कार्यालयीन ठिकाणी संभाषण आणि सामुहिक कार्ये सुरळीत व्हावीत, तसेच ज्या कर्मचाऱ्यांना स्थानिक भाषांमध्ये काम करण्याची इच्छा आहे; त्यांच्याकरिता मायक्रोसॉफ्टने त्याच्या टीमवर्ककरिता असलेल्या हबमध्ये म्हणजे टीम्समध्ये आठ भारतीय भाषांचे साह्य उपलब्ध करून दिले आहे. डेस्कटॉप आणि वेब वर टीम्समध्ये हिंदीला बळकट साह्य उपलब्ध करून दिले आहे, तर अॅप्लिकेशनच्या मोबाईल आवृत्तीत 8 भारतीय भाषा म्हणजे हिंदी, बंगाली, तेलुगु, तामिळ, मराठी, गुजराती, कन्नड आणि मल्याळमचा समावेश आहे.
भारतात प्रोजेक्ट भाषा’ची सुरुवात झाली, तेव्हापासून 1998 पासून मायक्रोसॉफ्ट भारतीय भाषांमध्ये तंत्रज्ञान विकासाकरिता आघाडीवर आहे. त्याचे भारतीय भाषांसाठीचे साह्य उत्पादकतेच्या पलीकडे गेले असून आता आर्टीफिशल इंटेलिजन्सद्वारे वाढविण्यात येतो आहे. कंप्युटींगची शक्ती सर्वांसाठी उपलब्ध असावी म्हणून कंपनीसाठी भागीदारी हे आणखी एक असे महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि त्यामुळे त्याला भाषा-स्नेही करायचे आहे.
मोबाईल उपकरणांवर आठ भारतीय भाषांसाठी टीम्स’चे साह्य विस्तारण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे उद्दिष्ट पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणावरील वापरकर्त्यांना लाभ मिळवून देण्याचे आहे. नवीन विकासकार्ये टीमवर्क हबकरिता आणखी बळकटी मिळवून देईल, ज्यामुळे लोक एकत्रित येतील व सहभागिता आणि सर्वसमावेशकतेच्या संस्कृतीचे जतन होईल.
मायक्रोसॉफ्ट टीम्स वापरून संघटना वेगवेगळी अॅप दूर सारून एकच, संरक्षित हब स्वीकारून प्रक्रिया; जसे की चॅट, बैठका, कॉलिंग आणि कंटेट शेअरिंग सारखी कामे करू शकतील. टीम्समध्ये ऑफिस 365 अॅप्सना स्थानिक एकात्मीकरणाची असून वापरकर्ते त्यांचा अनुभव थर्ड पार्टी अॅप्स, प्रक्रिया आणि उपकरणांसह कस्टमाईज करून, वृद्धिंगत करू शकतील.
डेस्कटॉप आणि वेबवरील टीम्स
डेस्कटॉपवर सक्रीय असलेल्या सर्व भारतीय भाषांसाठी टीम्सद्वारे सुलभ टेक्स्ट इनपुट सपोर्ट उपलब्ध करून दिला जाईल तसेच वापरकर्त्याना आपली मते मांडण्यासाठी शब्द पुरेसे पडत नसल्यास ते स्वत:च्या भाषेतील स्टिकरचा अवलंब करू शकतात. अशाप्रकारच्या पद्धतींमध्ये स्थानिक हिंदी भाषांतराचे साह्य देखील असणार आहे. मात्र वापरकर्त्याला वैयक्तिक सर्जनशीलतेचा वापर करून संदेश संपादित (एडीट) करण्याचे स्वातंत्र्य राहील. ‘दे ताली’ स्टिकरचा सध्या सोशल मीडिया पिढीत फार बोलबाला असून त्यामुळे संभाषण अनौपचारिक आणि रोचक बनते.
भारतीय भाषांच्या वापरकर्त्यांसाठी सर्वसाधारण उपयोगाच्या दृष्टीने टीम्सचा स्थानिक हिंदी इंटरफेस समजायला अतिशय उपयोगी आणि सुलभ असेल. मायक्रोसॉफ्टच्या स्थानिक पद्धतीत त्यांच्या अधिक संस्कृत-आधारित प्रकारच्या तुलनेत साध्या आणि लोकप्रिय हिंदी शब्दांचा वापर करण्यात आला आहे.
एआय-युक्त वैशिष्ट्यात, मायक्रोसॉफ्टने निश्चित वेळेत टीम्स चॅटला समांतर भाषांतराची सोय उपलब्ध करून दिली आहे, ज्यामध्ये समाविष्ट करण्यात मजकूर हिंदी किंवा इंग्रजी समवेत इतर वैश्विक भाषांमध्ये भाषांतरीत केला जातो. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे हिंदी साह्याकरिता ‘इमर्सीव्ह रिडर’, अॅप्लिकेशनचे लोकप्रिय एक्सेसेबिलीटी वैशिष्ट्य. त्याशिवाय, टीम्स हिंदी भाषेत प्राप्त संदेशाचे वाचन करतो.
मोबाईल उपकरणांवर टीम्स
वापरकर्ते आयओएस आणि अँड्रॉईडवर युजर इंटरफेस बदलू शकतात, त्यासाठी त्यांना त्यांच्या आयओएसवरील ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऑपरेटिंग सिस्टीम डिफॉल्ट लँग्वेजमध्ये बदल करावा लागेल. यामुळे तुम्हाला लोकलाईज्ड युआय उपलब्ध भाषांचा वापर करून आठ भारतीय भाषा म्हणजे हिंदी, बंगाली, तेलुगु, तामिळ, मराठी, गुजराती, कन्नड आणि मल्याळमपैकी एकीची निवड करता येईल. मोबाईल उपकरणांवर टीम्सची डिस्प्ले भाषा आयओएस आणि अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम्सच्या डिफॉल्ट लँग्वेजवर आधारलेली असते. परंतु, टेक्स्ट इनपुट या भाषांपुरती मर्यादित नाही, कारण वापरकर्ते त्याच्या / तिच्या पसंतीच्या, ओएस-साह्य करत असलेल्या भाषेत टाईप करू शकतात.