मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक अशा दोन्ही पर्यायांत नवीन ‘आरएक्सएल’ 1.0एल पर्याय दाखल
8 जुलै, 2020: रेनो इंडियाच्या वतीने त्यांचे प्रमुख उत्पादन क्विड ग्राहकांकरिता अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांचे नवीन आरएक्सएल वेरीयंटचा शुभारंभ बीएस6 सुसज्जित 1.0एल पॉवरट्रेनने युक्त असून एमटी आणि एएमटी आवृत्तीसह लॉन्च करण्यात आला. नवीन आरएक्सएल वेरीयंट हे अतिशय स्पर्धात्मक किंमतीत एमटीकरिता रु.4.16 लाख आणि एएमटी प्रकारासाठी रु. 4.48 लाखात उपलब्ध करून देण्यात येतील. क्विड एएमटी 1.0एलमध्ये सहजरित्या उपलब्ध बीएस6 टू-पेडल पर्याय बाजारात दाखल होणार आहे.
भारतात क्विडने 3.5 लाखांचा विक्री टप्पा पार केल्याची माहिती दिली आहे. रेनो क्विडने लोकलायजेशन लेव्हल 98% पर्यंत गाठली असून हा विचारप्रवाह ‘मेक इन इंडिया’ प्रोग्रामला समर्पक आहे.
“रेनो क्विडचे ग्लोबल लॉन्च भारतात झाले असून यातून या देशाची ग्रुप रेनो’च्या वृद्धी आकांक्षेतील महत्त्वपूर्ण भूमिकेचे दर्शन घडते. क्विड हा भारतातील आमच्या प्रगतीमधील महत्त्वाचा सहयोगी आहे. सुमारे 3.5 लाखांहून अधिक क्विड कुटुंबांसह आम्हाला ग्राहकांनी भरभरून दाखवलेल्या खंबीर विश्वासाचा वर्षाव रेनो ब्रँडवर झाला आहे. क्विडचे अद्वितीय उत्पादन हे डिझाईन, कल्पकता आणि आधुनिकतेने-युक्त असून लॉन्च प्रसंगी आमच्याकरिता गेम चेंजर ठरले आहे,” असे रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम ममील्लापल्ले सांगतात.
रेनोच्या वतीने ग्राहकांकरिता आकर्षक ऑफरची घोषणा देखील करण्यात आली. यामध्ये ‘बाय नाऊ पे लेटर’ स्कीम सामील आहे. या माध्यमातून ग्राहकांना रेनो कार विकत घेता येणार असून खरेदीच्या 3 महिन्यांनंतर ईएमआय भरता येतील. या ऑफरचा लाभ विक्रेत्याकडे घेता येईल, रेनो इंडिया वेबसाईटवर त्याचप्रमाणे माय रेनो अॅप’वर देखील घेता येणार आहे. या उत्पादन श्रेणीवर कॅश ऑफर, हस्तांतरण लाभ आणि वित्तीय साह्य 8.25% वर उपलब्ध राहील. सध्याच्या ग्राहकांसाठी अतिरिक्त लॉयल्टी लाभांची सुविधा आहे. हा फायदा डॉक्टर आणि पोलीस खात्याशी संबंधिताना उपलब्ध असेल. त्यांच्या ‘केअर फॉर केअरगिव्हर्स ’ प्रोग्राम अंतर्गत भारतात कोविड – 19 लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यावसायिकांचे आभार मानण्याचा हा प्रयत्न आहे.
रेनोच्या वतीने ऑनलाईन बुकिंग ऑप्शन आणि अन्य हस्तक्षेपांसोबत आपल्या डिजीटल क्षमतेत आणि पोर्टफोलियोमध्ये महत्त्वपूर्ण वृद्धी केली. आता ग्राहक वर्गाला स्वत:च्या घरातून रेनो इंडिया वेबसाईट तसेच मायरेनो अॅप’वर अत्यंत कमी रक्कम भरून नोंदणी करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे रेनो फायनान्सकडून दूरस्थ पद्धतीने कर्ज मंजुरी देखील मिळवता येईल.
“टाळेबंदी-पश्चात परिस्थितीत मागणीमध्ये बदल झालेला दिसून येतो. पूर्वी सार्वजनिक वाहतूक पर्यायाला असलेला कल हळूहळू मिनी कार प्रकारातील ग्राहक वर्गाकडे सरकलेला दिसतो. हा न्यू नॉर्मल निकषांचा परिणाम म्हणावा लागेल. या सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाच्या प्रवासाच्या दृष्टीने कार हा सुरक्षित वाहतूक पर्याय ठरतो. क्विडकडे बळकट ग्राहक पार्श्वभूमी असल्याने ते यशस्वी उत्पादन ठरते. त्यामुळेच ग्राहकवर्गाकडून याला खंबीर समर्थन लाभले आहे. परिणामी आम्ही आमची उत्पादने आणि वित्तीय ऑफर अधिकाधिक प्रमाणात नवीन कार इच्छुकांपर्यंत पोहोचवण्याकरिता प्रयत्नशील आहोत,” असे ममील्लापल्लेपुढे म्हणाले.
मिनी कार प्रकार हा सर्वाधिक कणखर आणि स्पर्धात्मक ठरत असताना रेनो क्विडने आपली पात्रता सिद्ध केल्याचे दिसून येते. ग्राहकांचे बदलते प्राधान्यक्रम समजून घेण्याकडे रेनोचा कल राहिला असून वर्षानुवर्षांचे संशोधन आणि सखोल दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले. ग्राहक-संशोधनाच्या आधारे रेनोकडून एसयुव्ही-प्रेरीत डिझाईन लँग्वेज, सेगमेंटमधील पहिले वैशिष्ट्य, उद्योगातील पहिली अभिनवता आणि उच्चतम स्थानिक पातळीवर कारची निर्मिती करण्यात आली.
भारतात शुभारंभ झाल्यानंतर वर्षभरातच रेनोकडून विविध जागतिक बाजारपेठांमध्ये मेक इन इंडिया क्विडच्या निर्यातीला सुरुवात झाली. रेनोकडून भारतातून ‘मेक इन इंडिया’ क्विडच्या 45,300 हून अधिक युनिटची निर्यात करण्यात आली.
NEWRENAULT KWID RANGE 2020 – PRICE LIST
RENAULT KWID BS-VI | PRICING (ex-showroom, New Delhi) |
STD 0.8L | INR 2,94,290 |
RXE 0.8L | INR 3,64,290 |
RXL 0.8L | INR 3,94,290 |
RXT0.8L | INR 4,24,290 |
RXL 1.0L | INR 4,16,290 |
RXL 1.0 L AMT | INR 4,48,290 |
RXT(O) MT 1.0L | INR 4,53,990 |
RXT(O)AMT1.0 L | INR 4,85,990 |
KWID Climber(O) MT 1.0 L | INR 4,75,190 |
KWID Climber AMT(O) 1.0 L | INR 5,07,190 |