फोर्स मोटर्सच्या वतीने नेक्स्ट जेन शेअर्ड मोबिलिटी प्लॅटफॉर्म – T1N चे अनावरण

Marathi

पुणे येथील वाहन क्षेत्रातील महत्त्वाचा खेळाडू फोर्स मोटर्स (भारताचा सर्वात मोठा व्हॅन निर्मातादार) यांनी आज देशाच्या फर्स्ट जनरेशन नेक्स्ट जेन शेअर्ड मोबिलिटी प्लॅटफॉर्मची आज मीडियासमोर घोषणा केली. हा प्लॅटफॉर्म समांतरपणे दोन्ही इंटर्नल कम्बश्चन इंजिन आणि 100% इलेक्ट्रीक ड्राईव्हकरिता डिझाईन आणि विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे कोडनेम T1N असून चार वर्षांपूर्वीपासून त्यावर काम सुरू होते. हे विकसित करण्यामागचा उद्देश खऱ्या अर्थाने शेअर्ड मोबिलिटी प्लॅटफॉर्म विकसित करणेजो सध्याच्या उपलब्धतेहून एक पाऊल पुढे असेल तसेच आंतरराष्ट्रीय मानकांच्या प्रवाशांच्या आरामदायक, सुलभ आणि सुरक्षेनुसार तयार करण्यात आला आहे.

T1N हे देशातील या प्रवर्गातील असे पहिले वाहन आहे, जे आपला चालक आणि सहचालकाला अपघाती टक्कर किंवा वाहन उलटण्याच्या प्रसंगात एअर बॅगसमवेत संरक्षण प्रदान करते. अर्थात सध्याच्या भारतीय कायद्याने त्याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही. त्याशिवाय T1N सर्व चाकांवर एबीएस, ईबीडी, ईडीटीसी आणि ईएसपी समवेत मोठ्या वेंटीलेटेड डिस्क ब्रेक्सच्या साह्याने प्रवाशांना अद्वितीय सुरक्षा उपलब्ध करून देते.  T1N हे वाहन जागतिक आकांक्षेने विकसित करण्यात आले असून तिचे डिझाईन मध्य-पूर्व, आफ्रिका,  एएसईएएन आणि दक्षिण अमेरिकेच्या निवडक बाजारपेठांमध्ये कार्यान्वयनाकरिता संरक्षित ठेवण्यात आले आहे, जिथे T1N युरोप, अति पूर्व आणि अमेरिकेकडील अतिआलिशान उत्पादनांच्या तुलनेत सर्वोत्तम मूल्य प्रस्तावासह तयार करण्यात आल्याची अपेक्षा आहे.

T1N मध्ये नवीन आणि अधिक शक्तिशाली बीएस6 अनुपालकाची जोड असून त्यात कॉमन रेल डिझेल इंजिन आहे, जे 350 एनएम सर्वोच्च टॉर्क देऊ करते. हा प्लॅटफॉर्म बीएस6 सीएनजी वेरीएन्ट देऊ करणार असून पूर्ण इलेक्ट्रीक पर्यायातही उपलब्ध आहे. या नवीन प्लॅटफॉर्मवर  अंतीम वैधता आणि होमोलोगेशन प्रक्रिया समाविष्ट आहे. यामधील नवीन अत्याधुनिक सुविधा, बॉडी शॉप समवेत रोबोटीक आणि लेसर वेल्डिंग सुविधेचे काम पिथमपुरा येथे करण्यात आले. हे वाहन आगामी दिल्ली ऑटो एक्स्पो 2020 मध्ये होणार आहे. यावर्षाच्या अखेरीपर्यंत हा पर्याय विक्रीसाठी तयार असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

याप्रसंगी बोलताना फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले की, “या सेगमेंटमधील मातब्बर म्हणून ग्राहकांना सेवा देऊ करणे ही आमची जबाबदारी समजतो. आम्ही केवळ त्यांची गरज जाणून घेत नाही, तर ते कशासाठी इच्छुक आहेत याची चाचपणी करतो. त्यामुळेच आम्ही खऱ्या अर्थाने, प्रत्येक पैलूने अग्रगण्य व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा जागतिक दर्जाचा नेक्स्ट जनरेशन प्लटफॉर्म विकसित करण्यासाठी सज्ज झालो आहोत. आमचे ग्राहक या वाहन पर्यायाचे निश्चितपणे स्वागत करतील, याविषयी आम्हाला आत्मविश्वास वाटतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *