बर्नार्ड व्हॅन लीअर फाउंडेशनने (बीव्हीएलएफ) तीन वर्षीय छोट्यांच्या नजरेतून शहरातील आयुष्याचे दर्शन घडवणारी यंग एक्सप्लोअरर्स ही व्हिडिओ मालिका प्रदर्शित केली आहे. या पाच लघुपटांच्या मालिकेत छोटी मुले तुम्हाला त्यांच्या शहराच्या दैनंदिन प्रवासांना घेऊन जातात.
भारतातील पुणे आणि ब्राझिलमधील रेसाइफ या दोन परस्परविरुद्ध शहरांच्या प्रवासाला ही मुले प्रेक्षकांना घेऊन जाणार आहेत. पुण्याच्या मोक्षदा आणि अहानसोबत प्रवासाला तयार व्हा. ते त्यांच्या पालकांसोबत रस्त्यांवरून फिरतील आणि दररोज त्यांच्यासमोर येणाऱ्या संधी व आव्हानांचे अनुभव सर्वांना सांगतील.
आज एक अब्जाहून अधिक मुले शहरांतून राहतात. लहानाचे मोठे होण्यासाठी शहर हे उत्तम स्थळ होऊ शकते. मात्र, बाळांच्या, लहान मुलांच्या तसेच त्यांची काळजी घेणाऱ्या मोठ्यांच्या आरोग्य व स्वास्थ्यापुढे शहरे मोठी आव्हाने उभी करतात. निसर्गाशी तुटलेला संपर्क, खेळण्यासाठी सुरक्षित जागांचा अभाव, वायूप्रदूषण, वाहतुकीची कोंडी येथपासून ते समाजापासून तुटून येणाऱ्या एकाकीपणापर्यंत कित्येक आव्हाने शहरांतील आयुष्यांमध्ये आहेत.
बीव्हीएलफच्या भारतातील प्रतिनिधी श्रीमची रुषदा मजीद यंग एक्सप्लोअरर्स मालिकेबद्दल म्हणाल्या, “मुले म्हणजे भवितव्य आहे आणि त्यांच्या स्वास्थ्याची काळजी लहान वयापासून घेणे महत्त्वाचे आहे. शहरी भागांत राहणाऱ्या बाळांपुढील तसेच छोट्या मुलांपुढील आव्हाने वाढत आहेत. त्यांच्या खेळण्याच्या तसेच आजुबाजूच्या वातावरणातून शिकण्याच्या संधी हिरावल्या जात आहेत. त्यांच्या पालकांसाठी तसेच त्यांना सांभाळणाऱ्या अन्य लोकांसाठी छोट्यांना बरोबर घेऊन शहरातून तसेच आजुबाजूच्या परिसरातून वाट काढणे आव्हानात्मक झाले आहे. दुसऱ्या बाजूला बाळांना तसेच लहान मुलांना शोध घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी तसेच दृश्य-ध्वनी आणि अन्य नागरिकांकडून शिकण्यासाठी शहरे उत्कृष्ट संधी देत आहेत. वेगाने शहरीकरणाच्या विळख्यात सापडत असलेल्या या वातावरणात लहान मुले व त्यांना सांभाळणारे मोठे शहरी आयुष्यातून कशी वाट काढतात हे पुण्यातील या ‘यंग एक्सप्लोअरर्स’च्या नजरेतून आम्हाला दाखवायचे आहे. त्याचबरोबर ही शहरे लहान मुलांना आकर्षक व सुरक्षित वातावरणात शिकण्याच्या व मोठ्या होण्याच्या संधी कशा देऊ शकतील यावर विचार करण्याचे आवाहन आम्हाला लोकांना करायचे आहे.”
पुण्याची लोकसंख्या ३ दशलक्षहून अधिक आहे. यामुळे लहान मुले असलेली अनेक कुटुंबे आहेत. लहान मुले व त्यांची कुटुंबे हिरव्यागार जागा, मोकळ्या जागा, स्वच्छ हवा आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याची सोय यांच्या माध्यमातून लहान मुले व त्यांचे कुटुंबीय एका समृद्ध आयुष्याचा अनुभव घेऊ शकतात. आपल्या वेगाने बदलणाऱ्या शहरांमध्ये बाळांसाठी, लहान मुलांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षित, निरोगी आणि खेळकर परिसरांची किती गरज आहे यावर प्रकाश टाकणे हे ‘यंग एक्सोप्लोअरर्स’ या व्हिडिओ मालिकेचे उद्दिष्ट आहे.