डेअरी डे चा महाराष्ट्रात प्रवेश राज्यभरात २,००० आऊटलेट्समध्ये उपलब्ध

Marathi

पुणे, 10 एप्रिल 2019: डेअरी डे या दक्षिण भारतात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये दमदार अस्तित्व असणाऱ्या आघाडीच्या आईसक्रीम ब्रँडने महाराष्ट्रातही विस्तार करत असल्याची घोषणा आज केली. डेअरी डेची कर्नाटकात सुमारे दोन लाख चौरस फुट क्षेत्रफळ जागेत पसरलेली दोन अत्याधुनिक उत्पादन केंद्रे आहेत. महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, बीड, सातारा आणि इतर अनेक शहरे व नगरांमधील २,००० आऊटलेट्समध्ये डेअरी डे उपलब्ध आहे. केवळ पुण्यातच या कंपनीने १,०००हून अधिक आऊटलेट्ससोबत भागीदारी केली आहे.

विविध प्रकारचे कप्स, कोन्स, स्टिक्स, टब्स व इतर अनेक प्रकारचे आईसक्रीम तयार करुन आणि वितरित करणाऱ्या या कंपनीच्या उत्पादनांत ३० चवींच्या सुमारे १५० प्रकारच्या आईसक्रीमचा समावेश आहे. वॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, पिस्ता, बटरस्कॉच, मँगो अशा लोकप्रिय चवींसोबत आईसक्रीम केक, पान टि्वस्ट, राजभोग, गुलाब जामून, गाजर हलवा आणि आईसक्रीम सँडविच अशा काही अनोख्या चवीही डेअरी डेने उपलब्ध केल्या आहेत.

या प्रसंगी डेअरी डेचे सह संस्थापक श्री. एम एन जगन्नाथ म्हणाले, “आपल्या ग्राहकांना अनोखे, नाविन्यपूर्ण आणि पैशाचे योग्य मूल्य देणारी उत्पादने देण्यासाठी डेअरी डे ओळखली जाते. सुमारे दशकभरापूर्वी कर्नाटकातील एका छोट्याशा जागेत सुरुवात केल्यापासून आजघडीला डेअरी डे हा दक्षिण भारतातील एक सर्वात लोकप्रिय ब्रँड बनला आहे. महाराष्ट्रातील हा विस्तार म्हणजे कंपनीसाठी एक वाटचाल आहे. भारतात १३-१४ टक्के सीएजीआर या दराने जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी आईसक्रीम बाजारपेठ आहे आणि महाराष्ट्रही भारतातील आईसक्रीमसाठीची एक सर्वात मोठी बाजारपेठ आहे. संपूर्ण भारतभर डेअरी डेचे अस्तित्व निर्माण करण्याच्या दिशेने महाराष्ट्रातील हा विस्तार म्हणजे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

डेअरी डे बद्दल 

२००२ मध्ये सुरू झालेला डेअरी डे हा कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये दमदार अस्तित्व असलेला दक्षिण भारतातील एक आघाडीचा ब्रँड आहे. डेअरी डेतर्फे ३०हून अधिक चवींमध्ये सुमारे १५० उत्पादने तयार आणि वितरित केली जातात. त्यांच्या उत्पादनांमध्ये कप्स, कोन्स, स्टिक्स, टब्स आणि इतर प्रकार उपलब्ध आहेत. श्री. एम एन जगन्नाथ, श्री. ए बालाराजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या कंपनीची कर्नाटकात दोन अत्याधुनिक उत्पादन केंद्रे आहेत. २ लाख चौरस फुटांहून अधिक जागेत पसरलेल्या या केंद्रांमध्ये दररोज १.४ लाख लीटर्सची उत्पादन क्षमता आहे.डेअरी डेची उत्पादन केंद्रे आयएसओ (ISO-22000- 2005 (FSMS)) प्रमाणित आहेत. डेअरी टेक्नॉलॉजिस्ट, फूड टेक्नॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट यांच्यातर्फे या केंद्रामध्ये दररोज परीक्षण केले जाते. ३०,००० हून अधिक रीटेलर्सच्या माध्यमातून दक्षिण भारतातील बहुतांश शहरे आणि नगरांमध्ये डेअरी डे उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *