रेनो ट्राइबर 4.95 लाख रुपयांत सादर

Marathi

28 ऑगस्ट 2019: रेनो या भारतातील अव्वल क्रमांकाच्या युरोपियन ब्रँडने रेनो ट्राइबर ही नव्या संकल्पना मांडणारी अप्रतिम कार आज 4.95 लाख या आकर्षक किमतीत (भारतात सर्वत्र, एक्स-शोरूम) सादर केली. रेनो ट्राइबर चार ट्रिम्समध्ये उपब्लध होईल – RXE, RXL, RXT and RXZ. रेनो ट्राइबरची रचना खास भारतीय बाजारपेठेसाठी करण्यात आली आहे. बी सेगमेंटमधील कार घेण्यास इच्छुक ग्राहकांना ही गाडी अतुलनीय मूल्य देईल. रेनो ट्राइबर ही प्रशस्त, अल्ट्रा मॉड्युलर, इंधन बचत करणारी गाडी आकर्षक अंतर्गत सजावटीसह येते. यात 4 मीटरपेक्षा कमी जागेत अनेक आधुनिक आणि व्यवहार्य सुविधा देण्यात आल्या आहेत.

“आज रेनो ट्राइबर सादर करून आम्ही भारतीय ऑटोमोबाइल बाजारपेठेतील एका सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वात मोठ्या विभागात प्रवेश करत आहोत. बी सेगमेंटसह विविध विभागातील व्यापक ग्राहकवर्गाचा विचार करून तयार करण्यात आलेली रेनो ट्राइबर ही गाडी जागा आणि मॉड्युलरिटी या संदर्भात नवे पायंडे पाडेल. गाडी खरेदीच्या निर्णयात किमतीच्या मूल्याला अधिक महत्त्व देणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी रेनो ट्राइबर अगदी योग्य पर्याय आहे. भारतातील बहुविध आणि उत्साही ऑटोमोटिव्ह बाजारपेठेत रेनो ब्रँड अधिक व्यापक करण्याचे धोरण आम्ही आखले आहे. यात रेनो ट्राइबरमुळे बरेच साह्य लाभेल, अशी आम्हाला आशा आहे,” असे रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामीलपल्ले म्हणाले.

भारतात 200,000 गाड्यांची वार्षिक विक्री होऊन सध्याचा दर दुप्पट व्हावा, या अर्धवार्षिक उद्देशासह आखण्यात आलेल्या रेनोच्या प्रोडक्ट ऑफेन्सिव धोरणाचा एक भाग म्हणून रेनो ट्राइबर सादर करण्यात आली आहे. रेनोच्या या उत्पादन धोरणांना अतुलनीय विक्री आणि दर्जेदार सेवा देणाऱ्या देशभरातील 350 सेल्स आणि 264 सर्विस केंद्रांच्या व्यापक जाळ्याचा पाठिंबा लाभला आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीपर्यंत आपले संपर्कजाळे दुप्पट करण्याचा रेनोचा मानस आहे.

वाढीच्या लक्षणीय संधी असलेल्या ग्रामीण भागातही आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी रेनोने दमदार धोरणे आखली आहेत. नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक धोरणांसह रेनो या नव्या क्षेत्रात पाय रोवत आहे. सप्टेंबरमध्ये रेनो 18 राज्यांमधील ग्रामीण भागातील 330 छोट्या शहरांमध्ये उपक्रमांना सुरुवात करेल. हे उपक्रम या वर्षातच पूर्ण केले जाणार आहेत. शिवाय, रेनोच्या डीलरशीप टीम्सने आजवर दुर्लक्षित राहिलेल्या ग्रामीण बाजारपेठेसाठी खास सेल्स कन्सलटंट्सची नेमणूक केली आहे.

रेनो ट्राइबर ही आकर्षक डिझाइन, दमदार, कॉम्पॅक्ट, प्रशस्त आणि मॉड्युलर अशी बहुपयोगी गाडी आहे. ४ मीटरच्या जागेत या गाडीत सात पौढ व्यक्ती बसू शकतात. भारतातील ग्राहकांच्या अपेक्षांच्या सखोल विश्लेषणानंतर तयार करण्यात आलेली ट्राइबर तुम्हाला अतुलनीय सोयी देते. बाजारपेठेतील चित्र बदलून टाकणारी रेनो ट्राइबर आधुनिक आहे, प्रशस्त तरीही कॉम्पॅक्ट, अल्ट्रा मॉड्युलर आणि इंधन बचत करणारी गाडी आहे. यात आकर्षक अंतर्गत् रचनेबरोबच अनेक आधुनिक आणि व्यवहार्य वैशिष्ट्ये आहेत. या प्रकारच्या गाड्यांमध्ये फाइव्ह सीटर रचनेतील सर्वाधिक बुट क्षमता असलेली गाडी आहे.

“रेनोच्या भारतातील व्यवसाय धोरणांमध्ये नाविन्यता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतातील ऑटोमोटिव्ह बाजारपेठेतील नवनव्या आणि वाढत्या प्रकारांना सेवा देण्यासाठी स्पष्ट उत्पादन धोरण यातून प्रतित होते. नाविन्यतेवर असलेला रेनोचा भर याचे एक उदाहरण म्हणजे रेनो ट्राइबर. या गाडीच्या अनोख्या बॉडी स्टाइलला कोणत्याही एका साध्या प्रकारात बसवता येणार नाही. भारतातील क्विड आणि रेनोच्या एसयूव्ही गाड्यांमधील दरी भरून काढणारे रूप रेनो ट्राइबरला लाभले आहे. भारतातील आपला नाविन्यतेचा प्रवास असाच सुरू ठेवत भारतील ऑटोमोबाइल क्षेत्राच्या बदलणाऱ्या स्वरुपाला ठोस आकार देणारी उत्पादने रेनो सातत्याने देत राहिल,” असे श्री. मामील्लपल्ले म्हणाले.

रेनो ट्राइबर चार ट्रिम्समध्ये उपलब्ध असेल – RXE, RXL, RXT & RXZ. या विभागातील ग्राहकांच्या गरजा आणि आवश्यकता लक्षात घेऊन यातील प्रत्येक प्रकाराची रचना करण्यात आली आहे. ही ग्राहककेंद्रभिमुखता प्रत्येक प्रकारातील किमतींमध्येही दिसून येते. स्पर्धकांच्या तुलनेत यातील प्रत्येक प्रकारात किमतीचे अधिक मूल्य मिळते. प्रत्येक प्रकारामध्ये उत्तमरित्या 50  हजार रुपयांचा फरक असल्याने प्रत्येक ठिकाणी ग्राहकांना मौल्यवान लाभ होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *