रेनो काइगर आता INR 5.45 लाखांपासून उपलब्ध; आजपासून नोंदणी सुरू

Marathi

जबरदस्त नाविन्यपूर्णतेसाठी वचनबद्ध असलेल्या रेनोने आज त्यांच्या संपूर्ण नव्या स्वरूपातील काइगरची किंमत भारतीय मूल्यात INR 5.45 लाख (एक्स-शोरूम, भारतात सर्वत्र) रुपये असल्याचे जाहीर केले.  या अद्वितीय किंमतीमुळे, रेनो काइगर आता बी-एसयुव्ही विभागातील मूलभूत चैतन्य पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.  फ्रान्स आणि भारताच्या संयुक्त सहकार्याने रेनो काइगरची रचना करण्यात आली आहे.  जागतिक स्तरावर जाण्यापूर्वी, प्रथम भारतीय ग्राहकांसाठी भारतातच तिचा विकास आणि निर्मिती करण्यात आली आहे.     

भारतभरातील 500 हून अधिक विक्री केंद्रांच्या विस्तृत वितरण नेटवर्कच्या माध्यमातून आजपासून रेनो काइगरची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.  रेनो इंडियाच्या संकेतस्थळावरून देखील या गेम चेंजरची नोंदणी करता येऊ शकते-

https://Kiger.renault.co.in

या आकर्षक किंमतीची घोषणा करताना रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम मामील्लापल्ले म्हणाले, “भारतीय बाजारासाठी अतिशय योग्य असणारी रेनो काइगर ही एक आधुनिक एसयुव्ही आहे.  आधुनिकीकरण, सर्जनशीलता, ग्राहकांच्या गरजा ओळखणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतुलनीय किंमत देऊ करणाऱ्या कार्सची निर्मिती करण्यावर असेलेला आमचा भर या आम्ही या आधीच सिद्ध केलेल्या कौशल्याला आम्ही पुन्हा एकदा प्रथम स्थानी ठेवले आहे. रेनो काइगर ही एक अद्वितीय एसयुव्ही आहे आणि तिच्या लांबलचक चाकांमुळे आतमध्ये जास्त जागा आणि आकारमान मिळते. यात अनेक नवी स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत आणि त्याला स्पोर्टी, जागतिक दर्जाच्या इंजिनाची जोड लाभली आहे. याखेरीज, रेनो काइगर ही भारतीय रचना, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतेचे आणि ‘मेक इन इंडिया’ बाबत रेनोच्या ठोस वचनबद्धतेचे उत्तम प्रदर्शन करते. जगभरातील ग्राहकांच्या एसयुव्ही बाबतच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून आम्ही रेनो काइगरसाठी आकर्षक किंमत निश्चित केली आहे. या नव्या गेम-चेंजरच्या निमित्ताने आमचा एसयुव्ही वारसा आणखी मजबूत करण्याचा आमचा विचार आहे.”

रेनो काइगरने स्वत:ला मनमोहक, स्मार्ट आणि स्पोर्टी बी-एसयुव्हीच्या स्वरूपात प्रस्थापित केले आहे. या मनमोहक डिझाईनला स्पोर्टी आणि दणकट घटकांची साथ लाभल्याने रेनो काइगर ही एक खरीखुरी एसयुव्ही झाली आहे. रेनो काइगरच्या स्मार्ट केबिनमध्ये तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि खोलीचा आभास यांचा सुरेख मेळ घातला गेला आहे.    

रेनो काइगर नवीन टर्बोचार्ज 1.0 लिटर पेट्रोल इंजिनने सक्षम असून ती अधिक कामगिरी प्रधान आणि चालक अनुभव देणारी आहे. तिचे सर्वोच्च कामगिरीसंपन्न, आधुनिक आणि सक्षम इंजिन स्पोर्टी ड्राईव्हची खातरजमा करेल या वाहनात मल्टी सेन्स ड्राईव्ह मोडस उपलब्ध आहेत. जी ग्राहकांच्या ड्रायव्हिंग प्राधान्यानुसार साजेशी लवचिकता प्रदान करते.

रेनो काइगरमध्ये प्रत्येक इंजिनात 1.0एल एनर्जी तसेच 1.0एल टर्बो सोबत 2 पेडलची सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांना आमच्या चार उपलब्ध ट्रीम्स – आरएक्सई, आरएक्सएल, आरएक्सटी आणि आरएक्सझेडमधून निवड करता येईल. ग्राहकांच्या गरजा आणि आवश्यकतांनुसार प्रत्येक सेगमेंट तयार करण्यात आले आहे. सर्व ट्रीम्स आकर्षक किंमतीत उपलब्ध आहेत. प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांना मौल्यवान लाभ मिळेल. त्याचप्रमाणे सर्व उत्पादन श्रेणीत स्टाईलिश ड्यूएल टोन कॉम्बिनेशन निवडीचा पर्याय उपलब्ध आहे.

रेनो काइगरच्या दोन पुढील सीट तसेच दोन मागील सीटना थ्री-पॉइंट सीटबेल्ट बसवलेला आहे. तर मागे बसलेल्या मधल्या प्रवाशाकरिता टू- पॉइंट सीटबेल्टची सोय राहील. रेनो काइगरमध्ये ड्राईव्हरसाठी टू साईड एअरबॅग समवेत दोन फ्रंट एअरबॅग देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त सुरक्षेसाठी दोन्ही फ्रंट सीट्सना सीट बेल्ट रिमांयडर अलर्टची सुविधा आहे.

ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे कल्पक मार्ग रेनो’ने सादर केले आहेत. रेनो व्हर्च्युअल असिस्ट (आरव्हीए) च्या माध्यमातून रेनो देशातील सर्व काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचेल. आरव्हीए व्हॉट्सअॅप आणि वेबसाईटवर बोटाच्या एका स्पर्शावर उपलब्ध आहे. या माध्यमातून सर्व माहिती विस्तृतपणे उपलब्ध होईल. अगदी टेस्ट ड्राईव्ह तसेच बुकींगविषयक माहिती मिळेल. रेनो काइगर व्हर्च्युअल स्टुडिओ हा अत्याधुनिक स्वरूपाचा व्हर्च्युअल स्टुडिओ असून याद्वारे 360 डिग्री सुलभ फॅशन अनुभवता येते. ज्याद्वारे ग्राहकांना एकंदर माहितीचा ताळमेळ बसवणे एक्सेसरी ठरवून ऑनलाईन बुकिंग शक्य होते. हा एक एकंदर ग्राहकाने स्वत:च्या पसंतीनुसार निश्चित केलेला प्रवास आहे, ज्याद्वारे संपूर्ण माहिती उपलब्ध होते आणि आपल्या पसंतीनुसार रेनो काइगरचा पर्याय मिळतो.   

एक्सेसरीज आणि पसंतीनुरूप बदलाविषयी सांगायचे झाल्यास ग्राहकांना खास करून तयार करण्यात आलेल्या स्मार्ट एक्सेसरीज पॅकमधून निवड करणे शक्य होईल. त्यामुळेच काइगर एक पाऊल पुढे असते. ग्राहकांना पाच खास पर्सन्लाईज पॅक – जसे की; एसयुव्ही, अटरॅक्टीव्ह, इसेन्शियल, स्मार्ट, स्मार्ट प्लस सोबतच वायरलेस चार्जर तसेच एअर प्युरीफायरसारख्या टेक एक्सेसरीज उपलब्ध आहेत.  

किंमत यादी

भारतातील एक्स शोरूम किंमत, रुपयांमध्ये

Engine &Transmission   Version NameEnergy MTEnergy EasyR AMTTurbo MTTurbo Xtronic CVT
RXE5,45,000   
RXL6,14,0006,59,0007,14,000 
RXT6,60,0007,05,0007,60,0008,60,000
RXZ7,55,0008,00,0008,55,0009,55,000

*सर्व वेरीयंटमध्ये ड्युएल टोनचा पर्याय रुपये +17K ला उपलब्ध आहे.

रंग

सहा आकर्षक पर्याय उपलब्ध – सर्व उत्पादन श्रेणींसाठी कास्पियन ब्ल्यू, रेडीयंट रेड, मूनलाईट सिल्व्हर, प्लॅनेट ग्रे, आईस कूल व्हाईट, महोगनी ब्राऊन समवेत डिटी पर्याय.

तांत्रिक विवरण

Length3,991 mm  
Width1,750 mm (without mirrors)
Height1,600 mm (with Roof Bars)  
Wheelbase2,500 mm  
Engine Type3-cylinder 1.0 L turbocharged petrol engine    3-cylinder 1.0 L turbocharged petrol engine     ENERGY 3-cylinder 1.0 L petrol engine
Displacement (cc)999 cc999 cc999 cc
Power100 Ps @ 5000 rpm100 Ps @ 5000 rpm72 Ps @ 6250 rpm
Torque160 Nm @ 2800-3600rpm152 Nm @ 2200-440096 Nm @ 3500 rpm
Gearbox5 Speed Manual TransmissionX-TRONIC-CVT5 Speed Manual Transmission 5 Speed EASY-R AMT
Configuration3 cylinders  
Tyre size195/60 R16
Front suspensionMcPherson strut with lower triangle & coil spring, anti-roll bar & traverse arm  
Rear suspensionTorsion beam axle  
Boot volume405 L  
Ground Clearance205 mm  
Fuel tank volume40 L  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *