रेनोतर्फे ग्राहकांचे स्वागत: कार्यालये आणि निवडक डिलरशीप तसेच सेवा केंद्रे खुली होणार

Marathi

रेनो हा भारताचा पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून त्यांनी आपली कार्यालये, निवडक डिलरशीप आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत. आपल्या टचपॉइंट्सवर ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी त्यांनी काही सुरक्षात्मक तसेच आरोग्यवर्धक उपाययोजना राबविण्याची तयारी केली. रेनोच्या वतीने 194 हून अधिक शोरूम आणि वर्कशॉप नवीन सुरक्षित प्रोटोकॉलसह सुरू करण्यात येत असून उर्वरीत टचपॉइंट्स टप्प्या-टप्प्याने स्थानिक प्राधिकरणांकडून मिळालेल्या परवानगीच्या आधारे सुरू करण्यात येणार आहेत. रेनोच्या डिलरशीपनी त्यांची सुविधाकेंद्रे आणि टेस्ट ड्राईव्ह करण्यात येणाऱ्या गाड्या योग्यरितीने निर्जंतुक करून विशेष काळजीची खातरजमा करण्यात येते आहे. रेनो’च्या कस्टमर-फर्स्ट इनिशीएटीव्ह आणि प्रयत्नांच्या अमलबजावणीच्या देखरेखीसाठी बहुविध प्रशिक्षण कार्यक्रम, प्रोटोकॉल आणि प्रक्रिया हा त्यांच्या ‘वेलकम बॅक’ इनिशिएटीव्हचा भाग आहे. 

जगभरात, रेनोचे देशांतर्गत व्यापारी कामकाज हळूहळू सुरू होऊ लागले आहे. भारतात, आम्ही टप्प्याटप्प्याने व्यापारी कामकाज सुरू केले. इथे आमची प्रदीर्घ वचनबद्धताअसून रेनो समूहाच्या धोरणात्मक कामकाजात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. ग्राहकांची सुरक्षा आणि समाधान हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट्य आणि सर्वांमागचे एक प्रेरक बळ आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठतो आहे आणि व्यवसाय हळूहळू सुरू होऊ लागले आहेत. तेव्हा आमचा प्राथमिक भर हा सर्व टचपॉइंटवर कठोर सुरक्षा आणि आरोग्यदायक सवयी ग्राहकांच्या सुरक्षेस्तव राबविण्याला प्राधान्य राहील. त्याचवेळी आरोग्य, सुरक्षा आणि रेनो कर्मचारी, विक्रेते तसेच इतर सहभागीदार घटक, त्यांचे कुटुंब आणि मोठ्या प्रमाणावर समुदाय सर्वात महत्त्वाचे ठरते. या सर्वच आघाड्यांवर आम्ही आवश्यक कृतींची अमलबजावणी करत आहोत,” असे रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामील्लापाले म्हणाले. 

पहिली पायरी म्हणजे सर्व विक्रेते – शोरूम आणि वर्कशॉप ग्राहकांसाठी खुला करण्याआधी पूर्ण निर्जंतुक केला जाईल. कर्मचारी वर्ग नोकरीवर रुजू होण्याआधी सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. रेनोच्या सर्वच शोरूम आणि वर्कशॉपमध्ये नियमितपणे देखरेख, आवश्यक ती कारवाई आणि प्रक्रिया अंगीकारण्यात येतील. सामाजिक अंतर राखले जाते आहे याविषयीची खातरजमा करण्यात येईल आणि सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. 

विक्रेते आणि ग्राहकांकडे डिस्प्ले आणि टेस्ट ड्राईव्हकरिता ठेवण्यात आलेल्या गाड्या दरवेळी ग्राहकांच्या संपर्कात आल्यानंतर अनेकदा निर्जंतुक करण्यात येतील. सर्वच गाडयांसाठी, अगदी सर्विसिंगकरिता येणाऱ्या गाडयांकरिता देखील तपशीलवार प्रक्रिया राबविण्यात येईल. जेणेकरून ग्राहकांच्या पूर्ण समाधानाची खातरजमा राहील.  

या अशा कठीण परिस्थितीत ग्राहकांना साह्य करण्याकरिता रेनोद्वारे ग्राहककेंद्री ऑफर्सची घोषणा केली आहे. रेनो’च्या वतीने ‘बाय नाऊ पे लेटर’ स्कीम जाहीर करण्यात आली असून त्याद्वारे ग्राहक मे महिन्यात कोणतीही गाडी विकत घेऊ शकतील. मात्र तिचे मासिक हफ्ते खरेदीच्या तीन महिन्यांनी सुरू होणार आहेत. ही ऑफर विक्रेत्यांकडे, रेनो इंडिया वेबसाईटवर किंवा माय रेनो अॅपवर उपलब्ध राहील. त्याशिवाय उत्पादन श्रेणीत कॅश ऑफर्स, एक्सचेंज बेनिफिट आणि 8.99% च्या खास दरावर अर्थसाह्य उपलब्ध आहे. याशिवाय सध्याच्या ग्राहकांसाठी अतिरिक्त लॉयल्टी ऑफर्स उपलब्ध आहेत. 

रेनोच्या वतीने ऑनलाईन बुकींग पर्याय आणि इतर मार्गांसमवेत डिजीटल क्षमता तसेच पोर्टफोलियोत लक्षणीय वाढ केली आहे. आता ग्राहक रेनो इंडिया वेबसाईट किंवा मायरेनो अॅपद्वारे शून्य बुकींग रक्कमेसह गाडीची नोंदणी करू शकतील. त्यांना रेनो फायनान्सकडून तातडीने कर्ज मंजुरी मिळणार आहे.  

आपल्या सेवा आघाडीवर रेनोच्या वतीने विस्तारीत सेवा वॉरंटी आणि फर्स्ट फ्री सर्विसला मुदतवाढ देण्यात आली आहे. यंदा लॉकडाउनच्या कालावधीत रेनो’ने ग्राहकांकरिता वॉरंटी आणि अवधी सेवा वेळापत्रकांवर शिथिलतेची (विस्तारीत वॉरंटी पॉलिसीसह) घोषणा केली आहे. रेनो इंडियाकडून 24X7 रोडसाईड असिस्टंस सुरू असून ग्राहकांना आपतकाळात मदतीची खातरजमा करण्यात येते आहे. 

रेनो फायनान्सकडून ग्राहकांना मदत करण्याच्या अनुषंगाने जॉब लॉस कव्हर आणि ईएमआय प्रोटेक्ट प्लानची घोषणा करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *