पुणे महानगरपालिकेने सोनावणे हॉस्पिटलच्या बाह्य प्रतिक्षालयाला बदलले मुलांना व कुटुंबांना अनुकूल अशा क्षेत्रामध्ये

Marathi

तान्‍ह्या व चिमुकल्‍या बालकांसह कुटुंबांचा या मौजमजेने परिपूर्ण उपक्रमामध्‍ये मोठ्या संख्‍येने सहभाग

शहरामध्‍ये मुले व कुटुंबांसाठी अनुकूल अशा जागांना चालना देण्‍याच्‍या उद्देशासह पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) बर्नार्ड व्‍हॅन लीअर फाऊंडेशन, तसेच तंत्रज्ञान भागीदार तारू लीडिंग एज व इकोफर्स्‍ट सर्विसेस लि. आणि एसएमईएफ ब्रिक स्‍कूल ऑफ आर्किटेक्‍चरसोबत सहयोगाने भवानी पेठ येथील सोनावणे हॉस्पिटलमध्‍ये धोरणात्‍मक यू-अर्बनिझम इंटरवेन्‍शनची अंमलबजावणी केली. पुण्‍यातील प्रख्‍यात वैद्यकीय सुविधांपैकी एक असलेल्‍या सोनावणे हॉस्पिटलच्‍या बाह्य प्रतिक्षालयाला शनिवार २२ फेब्रुवारी २०२० रोजी मुले व कुटुंबांना अनुकूल अशा उत्‍साही जागेमध्‍ये बदलण्‍यात आले.

हॉस्पिटल्‍स कुटुंबांसाठी तणावग्रस्‍त व कंटाळवाणी ठिकाणे ठरू शकतात. मुले आणि त्‍यांचे पालक, आजी-आजोबा आणि भाऊ-बहिणी व इतर अशा त्‍यांच्‍या केअरगिव्‍हर्ससाठी सर्वसमावेशक, आरामदायी, सुरक्षित व उत्‍साहपूर्ण बाह्यक्षेत्र देण्‍याचा या उपक्रमाचा उद्देश होता. ज्‍यामुळे ते प्रसूती रूग्‍णालयाला भेट देतील किंवा बाह्य प्रतिक्षालयामध्‍ये प्रतिक्षा करतील तेव्‍हा त्‍यांना मुलांना अनुकूल अशा जागांचा परिणाम व महत्त्‍व दिसून येईल. यामधील पायाभूत सुविधा व सेवा तान्‍ही मुले, युवा मुले व त्‍यांची कुटुंबे, तसेच प्रसूती रूग्‍णालये व हेल्‍थ क्लिनिक्‍सच्‍या गरजांची पूर्तता करतात.

या उपक्रमामध्‍ये छत असलेल्‍या स्‍वच्‍छ बाह्य जागांचे निर्माण, आनंदमय अनुभव देणारी आसन व्‍यवस्‍था, रंगबेरंगी मजले आणि मुलांच्‍या मानसिक, सामाजिक व शारीरिक विकासावर भर देणारे वॉल गेम्‍स, तसेच पार्किंगसाठी पर्यायी जागा यांचा समावेश होता. स्‍थानिक समुदायाने, विशेषत: तान्‍ही व चिमुकली मुले असलेल्‍या कुटुंबांनी त्‍यांच्‍यासाठी निर्माण करण्‍यात आलेल्‍या या जागेचा अधिक उत्‍साहात आनंद घेतला. ब्रिक स्‍कूल ऑफ आर्किटेक्‍चरमधील विद्यार्थी, हॉस्पिटल व आरोग्‍य विभाग कर्मचारी, भवानी पेठ वॉर्ड अधिकारी यांनी मुले व कुटुंबांसाठी अनुकूल असे प्रतिक्षालय तयार करण्‍यामध्‍ये सक्रियपणे सहभाग घेत साह्य केले.

पुण्‍याच्‍या नगरसेविका माननीय श्रीमती अर्चना पाटील म्‍हणाल्‍या, ”यासारखे मुले-केंद्रित उपक्रम समाजाच्‍या विकासासाठी अत्‍यंत महत्त्‍वाचे आहेत. शहरामध्‍ये अशा प्रकारच्‍या उपक्रमांचे आयोजन करण्‍यासाठी मी पीएमसी अधिकारी, बीव्‍हीएलएफ आणि सर्व भागधारकांचे आभार मानते.”

पुण्‍याच्‍या नगरसेविका माननीय श्रीमती मनिषा लडकट म्‍हणाल्‍या, ”मला या उपक्रमासाठी कुटुंबे व मुले मोठ्या उत्‍साहाने सहभाग घेत असल्‍याचे पाहून खूप आनंद होत आहे. आपण युवा मुले व केअरगिव्‍हर्सवर मुख्‍यत्‍वेकरुन केंद्रित अशा प्रकारच्‍या अधिकाधिक उपक्रमांना चालना दिली पाहिजे. ज्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठी सुरक्षित, उपलब्‍ध होण्‍याजोण्‍या जागांमध्‍ये वाढ होण्‍यासह त्‍यांच्‍या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.”

बर्नार्ड व्‍हॅन लीअर फाऊंडेशनच्‍या भारतातील प्रतिनिधी श्रीमती रूशदा माजीद म्‍हणाल्‍या, ”प्रत्‍येक उपक्रमासह अर्बन९५ तान्‍ही व चिमुकली मुले आणि त्‍यांचे पालक व इतर केअरगिव्‍हर्सना लाभदायी ठरणा-या स्‍वच्‍छ, हरित सार्वजनिक ठिकाणांचे महत्त्‍व सांगण्‍याचा प्रयत्‍न करते. आम्‍ही हा उपक्रम मोठ्या मनाने पुढे घेऊन जाण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी पुणे महानगरपालिकेचे आभार मानतो. सोनावणे हॉस्पिटल येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या उपक्रमामधून तरूण मुले व त्‍यांच्‍या कुटुंबांचे रोजचे जीवन सुधारण्‍यासाठी सोप्‍या उपायांना दाखवण्‍यात आले.”

पीएमसीच्‍या आरोग्‍य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकरे म्‍हणाले, ”आम्‍हाला या उपक्रमाच्‍या परिणामांचा आनंद होत आहे. या उपक्रमाला सहभागींकडून उत्‍साहापूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. आम्‍ही मुले व केअरगिव्‍हर्सचे सर्वाधिक प्रमाण असलेल्‍या नवीन व विद्यमान हॉस्पिटल्‍समध्‍ये तरूण मुलांसाठी उत्‍साहपूर्ण, सुरक्षित व उपलब्‍ध होण्‍याजोग्‍या जागांचा विकास करण्‍याला चालना देत राहू.”

पीएमसीला बीव्‍हीएलएफचा पाठिंबा आहे आणि पुण्‍याला बीव्‍हीएलएफच्‍या जागतिक अर्बन९५ उपक्रमांतर्गत मुले व कुटुंबासाठी अनुकूल शहर बनवण्‍याचा महानगरपालिकेचा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *