या सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली एसयुव्ही
रेनो इंडियाच्या वतीने 1.3L टर्बो पेट्रोल इंजिन लॉन्चची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे भारतातील सर्वात यशस्वी एसयुव्ही सर्वशक्तिमान ठरेल. 1.3L टर्बो पेट्रोल इंजिनयुक्त नवीकोरी डस्टर तीन वेरीयंटमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यात 6 स्पीड मॅन्युअल ऑप्शनची शुभारंभाची किंमत रुपये 10.49 lakhs असून, एक्स-ट्रोनिक सीव्हीटीची प्रारंभिक किंमत 12.99 lakhs असून त्यात दोन प्रकार आहेत. रेनोच्या वतीने सध्याच्या 1.5L पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असेल तसेच रेनो डस्टरची श्रेणी किंमत 8.59 lakhs. आहे.
1.3L टर्बो पेट्रोल इंजिन हे प्रगत, सर्वोच्च शक्तीयुक्त, टर्बो चार्ज्ड, बीएसव्हीआय सुसज्जित इंजिन आहे. जे अनुक्रमे 156PS @ 5500 rpm आणि254 Nm @1600 rpm सर्वोत्तम शक्ती तसेच टोर्क प्रदान करते. आधुनिक इंजिन हे गॅसोलाईन डायरेक्ट इंजेक्शन (जीडीआय) सारख्या प्रगत तंत्रज्ञानाने युक्त आहे. जे सर्वोच्च कामगिरी आणि कार्यशीलता प्रदान करते. ड्यूएल वेरीएबल वॉल्व टायमिंग (व्हीव्हीटी) तसेच प्रगत थर्मो मॅनेजमेंट कार्यशीलता वाढवणारे आहे. त्यामुळे उत्सर्जन कमी होते. या सेगमेंटमध्ये एकत्रित कमाल शक्तीचा संचार आहे, डस्टरमध्ये सर्वोत्तम दर्जाची इंधन कार्यशीलता प्रदान केली जाते, ज्याद्वारे मानवी प्रक्षेपण (मॅन्युएल ट्रान्समिशन) 16.5 केएमपीएलचे राहते तसेच सीव्हीटी व्हर्जन 16.42केएमपीएलचे आहे.
“1.3L टर्बो पेट्रोल इंजिनयुक्त रेनो डस्टरच्या शुभारंभामुळे भारतातील डस्टरच्या प्रवासात नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे. जागतिक दर्जाचे इंजिन आणि शक्ती यामुळे Kadjar (कादजार) आणि (Arkana) अर्काना सारख्या वैश्विक एसयुव्ही तसेच क्रॉसओव्हर्स यशस्वी ठरल्या. सर्वात आक्रमक वाहन बाजारांत डस्टरने लक्षवेधी दर्जा गाठला आहे. इतक्या वर्षांत साहसी वाहनप्रेमी आणि अनेक भारतीय कुटुंबांनी एक सच्ची एसयुव्हीसोबत बळकट नाते विणले आहे. आक्रमक आणि अधिक शक्तिशाली डस्टरने नक्कीच लक्षावधी लोकांना प्रेरणा दिली असून साहसी प्रवास इच्छुकांची संख्या वाढते आहे. नवनवीन प्रदेश आणि क्षितिजे गाठत एसयुव्ही प्रकाराचा बादशाह असलेले हे नाव ग्राहकांना ड्रायव्हिंगचा सहज अनुभव देते आहे,” असे उदगार रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामील्लापले यांनी काढले.
ग्राहकांसोबत असलेली नाळ भविष्यातही जोडलेली राहावी यादृष्टीने प्रयत्न करत रेनोच्या वतीने लॉयल्टी बेनिफिट स्कीमसोबत एएमसी पॅकेज हे सध्याच्या नवीन 1.3L डस्टरचा पर्याय स्वीकारणाऱ्या मालकांकरिता खास आणले आहे.
लोकप्रिय रेनो डस्टर ही अंतर्गत भागात टर्बो पेट्रोल इंजिनने सुसज्जित असून फ्रंट ग्रील, टेल गेट, रुफ रेल्स आणि फॉग लॅम्प कव्हरवरील क्रिमसन रेड एसेंटसह आक्रमक दिसते. हिच्या ट्राय-विंग्ड फूल क्रोम ग्रील, ड्यूएल टोन बॉडी कलर फ्रंट बंपरवरील शक्तिशाली स्किड प्लेट्स, सिग्नेचर प्रोजेक्टर हेडलॅम्पसोबत एलईडी डीआरएल दिमाखात अधिकच भर पडतात. त्यामुळे रेनो डस्टरचे वर्चस्व आणि रुंद हूड अधिकच उठावदार दिसते. सर्वार्थाने नवीन आर 17 फ्रोझा डायमंड कट अलॉय व्हील डस्टरचा रुबाब वाढवतात.
डस्टरच्या वतीने 205 एमएम हाय ग्राउंड क्लिअरन्स उपलब्ध करून दिला जातो. नवीन डस्टर आता प्री-कुलिंग कार्यासह उपलब्ध झाली आहे. ज्यामुळे ग्राहक कारमध्ये शिरण्यापूर्वी की-फॉबच्या साह्याने इंजिन सुरू करून वातानुकूलित यंत्रणा कार्यन्वित करू शकतात. डस्टर 17.64 सेमी टचस्क्रीन मीडियानाव इवोल्यूशनसह येते. यामध्ये अॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो, व्हॉईस रेक्गनायजेशन आणि इकोगाईडची सुविधा आहे. इंधन कार्यक्षमता अधिक वाढविण्यासाठी तसेच उत्सर्जन तसेच वाहन खरेदी-मालकीचा खर्च कमी करण्यासाठी, रेनो डस्टरमध्ये स्मार्ट स्टार्ट/स्टॉप कार्याची सुविधा आहे. ज्यामुळे स्वयंचलित पद्धतीने इंजिन बंद करणे शक्य होते. चालकाच्या मागणीनुसार वाहन सुरू/बंद करता येतो.
रेनो डस्टरमध्ये भारतीय प्राधिकरणाकडून जारी नियमांनुसार फ्रंट, साईड तसेच पेडेस्ट्रीयन क्रॅशची सुविधा आहे. यामध्ये अँटीलॉक-ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस)सह इलेक्ट्रोनिक ब्रेक डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी), चालक-प्रवासी एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्टची सोय आहे. ही सर्व सुरक्षा वैशिष्ट्ये रेनो डस्टरच्या सर्व आवृत्त्यांमध्ये काटेकोरपणे पाळली जातात. एक एसयुव्ही म्हणून डस्टरची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी यामध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रोनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी) तसेच हिल-स्टार्ट असिस्टंटसारखी वैशिष्ट्ये आहेत.
रेनो डस्टरच्या वतीने 38 प्रकारच्या कल्पक असेसरीज (कारमधील निगडीत साहित्य) देण्यात येत असल्याने तिचे एक एसयुव्ही म्हणून असलेला रुबाब अधिक खुलतो.