भारताचे स्टार क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांनी आज भारताचे पहिले एक्स्पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच केला आहे. या अॅपचा देशातील क्रिकेट प्रशिक्षण अनुभव पुनर्परिभाषित करण्याचा मनसुबा आहे.
देशातील एआय आधरित क्रिकेट प्रशिक्षणामध्ये अग्रस्थानी असलेल्या क्रिकुरूचा युजर्सना वैयक्तिकृत लर्निंग अनुभव देण्याचा मनसुबा आहे. प्रत्येक खेळाडूसाठी अभ्यासक्रम श्री. विरेंदर सेहवाग आणि माजी भारतीय खेळाडू व भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाज प्रशिक्षक (२०१५-१९) श्री. संजय बांगर यांनी व्यक्तिश: विकसित केला आहे. तंत्रज्ञान संचालित नवोन्मेष्काराच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट नव्या उंचीवर पोहोचत असताना भारत देखील देशातील महत्त्वाकांक्षी क्रिकेटर्सना अशाच प्रकारचा अनुभव देण्यासाठी यामध्ये सामील होण्याची गरज होती.
क्रिकुरूच्या लाँचबाबत आपले मत व्यक्त करत क्रिकुरूचे संस्थापक श्री. विरेंदर सेहवाग म्हणाले, ”क्रिकुरूमध्ये आमचा भारतातील क्रिकेट प्रशिक्षणाचे लोकशाहीकरण करण्यासाठी आणि सध्या असलेली पोकळी भरून काढण्यासाठी इकोप्रणाली विकसित करण्याचा मनसुबा आहे. आमचा अभ्यासक्रम अत्यंत बारकाईने डिझाइन करण्यात आला आहे. यामुळे जगभरातील तज्ञ प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटनुसार महत्त्वाकांक्षी क्रिकेटर्सना विनासायास प्रशिक्षण देता येईल.”
क्रिकुरूचे सह-संस्थापक श्री. संजय बांगर म्हणाले, ”देशभरात द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांसह कानाकोप-यामधील लोकांना क्रिकेट प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा क्रिकुरूचा दृष्टिकोन आहे. या अॅपमुळे त्यांना त्यांच्या घरामधूनच आरामशीरपणे प्रशिक्षण मिळू शकते. स्मार्टफोन व इंटरनेटचा वापर वाढत असताना ही सुविधा महत्त्वाकांक्षी क्रिकेटर्ससाठी अधिक सुलभपणे उपलब्ध होईल.”
क्रिकुरू हे प्रात्यक्षिक व मुलाखतींचे संयोजन आहे, जेथे तुमचा क्रिकुरू तुम्हाला त्याचा अनुभव सांगण्यासोबत प्रशिक्षण देतो. प्रत्येक क्लासमध्ये व्यापक प्री-रेकॉर्ड केलेले व्हिडिओ कन्टेन्ट आहेत आणि हे व्हिडिओज थांबवता येऊ शकतात, पुढे करता येऊ शकतात आणि वारंवार पाहता येऊ शकतात. हा अॅप आयओएस व अँड्रॉईड डिवाईसेसवर उपलब्ध आहे आणि युजर्स www.cricuru.com येथे लॉग ऑन करून १ वर्षासाठी अॅप सबस्क्राईब करू शकतात. सबस्क्रिप्शन फी १ वर्षाच्या कालावधीसाठी २९९ रूपयांपासून सुरू होते.