रेनोने गाठला आणखी एक माइलस्टोन, भारतात पार केला 4,00,000 वाहनविक्रीचा आकडा

Marathi

भारतात गेली 10 वर्षे असलेल्या रेनोतर्फे उत्तराखंडमधील डेहराडूनमधील 4,00,000 व्या ग्राहकाला नव्या कोऱ्या आकर्षक, नावीन्यपूर्ण आणि वाजवी दरातील रेनो क्विड या गेम चेंजर गाडीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यासह रेने क्विडने 4 लाख वाहनविक्रीचा मैलाचा दगड पार केला आह आणि भारतातील मिनि-कार सेगमेंटमध्ये उलथापालथ घडवून आणणारी ही प्रमुख गाडी ठरली आहे.

रेनो क्विड ही गाडी मॅन्युअल व एएमटी पर्यायांसह 0.1L आणि 1.0L SCe अशा दोन्ही प्रकारात आरएक्सई, आरएक्सएल आणि क्लाइंबर व्हेरिंटसह एकूण 9 ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. देशभरात रेनो ब्रँडच्या वाढीला चालना देण्यात या गाडीने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. रेनो क्विडचे एसयूव्ही-प्रेरित डिझाइन, या वर्गात प्रथमच देण्यात आलेली अँड्रॉइड ऑटो व अॅपल कार प्लेसह असलेली 20.32 सेमी टचस्क्रीन मीडियानॅव्ह क्रांती आणि फ्लोअर कन्सोलवर माउंट केलेला एटीएम डायल यामुळे ही गाडी चालवण्याचा अनुभव अप्रतिम असतो.

क्विडच्या यशासह उत्पादन नवकल्पानांच्या बाबतीत असलेला निर्धाराशी रेनो कायम प्रामाणिक राहून काम करते. सध्याच्या 10व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने रेनोतर्फे अलिकडेच KWID MY21 लाँच करण्यात आली. MY21 या गाडीत भारतात लागू असलेल्या सर्व सुरक्षा नियमनांचे पालन करण्यात आले आहे आणि सर्व व्हेरिअंट्समध्ये स्टँडर्ड फीचर म्हणून ड्युअल फ्रंड एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. कारच्या आकर्षकतेत भर घालत MY21 क्लाइंबर एडिशनमध्ये पांढऱ्या व काळ्याची सांगड घालत ड्युअल टोन एक्स्टिरिअर, इलेक्ट्रिक ओआरव्हीएम आणि डे अँड नाइट आयआरव्हीएम देण्यात आले आहेत. पुढील बाजूस ड्रायव्हरच्या बाजूला असलेले पायरोटेक व प्रिटेन्शनर यामुळे ही गाडी अधिक सुरक्षित होते.

रेनो क्विड ही गाडी जागतिक पातळीवरील दर्जाची व परफॉरमन्सची मानके लक्षात घेत भारतीय खरेदीदारांसाठी विकसित करण्यात आली आहे. भारतीय कौशल्य व नैपुण्य यांचा उपयोग करून घेऊन भारतासाठी व जगासाठी जागतिक पातळीवर सक्षम असलेली उत्पादने तयार करण्यासाठी प्रसार करणाऱ्या मेक इन इंडिया तत्वाशी हे सुसंगत आहे.

गेले दशकभर भारतात असलेल्या रेनोने भरपूर प्रगती केली आहे, ज्यात भारतात अत्याधुनिक कारखाना, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान केंद्र, लॉजिस्टिक्स व डिझाइन केंद्र उभारले आहे. भारतात व्हॉल्यूमला चालना देणाऱ्या आपल्या उत्पादन पोर्टफोलियो विस्तारीकरण धोरणासह रेनोतर्फे देशातील नेटवर्क मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येत नाही. सध्या, रेनोचे भारतात 500 हून अधिक विक्री व 530 टचपॉइंट्स आहेत. यात देशभरातील 250+ वर्कशॉप ऑन व्हील्स लोकेशन्सचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *