यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाला आईस्क्रीम मोदक

Marathi

पुणे,ऑगस्ट,२०१९: उकडीचे मोदक हे शब्द ऐकल्यावर आपल्यासमोर पांढऱ्या किंवा ऑफ-व्हाईट रंगाच्या पारीमध्ये भरलेले नारळ आणि गुळाचे सारण आपल्याडोळ्यापुढे येते.  

यंदाच्या गणेश चतुर्थीला काहीतरी वेगळे करण्यासाठी मुंबईतल्या आईस्टसी प्रोजेक्ट्स या आगळ्यावेगळ्या आईस्क्रीम उत्पादक कंपनीने मोदक आईस्क्रीमचे नवे व्हर्जनआता सादर केले आहे. नारळ असलेले हे नवे आईस्क्रीम भारतीय डेझर्टसमध्ये दीर्घकाळानंतर बनवण्यात आलेले एक कल्पक उत्पादन आहे. 

या उत्पादनाची चव व आकार पारंपरिक मोदकांशी जुळतो. इतकेच नव्हे तर, मोदकाऐवजी हे उत्पादनही भक्त वापरू शकतील, याची काळजी आईस्टसीने घेतली आहे. काजु फ्लेव्हर आणि तोंडात गेल्याबरोबर विरघळणारा गूळ यामुळे याचा प्रत्येक घास आपल्याला मोदकांचा आनंद देणारा ठरणार आहे. पारंपरिक पद्धतीप्रमाणे, मोदकाचेटोक तोडून त्यात तुपाची धार सोडून मग तो खाल्ला जातो. त्याचप्रमाणे, या आईस्क्रीमवर गुळाचा सॉस ओतण्यात येतो. 

आईस्टसी प्रोजेक्ट्सचे सीईओ व सह-संस्थापक पराग चाफेकर म्हणाले, ”आम्ही नवनिर्मितीची आस धरतो आणि परफेक्शनसाठी कायम प्रयत्नशील असतो. आईस्क्रीमउद्योगक्षेत्रातील ही नवी संधी आम्ही ओळखली असून काहीतरी खास बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तीन वर्षांच्या संशोधन व विकास मोहिमेतून आम्ही ही निर्मितीकेली असून नवनवीन फ्लेव्हर्स ग्राहकांना दर महिन्याला देण्याचा आमचा प्रयत्न आहे.” 

अत्यंत कल्पक अशा सर्व्हिंस स्टाईलमध्ये पुण्यातील एरंडवणे भागातील हॉटेल समुद्र दलनात आईस्टसी मोदक आईस्क्रीम उपलब्ध आहे

मोदक आईस्क्रीमच्या लज्जतीचा केवळ १२० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आपल्याला आस्वाद घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *