शापूरजी पालोनजी जॉयविले प्रोजेक्टमधील 800 अपार्टमेंटची विक्री

Marathi

नामांकीत व्यवसाय समूह शापूरजी पालोनजी’ने, मागील महिन्यात पूर्व पुण्यात जॉयविले ब्रँड अंतर्गत महत्त्वाकांक्षी गृह प्रकल्प सुरू केला, ज्यामध्ये 800 हून अधिक अपार्टमेंट्सची विक्री झाली. या प्रकल्पातील जागांचे दर रु. 37.5 लाख ते रु. 78 लाख याप्रमाणे आहेत.

यामुळे गृह इच्छुक खरेदीदारांचा विश्वास रिअल इस्टेट कंपन्यांवर बळकट होण्यास मदत झाली, तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटला ज्या आव्हानांना सामोरे जावे लागले, या स्थितीतून हळूहळू आत्मविश्वास परत येतो आहे.

या कंपनीने लॉन्च कालावधीत मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्गाचा अनुभव घेतला. सुमारे 1500 एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) ची नोंद झाली.  हा 21 एकर प्रकल्प मोठ्या विकासाचा भाग आहे. या सुमारे 200 एकरहून अधिक भूखंडावर शापूरजी पालोनजी कुटुंबियांच्या मालकीचा स्टड फार्म होता. या स्टड फार्मला 4 दशकांची समृद्ध परंपरा होती आणि या अभिजात भूभागाचे पुरातन महत्त्व होते. या अशा समृद्ध वारशाशी संबंधित भागात घर खरेदी करण्याकडे खरेदी इच्छुकांचा मोठा कल असल्याचा अनुभव ब्रँडने घेतला आहे.

या यशस्वी लॉन्चविषयी बोलताना शापूरजी पालोनजी रियल इस्टेटचे सीईओ वेंकटेश गोपालकृष्णन म्हणाले, “या प्रकल्पाचे यश हे आमच्या शापूरजी पालोनजी ब्रँड आणि त्याचा 155 वर्षांच्या वारशावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. शापूरजी पालोनजी ब्रँड हा नियोजित वेळेवर दर्जेदार डिलिव्हरी पाळत आला आहे. प्रत्येक संपणाऱ्या वर्षी ब्रँडप्रती विश्वासात वाढ होत आहे. या ब्रँडमध्ये विकास आणि समूहाच्या रचना तज्ज्ञतेचा संगम आहे. त्यामुळेच आम्ही गर्दीतही वेगळे ठरतो. हा आमचा विश्वास आहे.

या समुहाने 2019 दरम्यान अनुक्रमे दिल्ली-एनसीआर आणि ठाण्याच्या निवासी बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतरही असाच अनुभव घेतला. जॉयविले गुरुग्राम येथे लॉन्च टप्प्यात 400 हून अधिक अपार्टमेंट्सची विक्री झाली; तर शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट  ब्रँड नॉंर्दन लाईट्स (ठाणे) अंतर्गत लॉन्चप्रसंगी 600 पेक्षा अधिक अपार्टमेंट्सची विक्री झाली. एकंदर क्षेत्रावर सुमारे 35 महिन्यांपासून संकटाचे सावट असले तरीही शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट’करिता आव्हानात्मक काळ 10 महिन्यांचा राहिला.

“दरवेळी आम्ही निराळ्या बाजारांत प्रवेश केला, आम्ही पारंपरीक पद्धतींना आव्हान देत निकालांवर बाजी मारली आणि उद्योग क्षेत्रात नवीन मापदंड निर्माण केले” असे श्री. गोपालकृष्णन म्हणाले.

शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटच्या विकासाची घोडदौड 80 दशलक्ष चौ. फूटहून अधिक आहे. आगामी 2 ते 3 वर्षांत ती दुपटीने वाढणार आहे. भारतातील सर्वोच्च पाच रिअल इस्टेट विकासकांत विक्रीच्या हिशेबाने हा एक मानला जातो. रिअल इस्टेट शाखेद्वारे या आर्थिक वर्षापासून त्यांच्या सध्याच्या एमएमआर, पुणे, गुरुग्राम, बेंगळूरू आणि कोलकाता येथे नवीन प्रकल्प आणि नवीन टप्प्यांचे नियोजन सुरू आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *