चेन्नई, १७ जून २०१९: मित्रमंडळींसोबत पेरुच्या फोडीवर थोडीशी मिरची आणि मीठ भुरभुरून खाल्याच्या लहानपणीच्या आठवणी आजही आपल्यासाठी अत्यंत आनंददायी असतात. डेअरी डे हा भारतातील आघाडीचा आईस्क्रीम ब्रँड आपले नवे चिली ग्वावा हे चवदार आईस्क्रीम सादर करत तुम्हाला त्या रम्य आठवणींची सैर घडवण्यास बांधिल आहे. यात पेरुचा पल्प, मिरची आणि मीठ आहे. डेअरी डेच्या चिली ग्वावामध्ये आहे पेरुची अस्सल चव. त्यामुळे, हे आईस्क्रीम खाताना तुम्हाला खरोखरंच पेरुची फोड खाल्ल्याचा आनंद मिळेल. ६० मिलीच्या स्टिकसाठी २० रु. या किमतीत हे चिली ग्वावा आता कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील ३०,००० हून अधिक आऊटलेट्समध्ये उपलब्ध आहे.
डेअरी डेचे संचालक श्री. एम एन जगन्नाथ म्हणाले, “खाद्यपदार्थ क्षेत्रात आईस्क्रीम उद्योग हा सर्वाधिक सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण विभाग आहे. ग्राहकांना दर्जा आणि चवींच्या संदर्भात सर्वोत्कृष्ट असेच देण्याचा प्रयत्न आम्ही डेअरी डेमध्ये सातत्याने करत असतो. पान टि्वस्ट, गाजर हलवा, गुलाब जामुन अशा इतर अनोख्या आणि तोंडाला पाणी सुटेल अशा आमच्या चवींमध्ये आता चिली ग्वावाची भर पडली आहे. आईस्क्रीम प्रेमींसाठी डेअरी डेतर्फे अशा अनेक नाविन्यपूर्ण ताज्या चवी आणल्या जाणार आहेत.”
कप्स, कोन्स, स्टिक्स, टब्स आणि इतर प्रकारांमध्ये डेअरी डेकडे ३० हून अधिक चवींमधील १५० हून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, पिस्ता, बटरस्कॉच, मँगो अशा प्रसिद्ध चवींसोबतच आइस-क्रीम केक, पान टि्वस्ट, राजभोग, गुलाब जामुन, गाजर हलवा आणि आईस्क्रीम सँडविच अशा अनोख्या चवीही ‘डेअरी डे’कडे आहेत.
दक्षिण भारतात आघाडीवर असलेल्या डेअरी डे या आईस्क्रीम ब्रँडने नुकताच महाराष्ट्रातही प्रवेश केला. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, बीड, सातारा व इतर अनेक शहरे आणि नगरांमधील २००० हून अधिक आऊटलेट्समध्ये डेअरी डे उपलब्ध आहे. या कंपनीने फक्त पुण्यातच १००० हून अधिक आऊटलेट्सशी भागीदारी केली आहे.