स्वयंपाकघरातील उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांतील भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी टीटीके प्रेस्टिजने सन 2020 साठीच्या आपल्या योजनांची आज प्रारंभ केला. विविध भागांत बाजारातील हिस्सा वाढवणे आणि प्रेशर कुकरसारख्या प्रकारांत पुन्हा दोन अंकी वृद्धी करणे असे उद्देश कंपनीने समोर ठेवले आहेत. टीटीके प्रेस्टिजचे अध्यक्ष श्री. टी. टी. जगन्नाथन यांनी पत्रकार परिषदेत या योजनांबाबत माहिती दिली. कंपनी वितरणाचे जाळे वाढवणार असून, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांची, तसेच स्वच्छतेसाठी उपयोगी अशी नवनवी उत्पादने बाजारात आणणार आहे. संपूर्ण भारतभरात मोठा हिस्सा असलेली टीटीके प्रेस्टिज सध्या भारतातील प्रेशर कुकर बाजारपेठेत आघाडीवर आहे.
टीटीके प्रेस्टिजने ‘’स्वच्छ’’ हा अभिनव असा प्रेशर कुकरही बाजारात आणला आहे. वापरतेवेळी कोणतीही अस्वच्छता न होण्याची काळजी घेतलेला हा भारतातील पहिला प्रेशर कुकर आहे. प्रेशर कुकरचे डिझाइन नोंदणीकृत आहे. बऱ्याच संशोधनांती या प्रेशर कुकरचे झाकण तयार करण्यात आले आहे. कुकरमधून पदार्थ बाहेर येऊ नयेत, याची काळजी घेण्यात आली असून, फेस झाकणावरच राहील आणि पदार्थाची चवही कायम राहून पोषणमूल्यही जपले जाईल, याची खात्री करण्यात आली आहे. एरवी या कारणांमुळे खराब होणाऱ्या ओट्याची स्वच्छता करण्यापासून स्वयंपाकघरातकाम करणाऱ्या व्यक्तींची मुक्ती होणार असून, साहजिकच स्वयंपाकघरात जाणारा बराचसा वेळ वाचणार आहे.‘’स्वच्छ’’ प्रेशर कुकर गॅस स्टोव्हआणि इंडक्शन दोन्हीवर वापरणे शक्य आहे. हा कुकर एल्युमिनियम, स्टेनलेस स्टील आणि हार्ड अनोडाइज्डमध्ये, तेही वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध आहे. ‘’स्वच्छ’’ प्रेशर कुकर सर्व प्रेस्टिज एक्सक्लुजिव्ह स्टोअर्स आणि आघाडीच्या डीलरकडे 1325 रुपयांपासून उपलब्ध आहे.
टीटीके समुहाचे अध्यक्ष टी. टी. जगन्नाथनम्हणाले, ‘’टीटीके प्रेस्टिज भारतातील जवळपास प्रत्येक घरात आहे, जणू तशी परंपराच आहे. आमचे अस्तिव वाढविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि भारतातील ग्राहकांसाठी सर्वोत्तम विक्री करणारी प्रथम क्रमांकाची कंपनी होण्याचे आमचे ध्येय आहे. प्रेशर कुकर प्रकारातील बाजारपेठेतील आघाडीची कंपनी म्हणून स्वयंपाकघरात उपयोगी पडणाऱ्या भांड्यांच्या निर्मिती क्षेत्रातही आमचा हिस्सा आणखी वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
टीटीके प्रेस्टिजचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रू कालरो म्हणाले, ‘’आमच्या मौल्यवान ग्राहकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, याकरिता टीटीके प्रेस्टिज स्वयंपाकघरातील भांड्यांच्या निर्मितीमध्ये सातत्याने नवकल्पना राबवित आहे. आम्ही सन 1955 मध्ये भारतातील बाजारपेठेत पहिला प्रेशर कुकर आणला, तेव्हापासून प्रेशर कुकर या प्रकारात देशातील आघाडीची कंपनी आहोत. प्रेशर कुकर प्रकारामध्ये आम्ही अगदी अलीकडे आणलेल्या या नवकल्पनेचा आम्हाला अभिमान आहे. यामुळे स्वयंपाक करणाऱ्यांचा स्वयंपाकघरातील वेळ तर वाचणार आहेच, शिवाय त्यांना पोषक आणि चवदार पदार्थ तयार करणेही शक्य होणार आहे.’’