मदर्स रेसिपीने स्पाउट पॅकमध्ये शेजवान चटणी लाँच केली

Marathi

अन्नप्रेमी आणि नव्या पिढीतील वाढत्या लोकप्रियतेमुळे ही बहुमुखी शेजवान चटणी भारतातील स्वयंपाकघरांतील एक भाग बनली आहे. चटणीमुळे विविध पदार्थांमध्ये चव वाढत नाही तर घरातील आचाऱ्यांना फ्युजन फ्लेवर्सचा प्रयोगही करता येतो. मदर्स रेसिपीने नुकतीच आपली देशी शेजवान चटणीचे 200 ग्रॅम स्पाउट पॅक 55 रुपयांमध्ये लाँच केले आहे. 

ही चटणी मिरची, आले, लसूण आणि कांद्याने बनवलेल्या मसाल्यांचे परिपूर्ण मिश्रण आहे, जे तुमच्या रसनेंद्रियाला परिपूर्ण आनंद देते. निसर्गाशी जुळवून घेण्यायोग्य, ही समोसा, सँडविच, फ्रँकी आणि अगदी मोमोजमध्येही उत्तम प्रकारे वापरले जाऊ शकते. अद्यापही बाहेर जेवण करणे सुरक्षित नाही, सध्या कोविडच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे, या चटणीने घरी विविध फ्यूजन डिशचा प्रयोग करण्याची एक उत्तम संधी दिली आहे. चटणी 10 रुपयाच्या च्या ट्रॅव्हल पॅकमध्येही मिळते. चवदार जेवणासाठी हि चटणी नूडल्स किंवा भातामध्ये एकत्र करून खाऊ शकतात.

लाँचबद्दल बोलताना मदर्स रेसिपीच्या कार्यकारी संचालिका संजना देसाई म्हणाल्या, “देशी शेजवान चटणी सर्वांच्या सोयीसाठी तसेच प्रत्येकाला ती सुलभतेने वापरता यावी यासाठी आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या खाद्यपदार्थामध्ये प्रयोग करण्याची संधी मिळावी यासाठी सादर करण्यात आली आहे. आमच्या शेजवान चटणीमध्ये कोणताही एमएसजी किंवा कृत्रिम रंग वापरले नाहीत, कारण कुटुंबातील प्रत्येकासाठी हे आरोग्यदायी असावे आणि सर्वांनी एकत्र याचा आस्वाद घ्यावा अशी आमची इच्छा आहे.”

मुंबई, पुणे, बेंगळुरू, दिल्ली एनसीआर, अहमदाबाद, वडोदरा, सूरत, कोलकाता, चेन्नई, चंदीगड, लुधियाना, जालंधर आणि हैदराबाद शहरांमध्ये हे उत्पादन आधीपासूनच उपलब्ध आहे आणि लवकरच अन्य शहरांमध्ये ते बाजारात आणले जात आहे.

ऑनलाईन खरेदी करण्यासाठी सर्व उत्पादने उपलब्ध आहेत www.mothersrecipe.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *