रेनॉ कायगर देऊ करत आहे 20.5 Km/L हे विभागातील सर्वोत्तम मायलेज

Marathi

 रेनॉ या भारतातील ऑपरेशन्सच्या 10व्या वर्षात पदार्पण केलेल्या कंपनीने, आज आपल्या नवीन सब-फोर मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायगरने साध्य केलेल्या, एका यशाची घोषणा केली. जागतिक दर्जाच्या टर्बोचार्ज्ड 1.0 L पेट्रोल इंजिनाची शक्ती लाभलेली कायगर केवळ अधिक उच्च कामगिरी किंवा दणकट ड्रायव्हिंगचा अनुभवच देत नाही, तर ती 20.5 Km/L अशी, तिच्या विभागातील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता, देणारी SUV आहे. एआरएआयच्या टेस्टिंग सर्टिफिकेशनद्वारे हे स्पष्ट झाले आहे. 

रेनॉ कायगरमध्ये थ्री-सिलिंडर टर्बोचार्ज्ड 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनची ऊर्जा निष्पत्ती 100 Ps व टॉर्क 160 Nm (फाइव्ह स्पीड मॅन्युअल: 2800-3600 RPMमध्ये उपलब्ध) आहे. इंजिनची खात्रीशीरता व टिकाऊपणा या दोहोंसाठी चाचणी झालेली आहे आणि युरोपमध्ये क्लिओ व कॅप्चुर गाड्यांसाठी यापूर्वीच वापरण्यात आलेले नवीनतम तंत्रज्ञान नवोन्मेष या इंजिनमध्येही आहेत.

रेनॉ कायगर 1.0 एल एनर्जी व 1.0 एल टर्बो अशा इंजिनांच्या दोन पर्यायांमध्ये, 5.64 लाख रुपये एवढ्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. यामध्ये AMT व CVT अशी टू पेडल ऑफरिंग्ज आहेत. याला पूरक अशा मल्टि-सेन्स ड्राइव्ह मोड्सचा अंतर्भाव SUVमध्ये असल्याने इंधन कार्यक्षमता व कामगिरी यांच्यानुसार विविध प्रकारांत (इको, नॉर्मल व स्पोर्ट) ती उपलब्ध आहे. ग्राहक पाच उपलब्ध ट्रिममधून निवड करू शकतात- RXE, RXL, RXT, RXT (O) आणि RXZ. प्रत्येक व्हर्जन हे ग्राहकाच्या त्या विभागातील गरजा व मागण्या लक्षात घेऊन घडवण्यात आले आहे आणि सर्व ट्रिम्समध्ये आकर्षक किमती ठेवण्यात आल्या आहेत. ग्राहकांना प्रत्येक स्तरावर मौल्यवान लाभ मिळत आहे आणि वरील व्हराएंट्समध्ये शैलीदार ड्युअल टोनचा पर्यायही उपलब्ध आहे.

वैशिष्ट्यपूर्ण कुपे SUV रचना, उत्तम जागा/उपयुक्तता, स्मार्ट फीचर्स आणि जागतिक दर्जाचे दणकट इंजिन यांमुळे रेनॉ कायगर हे भारतातील वाहन बाजारपेठेच्या गाभ्याला लक्ष्य करणारे ब्रेकथ्रू उत्पादन झाले आहे. भारतातील एक दणकट, स्मार्ट आणि विस्मयकारक B-SUV म्हणून स्वत:ला प्रस्थापित केल्यानंतर, रेनॉ कायगरचे अस्तित्व जागतिक बाजारपेठेतही जाणवू लागले आहे. रेनॉने यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेत कायगरची निर्यात सुरू केली आहे आणि लवकरच अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. यांमध्ये इंडोनेशिया व आफ्रिकेच्या अन्य काही भागांचाही समावेश आहे.

आपल्या 10 वर्षपूर्तीच्या साजरीकरणाचा एक भाग म्हणून, रेनॉने कायगरचे नवीन RXT (O) हे नवीन व्हराएंट बाजारात आणले आहे. त्याचबरोबर पूर्वीपासूनच्या तसेच संभाव्य ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना व प्रमोशन्स जाहीर केली आहेत. रेनॉने ग्राहकांसाठी विशेष ऑफर्सची घोषणा केली आहे, त्यात सर्व उत्पादनश्रेणींमधील निवडक व्हराएंट्सवर किमाल 130,000 हजार रुपयांपर्यंतचे लाभ पुरवण्याचा समावेश आहे. या काळात नवीन रेनॉ वाहन खरेदी करताना या ऑफर्स उपलब्ध करून घेतल्या जाऊ शकतात. वरील ऑफर्सशिवाय, कंपनीने 10 अनन्यसाधारण लॉयल्टी रिवॉर्ड्स ही दशकपूर्ती साजरी करण्यासाठी जाहीर केली आहेत. यामध्ये नियमित ग्राहक ऑफर्सखेरीज कमाल 110,000 रुपयांपर्यंतच्या लॉयल्टी लाभांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *