महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताणाचे व्यवस्थापन

Marathi

हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट, हार्टफुलनेस संस्थेचा शैक्षणिक विभाग, एमएससीईआरटी (महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हार्टफुलनेसपद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’ हा उपक्रम राबवत आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आगामी शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या काळात निर्माण होणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन करून त्यावर मात करण्यासाठी हा उपक्रम मदत करेल. विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ  एमएससीईआरटीच्या यूट्यूब चॅनेलवर मराठीतील ऑनलाईन सत्रांद्वारे, विनामूल्य घेता येईल. महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी या उपक्रमाचे समर्थन करत विद्यार्थ्यांना त्यात भाग घेऊन लाभ मिळवण्यास प्रोत्साहित केले आहे पहिल्या तीन दिवसांची सत्रे येथे उपलब्ध आहेत – https://youtube.com/playlist?list=PLXxD-QVsyIjaHHp-gsxEVo_4oYO6tYI4N

‘हार्टफुलनेसव पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’ हा अत्यंत आवश्यक असा कार्यक्रम असून तो आगामी बोर्डाच्या परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना ध्यानाच्या माध्यमातून परीक्षेच्या तणावावर मात करून उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम बनवेल.  ‘हार्टफुलनेस पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’ ही पाच दिवसांची ऑनलाइन सत्रांची मालिका असून त्यात हार्टफुलने सध्या न तसेच तणावाचे व्यवस्थापन आणि त्यावर मात करण्याची तंत्रे शिकवली जातात.

महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड या कार्यक्रमाविषयी बोलताना म्हणाल्या, “राज्यातील इ. 10 वी व इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे तर्फे आत्मविश्वास वाढविण्यासाठी व परीक्षेचा ताणतणाव कसा हाताळावा यासाठी विशेष सत्रांचे आयोजन दि. 29 ते 31 मार्च 2021 च्या दरम्यान https://bit.ly/3w5kOu6 या YouTube चॅनलवर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.” 

दरवर्षी परीक्षा हा विद्यार्थ्यांसाठी तणावाचा काळ असतो, कारण त्यामध्ये यशस्वी  होण्याचा प्रचंड दबाव त्यांच्यावरअसतो. विद्यार्थ्यांना या काळामध्ये मित्रांचा अतिरिक्त दबाव आणि परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती या दोन्हीला तोंड द्यावे लागते.

तज्ञांच्यामते या परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थी अतिशय चिंतेत असतात आणि काही जणांना नैराश्य देखील  येते. “हार्टफुलनेस पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’’  हे एक,  विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावाच्या दबावाला सामोरे जाण्यासाठी मदत करणारे आणि लहान वयातच ध्यानाची सवय बिंबवणारे साधन आहे.

या उपक्रमाबाबत मत प्रदर्शन करताना ‘स्कूल कनेक्ट इनिशिएटिव्ह ऑफ हार्टफुलनेसचे’  संचालक श्री भारत माधवन म्हणाले,  “समाज म्हणून आपल्यासाठी आपले युवक सामना करत असलेल्या समस्या समजून घेणे आणि जीवनातील त्या आव्हानांना सामोरेजाण्यासाठी त्यांना साधनसामग्री पुरवणे महत्त्वाचे आहे. परीक्षेचा काळ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी तणावाचा असतो. या उपक्रमाद्वारे आपण विद्यार्थ्यांना या परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी भावनिक व मानसिक लवचिकतेची उभारणी करण्याचे ध्येय ठेवले आहे. “हार्टफुलनेस पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’’ याची सर्वसाधारण रचना शैक्षणिक वर्षातील या महत्त्वाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी काळजी पूर्वकपणे करण्यात आली आहे.”

या एक तासाच्या सत्रामध्ये हार्टफुलने सध्यान तंत्रे आणि तणावाचे व्यवस्थापन, धाडसी बनणे, लवचिक बनणे, वेळेचे व्यवस्थापन आणि जीवनामध्ये शिस्त अंगी बाणवणे या विषयांवरील चर्चेचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन  हे विषय हार्टफुलनेस मंडळाने विचारपूर्वक बनवलेले आहेत. या उपक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी तणावा मुक्तआणि एकाग्र मनाचा अनुभव घेतील, ज्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि शिकण्याचा हृदयकेंद्रित दृष्टिकोन तयार होईल. या सत्रांमध्ये  सहभागी मुले हार्टफुल संवाद आणि लक्षपूर्वक ऐकण्याची क्षमता, विराम घेऊन प्रतिसाद देणे देखिल शिकतील. या पैलूंचा त्यांच्या दैनंदिन जीवनात अंगीकार केल्याने त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळावी अशा रीतीने हे विषय तयार केले आहेत. हे सत्र अनेक वेळा वापरता येईल, आणि विद्यार्थी या उपक्रमातील शिकवण आयुष्यभरासाठीची शिकवण  म्हणून आत्मसात करू शकतील.

महाराष्ट्रातील हार्टफुलनेस मंडळ एमएससीईआरटीसीसोबत घनिष्ठपणे व कायमस्वरूपी जोडले जाण्याची आशा करीत आहे आणि शिक्षकांना व पालकांना सहाय्यभूत होईल असे कार्यक्रम तयार करण्याची योजना आखत आहे. “हार्टफुलनेस पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’’ हा उपक्रम, हार्टफुलनेस  एज्युकेशन ट्रस्ट यांच्या एचईएलपी (हार्टफुलनेस एक्सपिरीयन्स लाईफ पोटेन्शियल) या कार्यक्रमा अंतर्गत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना  हे आर्ट्सअँप या हार्टफुलनेसच्या मोफत ॲपद्वारे जगभरातील 14000 हार्टफुलनेस प्रशिक्षकांशी जोडले जाता यावेयाचीदेखील तरतूद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *