वॉलमार्ट इंककडून भारतातील आंध्र प्रदेश या राज्यातून अमेरिकेतील विविध ठिकाणी असलेल्या सॅम्स क्लबपर्यंत होणाऱ्या कोळंबीच्या प्रवासाचा काटेकोर मागोवा ठेवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अमलबजवाणी करत असल्याची घोषणा वॉलमार्ट इन्क.ने आज केली. भारतातील कोळंबी उत्पादक शेतकऱ्याकडून परदेशातील किरकोळ विक्रेत्याला निर्यात होणाऱ्या कोळंबीचा मागोवा ठेवण्यासाठी ब्लॉकचेनचा वापर होणारा भारतातला हा पहिलाच प्रकल्प असणार आहे.या तंत्रज्ञानामुळे अंतिमतः या प्रदेशातील सागरी अन्न उत्पादक शेतकऱ्यांना कोळंबीच्या पुरवठा साखळीला सक्षम करून ग्राहकांचा उत्पादनातील विश्वास अधिक दृढ करणे शक्य होईल. त्यामुळे सागरी अन्न उत्पादनातील पसंतीचा स्त्रोत म्हणून भारताचे स्थान बळकट करण्याबरोबरच उत्पादनाचा मागोवा घेण्याची क्षमता वाढून अमेरिकन ग्राहकांना अधिक पारदर्शक पर्याय उपलब्ध करून देता येईल.
प्रक्रियेदरम्यान अन्न सुरक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठीही याची मदत होणार आहे. परदेशी ग्राहकांना अधिक मनःशांती आणि मूल्य मिळवून देणाऱ्या पारदर्शकतेत भर घालण्याबरोबरच ब्लॉकचेनमुळे सागरी अन्नाचा विश्वासार्ह स्त्रोत म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट होण्यास मदत होईल. “ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे सागरी अन्न समुदायात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असून पुरवठा साखळी प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याच्या याच्या क्षमतेची चाचणी घेण्याच्या दृष्टीने संस्थांनी काम केले पाहिजे. सागरी अन्न हे जगातील सर्वाधिक व्यवसाय होणारे खाद्यान्न असून याची पुरवठा साखळी अत्यंत गुंतागुंतीची आणि व्यापक आहे. त्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित मागोवा व्यवस्थेची चाचणी घेऊन ती अधिक विकसित करणे ही महत्त्वाची पायरी आहे. वॉलमार्टसारख्या किरकोळ विक्रीतील आघाडीच्या विक्रेत्यांनी सागरी अन्न ब्लॉकचेन चाचणीत सहभागी होणे उत्साहवर्धक आहे,” असे अमेरिकेतील नॅशनल फिशरीज इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष जॉन कॉनेली म्हणाले.
आंध्र प्रदेशातील कोळंबी उत्पादक शेतकरी समुदायासाठी दीर्घकालीन आर्थिक संधी निर्माण करण्याची यात क्षमता आहे. नव्या प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण आणि विकासामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे,” असे संध्या अॅक्वाच्या व्यवस्थापकीय संचालक चौधरी कुनम म्हणाले. कोळंबीसह अन्य सागरी अन्न उत्पादकांना आंतरराष्ट्रीय मानक असलेल्या बेस्ट अॅक्वाकल्चर प्रॅक्टिस (बीएपी) प्रमाणीकरणाची पूर्तता करणे आवश्यक असलेल्या सॅम्स क्लबच्या व्यापक अशा अन्न सुरक्षा कार्यक्रमाला हा नवा ब्लॉकचेन प्रायोगिक प्रकल्प पूरक ठरणारा आहे.
“देशभरातील स्थानिक समुदायांसाठी आर्थिक उन्नतीची संधी निर्माण होईल, अशा प्रकारे भारतात
व्यवसाय करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे वॉलमार्ट इंकच्या कंपनी व्यवहारचे उपाध्यक्ष पॉल डिक यांनी सांगितले. “ब्लॉकचेनच्या कल्पक तंत्रज्ञानाचा लाभ स्थानिक शेतकरी व उत्पादकांना व्हावा, यासाठी या प्रायोगिक प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही आमच्या भागिदारांसमवेत काम करून, आमच्या जागतिक पातळीवरील क्षमतेचा वापर करत आहोत. यामुळे अन्न व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन होण्यास मदत होणार असून आमचे ग्राहक आणि सदस्यांना उच्च गुणवत्तेचे उत्पादन उपलब्ध होणार आहे.”