मदर्स रेसिपीचे इन्स्टंट मिक्स कॅटॅगरीमध्ये आणखी एक महत्वपूर्ण पाऊल ; भारतीय नाश्त्यामधील उत्कृष्ट पर्याय ‘इन्स्टंट उपमा’ सादर

Marathi

सकाळचा नाश्ता हा मानवी आहारातील एक अतिशय महत्वपूर्ण घटक समजलाजातो. नाश्त्याच्या माध्यमातून रात्रभर झालेला उपवास सुटत असतो, तसेच शरीरात निर्माण झालेली ग्लुकोजची कमतरता पूर्ण होते. नाश्त्यामुळे शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक मिळतात आणि दिवसभर ताजेतवाणे राहण्यासाठी उर्जेची पुर्ती होऊ लागते. नाश्त्याचे आहारातील हेच महत्व लक्षात घेऊन भारतात घरगुती खाद्यपदार्थ विभागात आघाडीचे नाव असणार्‍या मदर्स रेसिपीने आपल्या इन्स्टंट मिक्स कॅटॅगरीचा विस्तार केला आहे. मदर्स रेसिपीने पारंपारिक भारतीय नाश्ता असणारा इन्स्टंट उपमा मिक्स सादर केला आहे. दक्षिण भारतातील खास असणारी ही डिश ताजे आणि अस्सल घटक जसे रवा, उडीद डाळ, कांदा, हिरवी मिरची, जिरा, कडीपत्ता, लिंबाची पूड आणि हिंग यापासून बनवलेल्या इन्स्टंट मिक्सपासून बनणार आहे. मदर्स रेसिपीच्या खास जादुई स्पर्शाने तयार करण्यात आलेली ही इन्स्टंट मिक्स तुम्हाला तुमच्या सोईनुसार बनवता येते. इन्स्टंट उपमा तयार करण्यासाठी ग्राहकांना इन्स्टंट मिक्समध्ये केवळ गरम पाणी मिसळावे लागेल आणि पाचच मिनिटांत ते खाण्यासाठी तयार होईल.

या नवीन कॅटॅगरीबाबत बोलताना मदर्स रेसिपीच्या चिफ स्ट्रॅटीजी ऑफिसर संजना देसाई यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इन्स्टंट फूड हा प्रकार खूप लोकप्रिय होत आहे. तो बनवण्याचा सोपा प्रकार, सहज उपलब्ध होणारे प्रोडक्ट्स आणि त्यामधून मिळणारी पदार्थांची अस्सल चव यामुळे देशातील कोणत्याही रिटेल फूड स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. फ्यूचर मार्केट इनसाईट्सच्या एका अहवालानुसार, भारतातील इन्स्टंट फूड बाजारपेठ प्रत्येक वर्षी 15.7 टक्क्यांनी वाढत असून ती 2020 पर्यंत 284.4 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहचेल अशी अपेक्षा आहे. लोकांच्यात इन्स्टंट फूड कॅटॅगरी इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे लोकांच्याकडे उपलब्ध होत असणारा पैसा तसेच नोकरी किंवा व्यवसाय करणार्‍या महिलांच्या संख्येतील वाढ. त्यामुळे लोकांच्याकडे आणि प्रामुख्याने महिलांच्याकडे स्वयंपाक बनवण्यासाठी खूप कमी वेळ उपलब्ध असतो. परिणामी आम्ही नेहमीच ग्राहकांच्या अपेक्षांचा विचार करुन नाविण्यपूर्ण इन्स्टंट मिक्स बनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चवदार आणि दर्जेदार प्रोडक्ट्स चाखण्यासाठी मिळत असतात.

मदर्स रेसिपीचा उपमा पॅक 73 ग्रॅमच्या कप आणि 170 ग्रॅमच्या पिलो पाऊच पॅकमध्ये लहानमोठ्या शहरांतील सर्व हायपर मार्केट्स, लोकल स्टोअर्स, एक्सलुसीव ब्रँड आउटलेट्स आणि मदर्स रेसिपी ई स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. कप उपमा पॅक 50 रुपये तर पिलो पाउच पॅक 35 रुपयांच्या किंमतीस उपलब्ध आहे. इन्स्टंट मिक्स उपमा 9 महिन्यांच्या अवधीपर्यंत वापरण्यास योग्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *