Rajesh Nair, Founder & CEO, EarnWealth

प्रगतिशील मध्यमवर्गाला समाजाभिमुख व्यवहार क्षेत्रात सक्षम करण्यासाठी अर्नवेल्थ सज्ज – सोयीच्या वेळेनुसार घरून काम करून जास्तीचे उत्पन्न मिळविण्याची संधी मिळाल्याने गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांचे आर्थिक स्वातंत्र्य मजबूत होणार

Marathi

जुलै २०१९: पुण्याच्या अर्नवेल्थ या तंत्रज्ञानाधारित वित्तसेवा क्षेत्रातील (फिनटेक – फिनटेक) समाजाभिमुख व्यवहारांच्या व्यवसायात झपाट्याने प्रगती करणा-या कंपनीने देशातील मध्यमवर्गाला आर्थिकदृष्ट्या वरदान ठरेल अशा काही योजना आणल्या आहेत. समाजाभिमुख आर्थिक व्यववहारांना सुयोग्य अशी भारतातील एकमेव प्रणाली विकसित करणा-या कंपनीने आपल्या “रेफरल पार्टनर” उपक्रमाद्वारे आपल्या विक्री प्रतिनिधींची संख्या चौपट म्हणजे एक लाखावर नेण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. यामध्ये मुख्यतः विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि आपली नोकरी सांभाळून जास्तीचे उत्पन्न मिळवू इच्छिणा-या व्यक्तींवर भर देण्यात येणार आहे. याचा तपशील www.earnwealth.in येथे उपलब्ध आहे.

या उपक्रमाबद्दल अर्नवेल्थ  चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेश पी नायर म्हणाले, ” तंत्रज्ञानाधारित व्यक्तिगत वित्तसेवांमधील अनेकविध पर्याय एकाच ठिकाणी पुरविणारी प्रणाली म्हणून सुरुवात करीत अर्नवेल्थ आता २६,००० भारतीयांचा उत्पन्नाचा स्रोत बनली आहे. भारतात सुमारे १० कोटी लोक मध्यमवर्गात समाविष्ट आहेत आणि त्यातील ८० टक्के  व्यक्ती प्रगतिशील श्रेणीत आहेत. गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना उत्पन्न मिळवण्याचा एक मार्ग उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे आणि  त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यात मदत करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. ” 

“आमच्या पुरस्कृत भागीदारांना (रेफरल पार्टनर) व्यापक आर्थिक चौकटीचा एक स्वतंत्र घटक म्हणून विकसित होता यावे यासाठीच्या अर्नवेल्थ च्या प्रयत्नाना गती मिळत आहे. या प्रवाहाचा भाग बनून आमच्या रेफरल पार्टनर उपक्रमात सहभागी होण्याचे फायदे मिळविण्याचे आम्ही पुणेकरांना आवाहन करीत आहोत,” असेही त्यांनी सांगितले.   

विविध संस्थांच्या ऑनलाइन वित्तसेवा  उपलब्ध करून देणारी सेवा (aggregator) म्हणून २०१४ मध्ये सुरुवात करून आज अर्नवेल्थ एक समाजाभिमुख तंत्रज्ञानाधारित वित्तीय सेवा या भूमिकेतून  इच्छुक व्यक्तीना उत्पन्नाचे साधन मिळवून देणारी संस्था म्हणून उदयाला आली आहे. अर्नवेल्थ ची प्रणाली सर्वाना वापरता येईल अशी सोपी आहे आणि ती लोकप्रिय होऊन कंपनीचा व्यवसाय दरमहा २५ टक्के या गतीने वाढत आहे. आज देशभरात दरमहा १०,००० व्यक्ती अर्नवेल्थ  चे रेफरल पार्टनर म्हणून नोंदणी करतात. अर्नवेल्थ  वित्तीय सेवेतील सर्व प्रकार उपलब्ध करते ज्यात कर्ज, विमा आणि गुंतवणूक यांचा समावेश आहे. लवकरच मालमत्ता हा नवा विभाग सुरु होणार आहे.
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने  दुय्यम आणि तिय्यम स्तरावरील बाजारपेठांत ‘खरा भारत’ वसतो असे राजेश नायर मानतात. या काहीशा दुर्लक्षित भागात व्यक्तिगत वित्तसेवा देण्यासाठी अर्नवेल्थ विविध वित्तसेवांचा तौलनिक तपशील ग्राहकांना उपलब्ध करून देते. कंपनीच्या पारदर्शी आणि सोप्या कार्यपद्धतीमुळे कंपनीचे रेफरल पार्टनर होणे हे एखादे अँप फोनवर डाउनलोड करण्याइतके सोपे आहे.  अर्नवेल्थ यु ट्यूब च्या माध्यमातून तसेच विश्वासार्ह आणि अनुभवी कॉल सेंटर प्रतिनिधींमार्फत प्रशिक्षण देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *