रेनॉ इंडियाने भारतभरात गेल्या दोन महिन्यांमध्ये 34 नव्या सेल्स अॅण्ड सर्विस टचपॉईंट्सची घोषणा केली आहे. त्यामुळे वर्षभराहून कमी कालावधीत रेनॉने भारतभरात सुरू केलेल्या नव्या सेल्स अॅण्ड सर्विस टचपॉईंट्सची संख्या 90 च्या पुढे गेली आहे. संपर्कजाळ्यातील ही दमदार वाढ म्हणजे सध्याच्या आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये ब्रँड वृद्धिंगत करण्याच्या धोरणातील व्यावसायिक दृष्टिकोनाचा एक भाग आहे.
रेनॉ इंडियाच्या या वृद्धीमुळे त्यांचे संपर्क जाळे 415 हून अधिक विक्री केंद्रे आणि 475 हून अधिक सर्विस टचपॉईंट्स असे वाढले आहे. यात विक्री आणि सेवेचा उत्कृष्ट दर्जा राखणाऱ्या देशभरातील 200 हून अधिक वर्कशॉप्स ऑन व्हील्सचाही समावेश आहे.
“रेनॉ इंडियाचे अस्तित्व धोरणात्मकरित्या व्यापक केले जात आहे. आमचे ग्राहक आणि डीलर पार्टनर अशा दोहोंकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनपर प्रतिसादाचे हे प्रतिक आहे. सध्या आम्ही नव्या वितरकांना आकर्षित करत आहोतच शिवाय आधीपासून असलेल्या भागीदारांकडून अधिक गुंतवणूक आणि व्यवसायवृद्धीच्या विनंत्याही आमच्याकडे येत आहे. विस्तारणाऱ्या संपर्क जाळ्यामुळे आम्हाला देशभरातील अधिकाधिक ग्राहकांना सेवा देणे शक्य होते आणि त्यामुळे आमच्या सातत्यपूर्ण विक्रीमध्ये महत्त्वाची भर पडते,” असे रेनॉ इंडियाच्या सेल्स अण्ड नेटवर्कचे प्रमुख सुधीर मल्होत्रा म्हणाले.
रेनॉ इंडियाने सर्व उत्पादनांमध्ये आकर्षक सवलतींची घोषणा केली आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर्स आणि शिक्षकांसह केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी यांच्यासाठी खास अतिरिक्त सवलतीही देण्यात येत आहेत. या सवलतींमध्ये 22000 रुपयांपर्यंत खास अतिरिक्त सवलतीचा समावेश आहे. यामुळे, डस्टरवर 70000 रु., क्विडवर 40000 रु. आणि ट्रायबर 30000 रु. अशा विविध उत्पादनांवर असलेल्या आकर्षक सणासुदीच्या सवलतींमध्ये भर पडणार आहे. रेनॉ इंडियाने संरक्षण (सीएसडी) आणि पोलिस (सीपीसी) कर्मचाऱ्यांसाठीही देशभरातील संबंधित कँटिन स्टोअर्सच्या माध्यमातून अनेक उत्पादनांवर सवलती देऊ केल्या आहेत.
खरेदी अधिक सोपी व्हावी यासाठी रेनॉने आकर्षक वित्तीय पर्यायही देऊ केले आहेत. क्विड आणि ट्रायबर 3.99 टक्के असा खास व्याजदर यात समाविष्ट आहे. नव्याने सादर झालेल्या डस्टर 1.3 लि. टर्बोवर 20000 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट जाहीर केला आहे तसेच तीन वर्षे किंवा 50000 किमी. यावर ईझी केअर पॅकेजही मिळेल.
उत्पादनांच्या बाबतीत, रेनॉ इंडियाने नुकतीच 2020 क्विड नीओटेक एडिशन सादर केली. या लिमिटेड एडिशन गाडीत ताज्या दमाची बाहेरील दुहेरी रंगसंगती आणि या वर्गातील अनेक वैशिष्ट्ये पहिल्यांदाच उपलब्ध झाली आहेत. ग्राहकांना दोन रंगसंगीतांचा पर्याय आहे – झन्सकार ब्ल्यू बॉडी सोबत सिल्व्हर छत आणि सिल्व्हर बॉडी सोबत झन्स्कार ब्ल्यू छत. फक्त 30000 रु. अधिक देत क्विड नीओटेक ग्राहकांना देते अधिक मूल्याचे पॅकेज आणि अनेकविध वैशिष्ट्यांसह ग्राहकांना अनेक लाभही मिळतात.