महिलांसाठीचा सर्वात मोठा ब्रॅण्ड फेमिनाकडून विवाहित सुपरविमेन्ससाठी आयोजित केली जाणारी अत्यंत ग्लॅमरस आणि यशस्वी स्पर्धा, ‘फेमिना मिसेस स्टायलिस्टा वेस्ट’चे दुसरे पर्व एका भव्य, झगमगत्या सोहळ्यामध्ये मोठ्या दिमाखात पार पडले. स्त्री आणि आपल्या वेगळेपणामुळे उठून दिसणारे तिचे व्यक्तिमत्व यांचा कौतुकसोहळा साजरा करण्यासाठी फेमिना हे फॅशन आणि लाइफस्टाइलच्या क्षेत्रातील अत्यंत विश्वासार्ह नाव नेहमीच एक पाऊल पुढे असते. फेमिनाद्वारे आयोजित या स्पर्धेची महाअंतिम फेरी पुण्यातील हयात रिजन्सी इथे पार पडली आणि या सोहळ्यात अनेकींच्या अभिलाषेचा विषय ठरलेल्या या किताबावर स्वाती सराफ यांचे नाव कोरले गेले. मृणालिनी बरुआआणि लीना जैनहे या स्पर्धेच्या अनुक्रमे पहिल्या व दुस-या उपविजेत्या ठरल्या.
फेमिनी मिसेस स्टायलिस्टा वेस्ट २०२० ही स्पर्धा आयुष्याच्या प्रत्येक आघाडीवर आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवणा-या अष्टपैलू स्त्रीला समर्पित होती. आपले सौंदर्य, व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता आणि जबाबदार वागणे यांच्या माध्यमातून या महिलांनी वय हा केवळ एक आकडा आहे ही गोष्ट सिद्ध केली आहे आणि एक अत्यंत यशस्वी आयुष्य त्यांनी घडविले आहे. या पॅजंटमधील स्पर्धक स्पर्धेचे थोडेही दडपण न घेता, प्रचंड ऊर्जा, आत्मविश्वास, अदब आणि डौलाने प्रेक्षक आणि परीक्षकांना त्या सामो-या गेल्या. मान्यवर परीक्षकांनी विचारलेल्या कठीण, खडतर प्रश्नाच्या फैरींना उत्तरे देताना त्या डगमगल्या नाहीत किंवा आपला आत्मविश्वास त्यांनी तसूभरही ढळू दिला नाही. या सा-याजणींमधून अंतिम फेरीसाठी तीन स्पर्धक निवडणे हे परीक्षकांसाठी खरोखरीच एक आव्हान होते, कारण या सर्व जणींच्या ठायी अभिजात दिमाख आणि दिलासा देणारे आश्वासक व्यक्तिमत्व यांचा मिलाफ साधला गेला होता. मान्यवर परिक्षकांमध्ये अप्रतिम सौंदर्यवती अभिनेत्री चित्रांगदा सिंग, फेमिनाच्या संपादक आणि प्रमुख कम्युनिटी ऑफिसर तान्या चैतन्य, तडफदार आणि देखणा अभिनेता कार्तिक आर्यन, आपल्या दिमाखदार सौंदर्याने नेहमीच भुरळ पाडणारी अभिनेत्री आथिया शेट्टी, विख्यात डिझायनर शीतल बियानी आणि फिलॅन्थ्रॉपिस्ट व ग्रॅव्हिटस कॉर्पच्या अध्यक्ष श्रीम. उषा काकडे यांचा समावेश होता.
या झगमगत्या सोहळ्यामध्ये आणखी थोड्या ग्लॅमरची भर घातली ती कॉमेडियन आयुषी जागड हिच्या सादरीकरणाने. नर्मविनोदी कोपरखळ्यांनी आणि गंमतीशीर संभाषणाने तिने पाहुण्यांना गुदगुद्या केल्या. ROL X आणि फॅशन आयकॉन प्रिया कटारिया हिने आपल्या मंत्रमुग्ध करणा-यागायकीने/कार्यक्रमाने पाहुण्यांचे मनोरंजन केले.
शीतल बियानी यांचे शीतल क्रिएशन्स, स्लिमिंग आणि बॉडी शेपिंग पार्टनर – द इन्स्पिरेशन, वेलनेस पार्टनर – आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, लाइफस्टाइल पार्टनर – क्रिस्पचे चिकलेट्स डॉट इन, हेअर केअर पार्टनर – हेअर रेव्होल्युशन, नॉलेज पार्टनर – अजिंक्य डीवाय पाटील, सेफ्टी पार्टनर – डेकॅलीप टेक्नॉलॉजीज, बेव्हरेज पार्टनर – विक्रम टी, हॅप्पीनेस पार्टनर – मी अँड मॉम्स आणि लाइफ केअर पार्टनर – इंदिरा आयव्हीएफ हे या सोहळ्याचे शीर्षक भागिदार होते.