साई श्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी घरपोच औषधे पुरविणार

Marathi

नागरिकांनी ७०३०४७९८८५ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्याला कोणती औषधे हवी आहेत हे सांगायचे आहे.

· औंध, बाणेर, बालेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळ नीलक, पिंपळ गुरव अशा काही भागातील रहिवाशांच्या च्या औषधांच्या गरजा या मोहिमेअंतर्गत भागविण्यात येणार आहे. कोविड १९ या आजाराच्या प्रादुर्भावामूळे भारतभरात लॉकडाऊन झाले आहे. अशातच घरात असलेल्या लोकांची औषधाची गरज लक्षात घेता साई श्री हॉस्पिटल औंध ने घरपोच औषधे पोहचवण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही सुविधा औंध पासून १० किमीच्या परिसरातील लोकांना मिळेल. अशी माहिती डॉ नीरज आडकर यांनी दिली.

साई श्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी हे पुण्यतील औंध परिसरातील एनएबीएच मान्यताप्राप्त रुग्णालय आहे. औंध, बाणेर, बालेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळ नीलख, पिंपळ गुरव अशा काही भागातील रहिवाशांच्या च्या औषधांच्या गरजा या मोहिमेअंतर्गत भागविण्यात येणार आहे.

साई श्री हॉस्पिटल चे मेडिकल स्टोअर २४*७ कार्यरत आहे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपल्या औषधांची गरज पूर्ण करू शकेल. आपल्याला फक्त ७०३०४७९८८५ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्याला कोणती औषधे हवी आहेत हे सांगायचे आहे.

यावेळी बोलताना साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे संचालक आणि सांधेरोपणतज्ञ डॉ नीरज आडकर म्हणाले की , कोविड १९ या आजाराने संपूर्ण जगाला ग्रासले असून हा विषाणू हवेतून व स्पर्शाच्या माध्यमातून संक्रमित होतो. यावर सर्वात महत्वाची बाब म्हणजे घराबाहेर न जाणे होय.

ते पुढे म्हणाले की, या संकट परिस्थिती मध्ये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही फक्त घरी रहा सुरक्षित रहा. आम्ही, आपल्याया वैद्यकीय स्वरूपात शक्य तेवढी मदत करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *