पुण्यातील पर्यटन संस्थेला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा पुरस्कार

Marathi

ऑफबीट टुरीझमसाठी ओळखल्या जाणा-या पुण्यातील इन्फाईनाईट जर्नीज या पर्यटन संस्थेचा पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ‘देशांतर्गत सर्वोत्तम सहल आयोजक’ या विभागात पर्यटन मंडळातर्फे वेळोवेळी प्रसिद्ध होणा-या मार्गदर्शन सूचनांनुसार उच्च दर्जाच्या सहल आयोजनासाठी व ग्राहक सेवांसाठी हा पुरस्कार दिला गेला. सलग दुस-या वर्षी या पुरस्काराने ‘इन्फाईनाईट जर्नीज’चा सन्मान करण्यात आला आहे हे विशेष.

केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेचे (युएनडब्लूटीओ) सरचिटणीस झुरब पोलोलिकेशविली यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. इन्फाईनाईट जर्नीजचे संचालक अभय घाणेकर आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी मयुरेश बोरसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती, संस्था, राज्य पर्यटन महामंडळे यांचा दरवर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने सन्मान करण्यात येतो. या वर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष  २०१७- १८ मधील कामगिरी अभ्यासली गेली.

इन्फाईनाईट जर्नीज ही संस्था मागील १९ वर्षे पर्यटन क्षेत्रात कार्यरत असून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण, आरामदायी, ऑफबीट टुरिझम म्हणजेच चौकटीबाहेरील सहलींबरोबर साहसी पर्यटन, उत्तम नियोजन, उत्तम सेवा  यांसाठी ओळखली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *