वाहतूक नियम पाळणाऱ्यांना खास सवलत वाहतूक पोलिस व बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचा संयुक्त उपक्रम

Marathi

पुणे वाहतूक पोलिसांनी भारतातील आघाडीच्या खासगी जनरल इन्शुरन्स कंपनी असलेल्या व पुण्यात मुख्यालय असलेल्या बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सच्या सहकार्याने वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या पुणेकरांसाठी खास बक्षिसाची घोषणा केली. यानुसार बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सतर्फे वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या पुणेकरांना बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचा मोटार विमा खास सवलतीत उपलब्ध होणार आहे. 


वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या पुणेकरांना प्रोत्साहित करण्यासाठी पुणे पोलिसांनी स्वत:हून सुरू केलेल्या मोहिमेचा हा पुढील टप्पा आहे. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तपन सिंघेल यांनी आज या योजनेची घोषणा केली. अधिकाधिक नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास उद्युक्त करणे, वाहतूक कोंडीवर उपाययोजना, अपघातांवर नियंत्रण आणि पर्यायाने वाहतूक नियमभंग कमी करून पुणेकरांसाठी रस्ते अधिक सुरक्षित करण्याचा उद्देश या मागे आहे. 


याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले,”पुणे वेगाने विस्तारत असून पुणे देशातील सर्वाधिक दुचाकींच्या शहरांपैकी एक बनले आहे. त्यामुळे रहदारातील धोकेही वाढले आहे. वाहतूक नियमभंग आणि अपघात टळावेत, यासाठी वाहतूक पोलिस नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करत आहेत. त्यासाठी नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. सन २०२० मध्ये शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सच्या सहकार्याने आम्ही वाहतूक नियम पाळणाऱ्या आणि आपल्या शहराप्रति असलेल्या कर्तव्याची जाणीव असलेल्या पुणेकरांचा सन्मान करू इच्छितो.बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सने या आदर्श उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. इतरही त्याचे अनुकरण करतील,अशी आशा आहे,”.


बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तपन सिंघेल म्हणाले, “भारतात दररोज रस्ते अपघातात अनेक दुर्दैवी व्यक्ती आपला जीव गमावतात. पुण्याच्या वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने आम्ही वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या पुणेकरांना मोटार वाहन विम्यासाठी अधिक चांगल्या किमतीमध्ये मोटार वाहन विमा उपलब्ध करून देऊ इच्छितो. त्यातून वाहतूक नियमांच्या पालनाला अधिक चालना मिळेल. याच धर्तीवर देशभर विविध योजना राबवून रस्ते अपघातमुक्त बनविण्याचा आमचा मानस आहे.”

पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर  पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम  सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे  अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे (प्रशासन) अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे (गुन्हे) तपन सिंघेल, एमडी सीईओ बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स  ससिकुमार अदिदामू, सीटीओ, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स चंद्रमोहन मेहरा, सीएमओ, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *