आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा बुधवार दि. ११ डिसेंबर ते रविवार दि. १५ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार आहे. महोत्सवाचे हे ६७ वे वर्ष आहे. यावर्षी देखील महोत्सव पाच दिवस होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे.