेकरांना पुढाकार घेत सर्वोत्तमता गाठण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळेल.”
अभिनेता अर्जुन कपूर, नेहा धुपिया, राजकारणी प्रिया दत्त अशा प्रतिष्ठित व सुप्रसिद्ध व्यक्तींनी या भव्य कार्यक्रमामधील रेड कारपेटची शोभा वाढवली.
या संपन्न अशा संध्या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रांमधील शहरातील प्रभावी व्यक्तिमत्त्वे उपस्थित होती. जसे उषा काकडे – समाजसेविका व उद्योजक महिला, ग्रॅव्हिटस ग्रुप; प्रयाग खोसे – खोसे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक; माधुरी भादुरी – प्रख्यात अभिनेत्री; ज्योत्स्ना उत्तमचंदानी – सिस्का ग्रुपच्या कार्यकारी संचालिका; अभय काळे – मुख्य व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक; सिद्धार्थ वासुदेवन मूर्ती – वास्कॉन इंजीनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक; आनंद व पल्लवी गुप्ता – क्रिस्प हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. अॅण्ड लॅडर ऑफ लर्निंगचे व्यवस्थापकीय संचालक; मिलिंद दाते – बासरी वादक; उल्का व तेजस्वी बाफना – उल्का.एसबीचे डिझाइनर्स; संजय घोडावत – संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि इतर अनेक दिग्गज व्यक्ती.ही अत्यंत संस्मरणीय संध्याकाळ ठरली. या संध्या कार्यक्रमामध्ये शहरातील सर्वोत्तम व्यक्तिमत्त्वे इतर सर्वांचे त्यांच्या संबंधित क्षेत्रांमधील यश प्रशंसित करण्यासाठी एकाच छताखाली आली.
मेंटॅलिस्ट प्रवीण नायर यांनी गूढ कलांचे सुरेख सादरीकरण सादर करत प्रेक्षकांना अचंबित केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.