शानने संगीतबद्ध केलेले, स्वानंद किरकिरे लिखित आणि शामक दावर यांची कोरिओग्राफी असलेले हे अँथम क्षेत्रातील महान कलाकार- अक्षय कुमार, राजकुमार राव, विकी कौशल, कपिल शर्मा, शंकर महादेवन आणि सुनिधी चौहान यांना एकत्र आणते
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून पाठिंबा मिळालेले हे गाणे आणि व्हिडिओ हंगामा म्युझिक, हंगामा प्ले, हंगामा आर्टिस्ट अलाऊड आणि सर्व भागीदार नेटवर्क्सवर उपलब्ध असेल
हंगामाने वायू प्रदूषणासंदर्भात जागरूकता आणि संवेदनशीलता वाढवण्यासाठी एक मोबाइल गेम तयार करून लॉन्च केला आहे
भारत, ३० मे २०१९: हंगामा, या भारताच्या आघाडीच्या डिजिटल मनोरंजन कंपनीने भामला फाऊंडेशन या आरोग्य, पर्यावरण आणि स्वच्छतेच्या समस्येवर उपाय काढणाऱ्या संस्थेच्या भागीदारीत #HawaAaneDe अँथम आज लॉन्च केले. ख्यातनाम गायक शानसोबत भागीदारीत तयार केलेले हे अँथम युनायटेड नेशन्सच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या संकल्पनेनुरूप असून ते भामला फाऊंडेशनच्या #BeatAirPollutionबाबत जागरूकता वाढवण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. हंगामा म्युझिक, हंगामा प्ले, हंगामा आर्टिस्ट अलाऊड आणि इतर भागीदार नेटवर्कवर उपलब्ध असलेल्या या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये अक्षय कुमार, राजकुमार राव, विकी कौशल, कपिल शर्मा, शामक दावर, शान, शंकर महादेवन आणि सुनिधी चौहान यांचा समावेश आहे.
शानने संगीतबद्ध केलेले आणि स्वानंद किरकिरे यांची गीतरचना असलेले हे गाणे शान, शंकर महादेवन, सुनिधी चौहान, कपिल शर्मा यांचा आवाज असून शामक दावर यांनी त्याची कोरिओग्राफी केली आहे. या गाण्यातून वायू प्रदूषणाच्या समस्येवर भर देण्यात आला असून सर्वांसाठी एक स्वच्छ, सुरक्षित जग निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्यासाठी ते आवाहन करतात.
या अँथमबरोबरच हंगामाने #BeatAirPollution या गरजेबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी हंगामाने एक मोबाइल गेमही तयार केला आहे. एका अत्यंत सोप्या आणि संवादात्मक इंटरफेसद्वारे हा गेम लोकांना वायूप्रदूषणाला कारण ठरणाऱ्या सर्व गोष्टींबाबत जागरूक करतो. या गेमप्लेमधून वापरकर्त्यांना आपला अंतिम स्कोअर सोशल प्लॅटफॉर्मवर आणता येतो, इतरांना खेळण्यासाठी आमंत्रित करता येते आणि समस्येवर जागरूकता निर्माण करता येते. वापरकर्ते गेम येथे खेळू शकतात – http://bit.ly/2Xe11af
हंगामा डिजिटल मीडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, ”वायू प्रदूषण ही पृथ्वीसाठी धोकादायक ठरणाऱ्या सर्वांत गंभीर पर्यावरण समस्यांपैकी एक आहे. ही समस्या समजून घेणे आणि स्वच्छ व शाश्वत वातावरणाप्रति आवश्यक ती पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला भामला फाऊंडेशनसोबत आणखी एका महत्त्वाच्या उपक्रमासाठी काम करताना आनंद होत आहे. यातून नागरिकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल. आम्हाला खात्री आहे की, अँथम आणि मोबाइल गेम हंगामाच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्यावर आम्हाला वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोठी पावले उचलण्याबाबत लाखो लोकांना जागृत करता येईल.”
भामला फाऊंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला म्हणाले की, ”संगीतात लोकांना सूचित, शिक्षित आणि एकत्रित करण्याची शक्ती आहे. आम्ही पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे या मोहिमेला त्यांच्या पाठिंब्यासाठी आभारी आहोत आणि संपूर्ण उद्योगाने एकत्र येऊन इतक्या महत्त्वाच्या विषयाला आधार दिला त्याबाबत त्यांचेही आभारी आहोत. मोठ्या प्रमाणावर लोकांना महत्त्वाचे संदेश दिले गेले पाहिजेत आणि आम्हाला खात्री आहे की, हंगामाची जागतिक व्याप्ती जगभरातील लोकांना या बदलाचा भाग होण्यासाठी महत्त्वाची ठरेल.”

या अनावरणाबाबत बोलताना संगीतकार आणि गायक शान म्हणाले की, ”एक कलाकार म्हणून या शक्तिशाली उपक्रमाचा भाग होणे माझ्यासाठी समृद्ध करणारे आहे. वायूप्रदूषणाचा धोका पर्यावरणाला आणि एकूणच आपल्या अस्तित्वासाठी गंभीर ठरू लागला आहे. आपण सर्वांनी वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. मला भामला फाऊंडेशन आणि हंगामासोबत काम करताना आणि समस्येवर वाढत्या जागरूकतेसाठी कार्यरत असताना खूप आनंद होत आहे.”
राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतलेखक स्वानंद किरकिरे म्हणाले की, ”भामला फाऊंडेशनने कायमच संपूर्ण देशाला भेडसावणाऱ्या समस्यांना हात घातला आहे आणि वायू प्रदूषण ही एक अशी समस्या आहे, जिच्याकडे आपण तात्काळ लक्ष दिले पाहिजे. लाखो लोकांना प्रेरणा देणारे शब्द आणि गीत लिहिण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. मला खात्री आहे की, ही अँथम श्रोत्यांना वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रेरित करण्यात योगदान देईल.”
नृत्य आणि कोरिओग्राफीमधील ख्यातनाम कलाकार शामक दावर म्हणाले की, ”मी भामला फाऊंडेशनसोबत बऱ्याच काळापासून जोडला गेलो आहे. त्यांचे सामाजिक प्रश्नांना अधोरेखित करण्याचे आणि लोकांना समाजात सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. ‘हवा आने दे’ वायू प्रदूषणाच्या गंभीर परिणामांबाबत लोकंना शिक्षित करण्याचा एक कलात्मक मार्ग आहे. आपण एकत्रितरित्या समस्येवर उपाय काढण्यासाठी एकत्र येणे अत्यावश्यक आहे.”
या उपक्रमाचा भाग असलेले शंकर महादेवन म्हणाले की, ”वायू प्रदूषण हा असा धोका आहे, ज्याकडे नागरिकांनी लक्ष दिलेच पाहिजे. या समस्येला आळा घालण्यासाठी उचललेले एक छोटे पाऊलही पृथ्वी वाचवण्यासाठी खूप पुढे जाऊ शकते. समाजावर सकारात्मक परिणाम करण्याचे उद्दिष्ट हाती घेतलेल्या उपक्रमासोबत जोडले जाताना मला अभिमान वाटतो.”
या उपक्रमासोबत जोडल्या गेलेल्या सुनिधी चौहान म्हणाल्या की, ”वायू प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न आहे. लोक प्रदूषित हवा शरीरात घेत आहेत आणि एका चांगल्या भविष्यासाठी वायू प्रदूषणाविरोधात एकत्र येणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. या प्रकल्पाचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे आणि यामुळे लोकांना योग्य दिशेने पावले उचलण्यास प्रेरणा मिळेल, याची मला खात्री वाटते.”
या म्युझिक व्हिडिओत सहभागी झालेले कलाकार राजकुमार राव म्हणाले की, ”वायू प्रदूषण ही आपल्या पृथ्वीला भेडसावणाऱ्या सर्वांत मोठ्या समस्यांपैकी एक आहे. आपण प्रत्येकाने वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. या महत्त्वाच्या समस्येला अधोरेखित करणाऱ्या प्रकल्पाचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे.”
वायू प्रदूषणाबाबत बोलताना विकी कौशल म्हणाले की, ”स्वच्छ हवा ही मानवाची सर्वांत मुलभूत गरज आहे. दहापैकी नऊ लोक प्रदूषित हवा श्वासाद्वारे शरीरात घेतात आणि त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. आपण एकत्र येऊन वायू प्रदूषणाचा सामना करण्याची शपथ घेऊया.”
ही अँथम हंगामा म्युझिक, हंगामा प्ले आणि हंगामा आर्टिस्ट अलाऊडवर आजपासून उपलब्ध आहे. हे गाणे ऐकण्यासाठी येथे भेट द्या- http://bit.ly/2KdBXMK. म्युझिक व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया येथे भेट द्या- http://bit.ly/2QB0vQX.