बोस्टनमधील मेसाचुसेट्स मेडीकल स्कूलकडून लसीकरणाच्या क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी पुनावाला ग्रुपच्या कुलपतींना प्रतिष्ठीत विज्ञान पदवी.
राष्ट्रीय, 5 ऑगस्ट 2018: सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. सायरस पुनावाला यांना देशात प्रथमच ‘डॉक्टर ऑफ ह्यूमन लेटर्स’ पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘सेव्हन व्हॅक्सीन हिरोज ऑफ द वर्ल्ड’ पैकी एक अशी ओळख असणार्या डॉ. पुनावाला यांना काही महिन्यांपुर्वी मेसाचुसेट्स विद्यापीठाकडून लसीकरणाच्या क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी प्रतिष्ठीत मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले होते. त्यानिमित्त पुण्यातील जेडब्ल्यू मेरीयट हॉटेलमध्ये दि. 5 ऑगस्ट रोजी झालेल्या या सत्कार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिध्द कलाकार कबीर बेदी यांनी केले. यावेळी डॉ. परवेज ग्रँट यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पुनावाला यांना भारतातील लसीकरणाचे पितामह म्हणून ओळखले जाते. लसीकरणाच्या माध्यमातून जंतूसंसर्ग रोखण्यासाठी ते जागतिक पातळीवर सतत प्रयत्नरत असतात. ‘डॉक्टर ऑफ ह्यूमन लेटर्स’ पदवी मिळवल्यानंतर डॉ. पुनावाला ही पदवी मिळवणार्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांसारख्या दिग्गजांच्या जोडीला पोहोचले आहेत. डॉ. पुनावाला यांच्याकडून भारतात गेल्या 50 वर्षांपासून लसीकरणाची मोहिम चालवली जात आहे. त्यांच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आतापर्यंत 2 कोटीहून अधिक वंचित बालकांचे यशस्वीपणे लसीकरण केले आहे.
‘‘अत्यंत प्रतिष्ठीत समजला जाणार्या या सन्मानाचा मी अतिशय नम्रपणे स्विकार करतो. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अगदी स्थापनेपासूनच जीवनरक्षक लसीकरण तळागाळातील लोकांपर्यंत परवडणार्या किंमतीत पोहोचवण्याच्या प्रमुख उद्देशाने काम करत आहोत. सिरमच्या माध्यमातून जगातील प्रत्येक मुलासाठी जीवनरक्षक लसी आणि जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध उपलब्ध करुन देउन त्याला संसर्गमुक्त बनवण्यासाठी अखंड प्रयत्नरत राहणार आहोत.”
याबाबत मनोगत व्यक्त करताना सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला यांनी सांगितले की

‘‘डॉ. पुनावाला गेल्या पन्नास वर्षांपासून अथकपणे देशात लसीकरणाची चळवळ चालवत आहेत. त्यांनी जगातील सर्वात स्वस्त लसी तयार केल्या आहेत. जीवनरक्षक औषधे आणि लसी तयार करणे आणि प्रत्येक मुलाला संरक्षण उपलब्ध करुन देणे, हेच त्यांचे प्रमुख ध्येय राहिले आहे. 170 देशांतील 25 मिलीयनहून अधिक वंचित मुलांचा जीव वाचवून सायरस यांनी भारतच नव्हे तर जगभरात आपले काम सुरु ठेवले आहे. त्यांच्या या अमुल्य योगदानामुळेच आज त्यांना प्रतिष्ठित अशा नोबेल पुरस्कारासाठी नामांकीत करण्यात आले आहे. संपूर्ण जगासाठी लसीकरणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अखंडपणे प्रयत्न करत असणार्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. हा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे.”
डॉ. सायरस पुनावाला यांचा सत्कार केल्यानंतर मनोगत व्यक्त करताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगितले की
डॉ. पुनावाला यांना त्यांच्या औषध निर्मिती क्षेत्रातील अद्वितीय योगदानासाठी 2005 साली पद्मश्री तसेच तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते लाईफटाईम अचिवमेंट पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सिरम इन्स्टिट़्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी व्हॅक्सीन उत्पादक कंपनी आहे. कंपनीकडून उत्पादीत करण्यात आलेले डोस जागतिक पातळीवर विकण्यात येतात.