भारत, ३० जानेवारी २०१९: देशातील काही सर्वात मोठ्या म्युझिक स्ट्रीमिंग मंचांपैकी एक मानल्या जाणा-या हंगामा म्युझिक या हंगामा डिजिटल मीडियाच्या मालकीच्या मंचाने आज आपली सेवा अलेक्झावर उपलब्ध होत असल्याची घोषणा केली. हा मंच वापरणा-यांना आता आपली आवडती गाणी अॅमेझॉन एको रेंजमधील स्मार्ट स्पीकर्सवर तसेच अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक वापरून ऐकता येतील. त्यासाठी फक्त अलेक्झाला हंगामा म्युझिकवर गाणी वाजविण्याची सूचना द्यायची आहे.
या सेवेमुळे यूजर्सना स्वतंत्र गाणे किंवा एखाद्या संपूर्ण अल्बमधील गाणी किंवा विशिष्ट अभिनेता किंवा संगीतप्रकारातील गाणीही स्ट्रीम करता येणार आहेत. हंगामाने संगीतकार, गायक, विविध प्रसंगांना साजेशी गाणी आणि थीम्स अशा विषयांनुसार बनविलेल्या खास प्लेलिस्टसुद्धा या मंचावर उपलब्ध आहेत. यूजर्सना आपल्या अलेक्झा उपकरणांवर ‘अलेक्झा, प्ले दिलबर ऑन हंगामा’, ‘अलेक्झा, प्ले पंजाबी सॉग्ज ऑन हंगामा’, ‘अलेक्झा, प्ले अरिजित सिंग्ज सॉंग्ज ऑन हंगामा’ अशा साध्या ध्वनीसूचना वापरून हंगामा म्युझिकच्या संग्रहातील गाणी ऐकता येतील.
या प्रसंगी बोलताना हंगामा डिजिटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले, ”हंगामामध्ये आम्ही आमच्या यूजर्सना सोय आणि निवडीची ताकद देणारा समृद्ध अनुभव देण्याचे तत्व पाळतो. अॅमेझॉनची ध्वनीसूचनांवर आधारित सहाय्यक यंत्रणा, अलेक्झा आम्हाला ख-या अर्थाने सर्व माध्यमांतून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल आणि घरी गाणी ऐकण्याचा अधिक समृद्ध अनुभवही त्यांना मिळू शकेल. त्याचवेळी या सहयोगामुळे आमच्या विद्यमान तसेच नव्या यूजर्सना आमच्या संग्रहातील विविध प्रकार, विविध भाषांमधील अस्सल गाण्यांचा शोध व आनंद घेता येईल.”
अॅमेझॉन इंडियाच्या अलेक्झा स्किल्ससाठीचे कंट्री मॅनेजर दिलिप आर. एस. म्हणाले, ”अलेक्झाच्या साथीने आपल्या आवडीचे संगीत केवळ ध्वनी-आदेश देऊन ऐकणे हा नेहमीच एक आनंददायी अनुभव असतो. त्यात आता अलेक्झावर हंगामा म्युझिकचेही आगमन झाल्याने यूजर्सना हिंदी, तामिळ, कन्नडा अशा सर्व प्रमुख भाषांतील चित्रपट व बिगर-चित्रपट संगीताचा आस्वाद घेता येईल. हंगामाची जोड मिळाल्याने अलेक्झा यूजर्सना संगीतश्रवणाचा आणखी समृद्ध अनुभव मिळणार आहे.”
हंगामा म्युझिक सेवेचा आनंद घेण्यासाठी यूजर्सना अलेक्झा अॅप सुरू करून हंगामा म्युझिक स्किल्स सक्रिय करायचे आहे. हे केल्यानंतर सेटिंग्जमधल्या ‘म्युझिक’ विभागातील डिफॉल्ट स्ट्रीमिंग सर्विसेसच्या यादीमध्ये हंगामा म्युझिकचे नाव टाकण्याचा पर्यायही यूजर्सना मिळू शकेल. असे केल्याने अलेक्झाला गाणी ऐकवण्यास सांगताना दरवेळी म्युझिक सर्व्हिसचे नाव सांगण्याचीही गरज उरणार नाही.