रुबाबदार रेनो काइगर’चे भारतात पदार्पण

Marathi

बऱ्याच काळापासून ग्रुप रेनोकडून त्यांच्या बहुप्रतीक्षित रेनो काइगरने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. रेनोने ही उत्सुकता आणखी ताणत त्यांच्या रेनो काइगरचे ग्लोबल प्रीमिअर आज भारतात केले. या नवीकोऱ्या आटोपशीर एसयुव्हीचे डिझाईन आणि निर्मिती भारतातच करण्यात आली असून तिचे आंतरराष्ट्रीय अनावरण करण्यापूर्वी रेनोकडून क्रांतिकारी उत्पादनांच्या फळीत नवीन रेनो काइगर भारतात लॉन्च केली. डस्टर, क्विड आणि ट्रायबरप्रमाणे रेनो काइगर देखील या सेगमेंटमधील गतिमानतेची व्याख्या बदलणार आहे. रेनोकडून आणखी एक गेमचेंजरचे वचन राखण्यात काइगर नक्कीच यशस्वी होईल.

रेनो काइगरने अगोदरच स्वत:चे रुबाबदार अस्तित्व प्रस्थापित केले. हिचे व्यक्तिमत्व अतिशय बळकट आहे, याचे श्रेय हिच्या आकर्षक डिझाईनला जाते. रेनो काइगरचे डिझाईन स्पोर्टी आणि पिळदार घटकाने तयार केले असल्याने खऱ्या अर्थाने एसयुव्हीमध्ये आपले वेगळेपण राखते. रेनो काइगरच्या अंतर्गत भागात स्मार्ट केबिन देण्यात आले, यामध्ये तंत्रज्ञान, कार्यशीलता आणि प्रशस्त जागेचा संगम दिसतो. रेनो काइगरला नवीन टर्बोचार्ज 1.0 लिटर पेट्रोल इंजिनची शक्ती प्राप्त आहे. जे उच्चतम कामगिरी आणि ड्रायव्हिंग सुख मिळवून देईल. यातील इंजिनची अस्सलता आणि टिकाऊपणाची कसोटी घेण्यात आली आहे. हे उत्पादन ताज्या दमाच्या तंत्रज्ञानाने युक्त असून त्याची झलक रेनोच्या अगोदरच्या ग्लोबल रेंजमध्ये वारंवार दिसली. हे उच्चतम कामगिरी, आधुनिकता आणि कार्यक्षम इंजिन स्पोर्टी ड्राईव्हची खातरजमा करेल. यामध्ये मल्टी सेन्स ड्राईव्ह मोड्सचा समावेश असून ग्राहकांच्या ड्रायव्हिंग प्राधान्यांना साजेशी लवचिकता प्रदान करतात.

सेल्स आणि ऑपरेशन्स रेनो ब्रँडचे एसव्हीपी फब्रीस कँबोलीव्ह म्हणाले, “डस्टर, क्वीड आणि ट्रायबरनंतर आम्ही आता भारतीय बाजारासाठी सुयोग्य अशी रेनो काइगर ही आधुनिक एसयुव्ही बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहोत.  आमची नाविन्यपूर्ण कार्समधील सर्जनशीलता आणि ग्राहकांच्या गरजांचे सखोल ज्ञान अशा रेनोकडील सर्वोत्तम गोष्टींचा मेळ घालून काइगरची निर्मिती करण्यात आली आहे.  रेनो ही खरोखरच गेम चेंजर असल्याचा हा एक ठोस पुरावाच आहे.”     

ग्रुप रेनोचे हेड ऑफ डिझाईन ईव्हीपी लॉरेन्स वान देन अॅकर म्हणाले, “शो-कारचे वचन दिल्याप्रमाणे रेनो काइगर ही खरोखरच मजबूत, गतिशील आणि आरामदायी एसयुव्ही आहे.  शहरी गडबड-गोंधळात प्रवास करण्यासाठी सुसज असणाऱ्या या रेनो काइगरची रचना आम्ही लांबच्या प्रवासाच्या आणि कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांतून वाट काढण्याच्या दृष्टीनेच केली आहे.  काइगर ही स्वत:चे वेगळेपण दाखवणारी एसयुव्ही आहे आणि तिच्या लांबलचक व्हीलबेसमुळे आतमध्ये मोकळी प्रशस्त जागा मिळते.  या एसयुव्हीच्या ‘स्मार्ट केबिन’ची रचना आरामदायी आणि शेअरिंगला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने करण्यात आली आहे.”   

रेनो काइगर ही भारताच्या डिझाईन, अभियांत्रिकी आणि निर्मिती क्षमतांचे प्रदर्शन करतानाच ‘मेक इन इंडिया’ मोहिमेबाबतच्या रेनोच्या ठोस वचनबद्धतेला अधोरेखित करेल.  रेनो समुहाने भारतात नेहमीच प्रथा मोडण्यावर आणि नाविन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्यातून आपल्या उत्पादनांचा दर्जा विस्तृतपणे सिद्ध केला आहे.  संपूर्ण नव्या रेनो काइगरच्या बाजारात येण्याने रेनो  पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवून देईल. 

रेनो काइगर आणि भारतीय बाजाराच्या महत्त्वाबाबत आपले मत व्यक्त करताना रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममिल्लापल्ले म्हणाले, “रेनोने भारतातील आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे आणि मॅक्रो-इकोनॉमिक वातावरणाला आव्हान  देऊन उद्योगाचा ट्रेंड सुधारला आहे.  आमच्या ठोस व्यवसाय धोरणाच्या माध्यमातून आम्ही हे साधले आहे आणि यात आकर्षक उत्पादन श्रेणी, दर्जेदार तसेच गुणवत्तापूर्ण आणि ग्राहक केंद्रित उत्पादन तसेच आमचे देशभरात पसरलेले नेटवर्क यांचा मोलाचा वाटा आहे.  आमच्या संपूर्णपणे नव्या असलेल्या रेनो काइगरच्या माध्यमातून आम्ही आज आणखी एक पाऊल उचलले आहे.  ही एक उत्कंठावर्धक स्पोर्टी, सुपर स्मार्ट आणि आकर्षक अशी बी-एसयुव्ही आहे.  केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील जास्त लोकांना एसयुव्हीचा पर्याय खुला करून देणाऱ्या डस्टरप्रमाणेच रेनो काइगर एसयुव्ही ही देखील पुन्हा एकदा अगदी नव्या ग्राहकांना भुरळ घालेल.  या नव्या गेम-चेंजरमुळे आमचा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास आम्हाला आहे.” 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *