रेनो’चे भारतातील कामकाजाचे हे 10 वे वर्ष असून जागतिक पटलावर सर्वोच्च कामगिरी बजावून प्रत्येक भारतीयाचा मान उंचावणाऱ्या प्रसिद्ध वेटलिफ्टर आणि #TokyoOlympics2020मध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या सैखोम मीराबाई चानू हिचा रेनो काइगर देऊन सन्मान करण्यात आला. पूर्व इंफाळमधील एका गावाची रहिवासी असलेल्या मीराबाईने केवळ संपूर्ण देशाला गौरवान्वित केलेले नसून स्वत:ची जिद्द आणि वचनबद्धतेच्या जोरावर ती इतर अनेक खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे. आपल्या मर्यादा पार करण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणाऱ्या अब्जावधी भारतीयांना तिचा कष्टप्रद प्रवास आपलासा वाटतो.तिचा हा प्रवास देखण्या, स्मार्ट आणि स्पोर्टी काइगर समवेत साजरा करणे रेनोच्या दृष्टीने सन्मानाची बाब आहे.
रेनो इंडियाचे उपाध्यक्ष – विक्री आणि विपणन सुधीर मल्होत्रा यांच्या हस्ते नव्याकोऱ्या रेनो काइगरच्या चाव्या#TokyoOlympics2020 रौप्य पदक विजेत्या सैखोम मीराबाई चानूकडे सुपूर्द करण्यात आल्या.
रेनो काइगर या नव्याकोऱ्या चार मीटर आटोपशीर एसयुव्हीचे डिझाईन आणि विकास भारतात झाला. यामध्ये काही स्मार्ट वैशिष्ट्ये, स्पोर्टी, जगात सर्वोत्कृष्ट टर्बोचार्ज 1.0लिटर पेट्रोल इंजिन आहे, रेनो काइगरचे हे अभिनव उत्पादन भारतीय वाहन बाजारपेठेला लक्ष्य करून तयार करण्यात आले आहे. रेनो काइगरचे देखणे डिझाईन त्याच्या स्पोर्टी आणि मर्दानी वैशिष्ट्यांना अधोरेखित करते. ज्यामुळे रेनो काइगर ही एक अस्सल एसयुव्ही ठरते. रेनो काइगरच्या अंतर्गत भागात स्मार्ट केबिन देण्यात आले असून त्यात तंत्रज्ञान, कार्यवहन आणि प्रशस्त जागेची भट्टी चांगली जमली आहे. त्यामधील इंजिन उच्च कामगिरी बजावणारे, आधुनिक आणि कार्यक्षम आहे. जे स्पोर्टी ड्राईव्हची खातरजमा करते आणि ज्यामधील मल्टी सेन्स ड्राईव्ह मोड्स लवचिकता प्रदान करतात. जे ग्राहकांच्या ड्रायव्हींग प्राधान्यांना साजेसे आहेत.
रेनो इंडियाने भारतात आपल्या कामगिरीची दिमाखदार दहा वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या जल्लोषाचा भाग म्हणून रेनो इंडियाने रेनो काइगरचे सर्वार्थाने नवीन आरएक्सटी (ओ) वेरीयंट लॉन्च केले आहे. भारतात विक्री आकारमानाला चालना देण्याच्या अनुषंगाने एकत्र आपल्या उत्पादन पोर्टफोलियो विस्तार करून रेनोने भारतात आपले नेटवर्क चांगले वाढवले आहे. रेनो ब्रँडसोबत ग्राहकांचा अद्वितीय संबंध राहावा याकरिता काही अभिनव आणि आद्य उपक्रम राबवले आहेत. सध्या रेनो इंडियाचे भारतात 500हून अधिक विक्री आणि सर्विस टचपॉइंट आहेत, ज्यामध्ये देशभरात 200+हून अधिक वर्कशॉप ऑन व्हील्स लोकेशनचा समावेश आहे.